Skip to main content

हॅट्स ऑफ टू लिलीयन

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 01/12/2008 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
एखादे पुस्तक वाचल्यानन्तर त्यातील पात्रे आपल्याला भेटली तर किती बरे असे वाटत रहाते. आणि जर ते पुस्तक तुमच्या आवडत्या पुस्तकापैकी असेल तर मग विचारायलाच नको. "चीपर बाय डझन" हे पुस्तक मी प्रथम किर्लोस्कर मासीकातुन तुकड्यातुकड्यात वाचले. मग नन्तर कधितरी ते आख्खे पुस्तक हातात लागले. आजतागायत त्याची पारायणे झाली तरी मनातुन अजून् सुटले नाही. चीपर बाय डझन ही बारा भावन्डे आणि त्यांचे आईवडील यांची खरी कहाणी. त्या बारा भावंडांपैकी दोघानी सांगितलेली.

कसं काय पाटील बरं हाय का

लेखक उपटसुंभ यांनी सोमवार, 01/12/2008 09:03 या दिवशी प्रकाशित केले.
कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... सातार्‍याचे तुमी, तासगावचे तुमी, ते न्हाय न्हाय न्हाय लातूरचे तुमी सांगा आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. काल म्हनं तुमी मीटिंगला गेला. मॅडमना राजीनामा देऊन आला. केली कुनी खोडी, गेली लाल गाडी. आज काय शिल्लक र्‍हायलंय का..! आमी काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का.. काल काय ऐकलं ते खरं हाय का... दिल्लीमधे जवा बाँबस्फोट झाला. तीन तासात तीन सूट बदलून आला. हाय काय कोडं, सांगा तरी थोडं. खाली नका बगू आता लाजताय का..! काल काय ऐकलं ते खरं हाय का.. कसं काय पाटील बरं हाय का अहो बरं हाय का.. काल काय ऐकलं

सुट्टी..!

लेखक संदीप चित्रे यांनी सोमवार, 01/12/2008 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टीला गावी जायचं ठरतं आणि शीळेला गाणं मिळतं रजेचं कसं, काम आहे किती? पैशांची सोय आहे का पुरेशी? पाहून प्रश्न जरा दडपते छाती मिळताच रजा गणित जुळतं आणि शीळेला गाणं मिळतं....१ जाताना पूर्वी त्यांच्या गावी तान घ्यायचे वडील छानशी पोहचायचे ते मनाने आधी कळतं त्यांना काय व्हायचं आणि शीळेला गाणं मिळतं....२ गणपती नाही, दिवाळी तरी लग्नकार्य वा नुसती भेट जरी वाढत असते खरेदीची यादी घरचं अंगण अनमोल वाटतं आणि शीळेला गाणं मिळतं....३ कुठली जिलबी, कुठली भाजी सुरमई, बांगडे,पापलेटं ताजी बिघडलं पोट चालेल तरीही भेळ, मिसळ, वडाही खायचं आणि शीळेला गाणं मिळतं....४ दाराशीच वाट बघते आई कौतुक करतील सासूबाई भाऊबहिण
Taxonomy upgrade extras

फिश अपेटायझर

लेखक शोनू यांनी सोमवार, 01/12/2008 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
पटकन होणारा माशांचा प्रकार तिलापिया, कॅटफिश या सारख्या माशांचे फिले ३-४ एक जुडी कोथिंबीर सहा-सात पाकळ्या लसूण (अमेरिकेत मिळणार्‍या जाडजूड पाकळ्या, चांगल्या ना़जूक पाकळ्या मिळण्याचं भाग्य असेल तर १५-२० ) दोन-तीन तिखट हिरव्या मिरच्या. एक चहाचा चमचा जिरं हळद, तिखट, मीठ लिंबाचा रस ( भारता बाहेर असाल तर लाइम जूस घ्यावा, शक्यतो लेमन जूस नको ) तेल. फिले धुऊन, पुसून कोरडे करावेत.

फेव्हीकॉलची विचारसरणी

लेखक टारझन यांनी सोमवार, 01/12/2008 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
बास्स्स !! आता लैच झालं !! मी खरं तर ह्या असल्या विषयावर लिहिणारच नव्हतो , त्यात मला काही गती नाही आणि रसही. पण च्यायला जो तो उठतो सुटतो आणि हे करा न ते करा ... म्हणजे आतंकवादी(पाकिस्तान) सुधारेल असे सांगत सुटतो.आता यातही मालिका सुरू झाल्यात ... आतंकवाद नष्ट करण्याचे उपाय - भाग १ ,... पाकिस्तान कसे सुधरवाल - भाग २५ ... अर्रे छोडो यार .. कोणी गांधीवाद करा म्हणतो, कोणी म्हणतो समजावून सांगा... कोणी म्हणतो आपण चर्चा करू .. कोणी नुसताच निषेध करतोय ... अरे इतर वेळी त्या अमेरिकेला शिव्या देता ... काही चांगलं घ्या की त्यांच्या कडून .. ९/११ च्या हल्यानंतर काय पेटून उठला तो देश.

आता कोण ?

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 30/11/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
एकंदरीत विलासराव व आबा यांना जावे लागेल असे दिसते. मग आता कोण? माझा अंदाज मुख्यमंत्री - सुशिलकुमार शिंदे उपमुख्यमंत्री/ गृहमंत्री - छगन भुजबळ आपला अंदाज काय?

गांधीवादाने अतिरेक्यांचे निर्मूलन होऊ शकते काय? -२.

लेखक कलंत्री यांनी रविवार, 30/11/2008 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
काल मी लिहिलेल्या लेखात अतिरेकी कसा बनतो याची प्रक्रिया सांगण्याचा प्रयत्न केला होता. माणसाच्या विचारसरणीत द्वेष, तिरस्कार, भिती आणि क्रौर्य भरले की अतिरेकी बनविणे सोपे असते. धर्माच्या नावावर ते सहज आणि सोपे असतेच. त्यात संधीसाधू लोक अश्या तरुणांचा पद्धतशीर वापर करून घेत असतात. या माझ्या विधानाला कोणताही समाज, धर्म, वंश अपवाद राहू शकत नाही. यात मुस्लिम अतिरेकी, हिंदू यात तमिळ, पंजाबी, सध्याच्या बॉम्ब स्फोटात सहभागी असलेले सर्वच अतिरेकी येतात. मला या लोकाबद्दल तिरस्कार वाटण्यापे़क्षा यांच्याबद्दल सहानुभुतीच वाटते.