Skip to main content

भरली भेंडी

लेखक शाल्मली यांनी शनिवार, 13/12/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
भरली भेंडी
साहित्य :- भेंडी - स्वच्छ पुसून, डेखं काढून आणि मधे उभ्या चिरून डाळीचं पीठ - पाव किलो भेंडीसाठी साधारण ३ चमचे जाड/बारीक - रवा अर्धा चमचा कोरडं खोबरं - २ चमचे धने पावडर - अर्धा लहान चमचा जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद, चाट मसाला - प्रत्येकी १ लहान चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर साखर - अर्धा चमचा मीठ

राष्ट्रीय अंतर्गत सुरक्षा, सोली सोराबजींचे PIL आणि सुप्रीम कोर्टाचा निर्देश

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 12/12/2008 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या बातम्यांनुसार वरिष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी यांनी PIL दाखल करून भविष्यातील अतिरेकी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पोलिस व इतर सुरक्षा दलांना आधुनिक शस्त्रास्त्रे पुरवण्यास केंद्र सरकारला भाग पाडण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाला निर्देश मागितला आहे, आणि त्यावर असा निर्देश सरकारला देऊन न्यायमूर्तींनी एका आठवड्यात सरकार काय उपाययोजना करणार आहे त्याची माहिती देण्यास सांगितले आहे. याचं उत्तर आल्यावर जानेवारीत सर्वोच्च न्यायालय याचा पाठपुरावा करील असं न्यायमूर्तींनी म्हंटलं आहे.

भारनियमन व कॅपॅसिटर

लेखक संजय अभ्यंकर यांनी शुक्रवार, 12/12/2008 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
काही काळापूर्वी वि.प्र. साहेबांच्या एका धाग्यात प्रतीसाद देताना मी लिहिले होते की "वीज वाचवण्या साठी कॅपॅसिटरचा वापर करा". ह्यावर आनंदजींनी व्यंनी. पाठवून स्पष्टीकरण दिले की कॅपॅसिटरमुळे वीज कंपनीची वीज वाचते. ग्राहकाची नव्हे. ग्राहकाने कॅपॅसिटर लावला की तो, वीज कं. कडून अतिरिक्त वीज खेचत नाही. ही वाचलेली वीज, कंपनी इतरत्र पूरवठा करून, भार नियमन आटोक्यात आणू शकते. आताच त्यांनी आणखी एक व्यनी पाठवला व दै.

शतदा प्रेम करावे

लेखक विनायक पाचलग यांनी शुक्रवार, 12/12/2008 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो माझ्या शुद्ध लेखनाबद्दल येथे बरीच चर्चा झाली. त्यामुळे मी हा माझा पहिला लेख जो मी ३ महिन्यापुर्वी लिहिला होता तो टाइप केलेला होत तो येथे जसाच्या तसा येथे देत आहे. (मी एवढ्यात देणर न्हवतो पण देत आहे.आता शान्त्पणे वाचा आणि प्रतिक्

SAP च्या ABAP/BIW कोर्सबद्दल माहिती हवी आहे.

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी शुक्रवार, 12/12/2008 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी गेल्या 4 वर्षांपासून ईआरपी मध्ये काम करीत आहे. स्वत:चा व्यवसाय करीत असताना (स्वत:च तयार केलेली सिस्टीम तीन ठिकाणी राबविण्यात आली आहे) आर्थिक गुंतवणूक करण्याची क्षमता नसल्यामुळे सध्या सॅप च्या ABAP/BIW चा कोर्स करण्याविषयी विचार करीत आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार कोर्सची फी ही रू. 150000/- पेक्षा जास्त आहे(पुण्यात). तरी असा कोर्स केल्यानंतर त्यात नोकरीविषयक संधी व कोर्सविषयक इतर माहिती मिपाकरांना असल्यास द्यावी ही विनंती. ही मोठी गुंतवणूक करणे योग्य आहे का?, पुढे नवीन असताना नोकरीच्या संधी कितपत आहेत/पगार वगैरे, कामाचे स्वरूप इ. धन्यवाद. चैतन्य कुलकर्णी.

