Skip to main content

पिफ्फ, पायरसी आणि शिफ्ट ७२

लेखक चौथा कोनाडा यांनी गुरुवार, 25/03/2021 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊन २०२० नंतर "न्यू नॉर्मल" होण्यासाठी सर्वांचे निकराचे प्रयत्न सुरु झाले. तळागाळातील बहुतेक लोकांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसला होता. करमणूक क्षेत्र देखील याला अपवाद नव्हते. काही मोठ्या कलाकारांनी बॅकस्टेज कलावंतासाठी मदत उभा करून त्यांना दिलासा द्यायाचा प्रयत्न केला. सिनेमागृहे निर्बंधासह उघडली तरी प्रेक्षकांनी पाठच फिरवली. अन याच पार्श्ववभूमी वर चित्रपट महोत्सव होणार की नाहीत अश्या चर्चा रंगायला लागल्या.

दिसला गं बाई दिसला

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 25/03/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
*दिसला गं बाई दिसला* गेल्या जूनमधेच कान्हा टूर करून रिकाम्या हाताने (म्हणजे- रिकाम्या डोळ्यांनी) आणि जड पावलांनी परतलो होतो. तेव्हा वेळेअभावी बांधवगड ठरवलं नव्हतं. पण या वर्षी परत तोच सळसळत्या उत्साहाचा झरा घेऊन कटनीला पोहचलो..ट्रेन दोन तास लेट झाली होती..तरी उत्साह कायम होता. रात्री आठला कटनी स्टेशनहूनच ताला(बांधवगड) च्या "सन रिसाॅर्ट" च्या मॅनेजरने पिकअप साठी अरेंज केलेल्या इनोव्हाने सहा जणांचं उत्साही पथक निघालं. रस्ता फारच छान होता. खड्ड्यांचं नामोनिशाण नव्हतं. रस्त्यांवरच लावलेल्या रेडीयम सारख्या चमकदार पट्ट्यांमुळे वाटेवर दिवे अंथरलेत की काय असं वाटत होतं.

[ Smart Fan ]

लेखक चौथा कोनाडा यांनी मंगळवार, 23/03/2021 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
नविन [ Smart Fan ] घावयाचा आहे, बजेट रु १,५०० ते २,००० Requirements Great Cooling Experience तगडी लाईफ Good Remote as well Mobile Control Stylish Looks

पिशाच्च वाॅक..

लेखक आजी यांनी सोमवार, 22/03/2021 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्य घटना आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका असं म्हणत नाही. विश्वास ठेवाच. त्यावेळी मी एका निमशहरात नोकरी करत होते. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण रोज पहाटे चांगलं चार, पाच किलोमीटर फिरुन यायचो. व्यायाम म्हणून. पहाटे पाच वाजता जायचो आणि सव्वासहा साडेसहा वाजता परत यायचो. दोघींची वयं पस्तिशीची. घरात नवरा, मुलं. एकदा अशीच मी रात्री झोपले. गाढ झोप लागली. नेहमीप्रमाणे अलार्मशिवाय जाग आली. सवयच पडलेली. बाथरुमला जाऊन आले. एक चुकार कावळा ओरडत होता. परत जरा लोळावं वाटलं, पण निग्रहाने मोह टाळला. म्हटलं, उगीच थोडक्या आळसापायी फिरण्याचा नेम मोडायला नको. पटकन उठून फिरुन येऊया. उठले. दात घासले.

भेळ..... तर फक्त निमित्त आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 21/03/2021 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा, अस्मितेसाठीच काढला आहे...धागा अराजकीय आहे... मराठी भाषा, हवी तशी वळवता येत असल्याने आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असल्याने, खूप गहनविचार न करणेच उत्तम... खूप दिवसांनी, ठाण्याला, बहिणीकडे भाऊबीजेसाठी, सगळी भावंडे जमलो होतो. मामलतदाराची मिसळ, सकाळीच खाल्ली होती. तशी मला ही मिसळ अजिबात आवडत नाही. म्हणजे, आधी आवडत होती पण, सध्या घरीच, खिमामिसळ बनवत असल्याने, आता ही शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही. एकदा प्रयोग म्हणून, कोळंबीमिसळ पण बनवून बघीतली, पण, खिमामिसळ ती खिमामिसळच... आता संध्याकाळी काय खायचे?

पैशाचा पाऊस

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 20/03/2021 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------------------------------------------------------------------------------------------- पैशाचा पाऊस -------------------------------------------------------------------------------------------------------------- विऱ्याने समोर नाचणाऱ्या पोरींवर नोटा उधळल्या . जणू पैशाचा पाऊसच ! पोरी जाम खुश. त्यांना माहिती होतं गिऱ्हाईक येडं झालंय म्हणून . रात्रीची वेळ होती. पनवेलच्या त्या डान्सबारमध्ये रात्र रंगात आली होती. त्याचबरोबर जवानी आणि नशासुद्धा ! बार बराच मोठा होता. मध्ये डान्सफ्लोअर होता. चारी बाजूंनी गिऱ्हाईकं बसली होती. तर्राट झालेली.

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... ५

लेखक राजा वळसंगकर यांनी शनिवार, 20/03/2021 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 5 नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना? ************************** गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा ************************** "4 दिवे" – कानात "विचार" कुजबुजली. मग 5वा, त्यांचा खुर्चीच्या मागे लागलेला दिवा कुठला?

शेअरमार्केट ची बाराखडी... भाग ० : सुरुवात

लेखक गणेशा यांनी शनिवार, 20/03/2021 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे. गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता. -- शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो..

कविता - कृष्णधून

लेखक VRINDA MOGHE यांनी शुक्रवार, 19/03/2021 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
*कृष्णधून* पहाटवा-याची निशब्द धून , मावळती चंद्रकोर, फिकटशी !! झाडांची सळसळ, प्राजक्त सडा, धुक्याची चादर, पुसटशी !! आकाशी उधळण, सप्तरंगांची, घरट्यात चिवचिव, नाजुकशी !! पक्ष्यांचे थवे, उडती रावे, मोहक किलबिल, ऐकावीशी !! अलगद जाग, स्वप्नाचा भास खुदकन हसू, गालापाशी !! पडता कानी, कृष्णधून मन होई राधा, लागे समाधीशी !! -©️वृंदा 19/3/21
काव्यरस