मी पकडलेला चोर

लेखक भिडू यांनी शुक्रवार, 12/12/2008 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
ही एक सत्य घटना आहे. त्याचे काय झाले.गेल्या वर्षी मी एका ब्रिटिश कंपनी च्या प्रोजेक्ट वर काम करत होतो(म्हणजे आमचा क्लायंट ब्रिटिश होता).त्या मुळे कामाची वेळ दुपारी २ ते रात्रि ११ अशी होती.नेहमी प्रमाणे कॅब ड्रायवर ने पुणे दर्शन घडवत रात्रि १२ च्या सुमारास मला घरी सोडले. पण त्या दिवशी नेमके त्याने घराच्या जरा आधी सोडले.नाहीतरी घरचे बाहेरगावी गेले होते त्या मुळे घरी काहीच काम नव्हते आणी अंतर ५ मिनीटाचेच होते म्हणून चालत निघालो.बरेचसे पुणेकर १० वाजताच झोपतात त्या मुळे सगळ्यांचे लाईट्स बंदच होते.

एक विनंती

लेखक मुक्तसुनीत यांनी शुक्रवार, 12/12/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो , आपल्या या आवडत्या संकेतस्थळावर होणार्‍या हल्ल्याबद्दल, त्यावरील उपाययोजनांबद्दल , सर्व्हरच्या वेगाबद्दल , तो वाढवण्याबद्दल , वर्गणीबद्दल आपण सर्व इथे आपापले विचार मांडतच असतो. हा धागाही या संकेतस्थळाबद्दलचाच आहे. अलिकडच्या काळात एक संपादक म्हणून आणि एक मित्र म्हणून मला काही व्य नी आले की , अवांतर प्रतिसाद , थट्टा मस्करी वगैरेचे प्रमाण खूप वाढले आहे आणि मुख्य म्हणजे, जिथे एखाद्याने एखादे मनोगत/चर्चाप्रस्ताव मांडला आहे तिथेही हेच घडल्याचे प्रकारही घडले आहेत. या संदर्भात संपादक मंडळाची काही जबाबदारी आहे की नाही ?

निवडणूक नियम ४९-०

लेखक माझी दुनिया यांनी शुक्रवार, 12/12/2008 17:03 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर एकूणच स्वत:च्या स्वार्थाकरता जनतेला वेठीला धरणार्‍या समस्त राजकारण्यांविरुद्ध जनतेत खास करून तरूण वर्गात असंतोष पसरला आहे. त्यातच येत्या काही महिन्यात सार्वत्रिक निवडणूका येऊ घातल्या गेल्या आहेत. राजकारण्यांच्या निष्क्रिय वृत्तीमुळे बर्‍याच जणांना आपण निदान मत द्यायला तरी जिंवत राहू का अशी एक भिती वाटून राहिली आहे. पण यदा कदाचित जगलोच तर असलेला सगळा राजकारणी वर्ग बदलून नव्या रक्ताच्या तरूणांना संधी मिळावी असे वाटते. जागोरे या संकेतस्थळाने तर जास्तीत जास्त तरूणांना मतदानाकरता जागरूक करायचा यत्न आरंभलाय. मत तर द्यायचंय पण कोणाला ?

भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग!

लेखक केदार केसकर यांनी शुक्रवार, 12/12/2008 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
परवा भक्तीमार्ग का ज्ञानमार्ग यावर चर्चा चालु होती. मला जो विचार त्या वेळेला सुचला तो असा. याचा अर्थ कोणताही मार्ग कमी प्रतीचा आहे असा नाही. मला भावलेला माझाच विचार शुध्द भावनेनी इथे देत आहे. भक्तीमार्गापेक्षा मी ज्ञानमार्ग अधिक मानतो. भक्तीमार्ग विश्वास देतो, तर ज्ञानमार्ग आत्मविश्वास! केदार