Skip to main content

बुश साहेबांना जोड्यांचा आहेर

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 18/12/2008 03:55 या दिवशी प्रकाशित केले.
बुश साहेबांना इराकमध्ये जोड्याचा आहेर मिळाल्याची बातमी दोन दिवसांपासून जगभर गाजते आहे. कुठे या प्रकाराला इराकमधील जनतेचा असंतोष म्हटले जात आहे तर कुठे त्या पत्रकाराचा प्रसिद्धी स्टंट. या विषयावर मिपाकरांना काय वाटते हे जाणून घ्यायला उत्सुक. जाता जाता - कोणत्या घटनेचा उपयोग कोण कसा करुन घेईल हे सांगणे मात्र मुष्किल. आता हेच पहा ना. या घटनेवर लगेचच एका ब्रिटिश तरुणाने एक खेळ विकसीत करुन आंतरजाळावर टाकला आणि पंचवीस लाखांवर हिट्स मिळवल्या! जगभरातल्या वर्तमानपत्रांप्रमाणे याची माहिती आपल्या मराठी वॄत्तपत्रांत सुद्धा आलेली आहे.

वाटसरूच्या पाऊलखुणा (अनुवादित)

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 18/12/2008 03:23 या दिवशी प्रकाशित केले.
वाटसरूच्या पाऊलखुणा ****************** वाटसरू रे, पाऊलखुणा - त्यांनाच म्हण "पाऊलवाट". वाट अशी नसतेच म्हणा - तूच चालून बनते वाट. वाट बनते तूच चालून - मागे बघ - ती बघशील वाट नवी; पण वळून, कधी पुन्हा तुडवशील? वाटसरू! नसतेच "वाट"- फक्त नावेमागची लाट. मूळ कवी : आंतोनियो माचादो (१८७५-१९३९); मूळ भाषा स्पॅनिश Campos de Castilla संग्रहातील "म्हणी आणि गाणी - क्रमांक २९" मधील या ओळी सर्वात प्रसिद्ध आहेत. अनुवाद : धनंजय
Taxonomy upgrade extras

ब्रेकिंग न्यूज'!

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 17/12/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
आमची "स्वर्ग' सोसायटी तशी कुणाच्याच अध्यात ना मध्यात असलेली. (गावरान भाषेत याला "शेपूटघालू' प्रवृत्ती म्हणतात. असो) सोसायटीची इमारत बांधून झाली, तेव्हा कुणाच्याच "अध्यात-मध्यात' नव्हती. नंतर मात्र भोवताली मोठमोठ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आणि आमची सोसायटी बिचारी शक्ती कपूर किंवा रणजीतसमोर पूर्वी गावातल्या गरीब नायिकेची, सहनायिकेची किंवा ज्युनिअर आर्टिस्टची व्हायची, तशी अवस्था झाली. अंग चोरून, कशीबशी श्‍वास घेत आता ही सोसायटी उभी आहे. त्यामुळं तशी इतर लोकांच्या चर्चेत किंवा पाहण्यात आमची सोसायटी येण्याची काहीच शक्‍यता नव्हती.

भयकथा आणि वातावरण निर्मिती

लेखक व्यंकु यांनी बुधवार, 17/12/2008 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजतागायत आपण अनेक भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या त्यातील काही गोष्टी नंतर आठवल्या कि काहीवेळा हसुही पण अशा कथा ऐकण्यास अनुकूल वातावरण असेल तर मात्र अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

ब्लॉग

लेखक जयेश माधव यांनी बुधवार, 17/12/2008 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
मला blogspot.com वर माझा ब्लॉग बनवायचा आहे.कुणी मला मदत करेल काय?

(भासमान)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 17/12/2008 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी दिसणार्‍या अनेक अनोळखी पण आवडणार्‍या पोरी जेव्हा अचानक दिसायच्या बंद होतात तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण येते आणि मग ज्या त्या मुलीत त्या मुलींचे भास होऊ लागतात.
Taxonomy upgrade extras

भासमान

लेखक पॅपिलॉन यांनी बुधवार, 17/12/2008 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
नेहेमी दिसणारी एखादी अनोळखी पण आवडणारी व्यक्ती जेव्हा अचानक दिसायची बंद होते तेव्हा तीची प्रकर्षाने आठवण येते आणि मग जळी-स्थळी त्या व्यक्तीचे भास होऊ लागतात. अवचित कोठे, कुण्या दिशेने भासमान तू होते हर्ष, खेद, हुरहुर, विशादीं मनास बूडवून जाते आकृती कुठे वा नाद कुठे, नुसत्याच कुठे वा बटा कुठे धुंद ती झाडे अथवा कुठे झिंगल्यां वाटा गर्द वादळी तीच हवा, त्या हलक्या वर्षाधारा रणरणत्या त्या उन्हातला वा ऊष्ण सुगंगित वारा हसले कोणी गोड तिथे वा अडखळी ती चाल नजर बावरी असे कुणाची, तेच शर्मिले गाल नसे जरी तू रूपांमध्यें या, अरूप तुझी ही मूर्ती असे चिरंतर हृदयामध्ये, दृष्यमान भोवती
Taxonomy upgrade extras

फर्जाना यादव ( लोकल गोष्टी-२)

लेखक स्वाती फडणीस यांनी बुधवार, 17/12/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
फर्जाना यादव =============================================== त्या दिवशी रोजच्या सारखीच मी ऑफिसला निघाले होते तसं फारसं काम नव्हत, शनिवार.. आणि सोनूच्या शाळेला दिवाळीची सुट्टी असल्याने घरीही सगळे जरा सैलावले होते.. त्यामुळे मलाही ऑफिसला जावेसे वाटत नव्हते.. ऑफिसला दांडी मारावी असा विचार सारखा सारखा मनात येत होता.. पण बहादूर (आमचा ड्रायव्हर) दारात येऊन उभा राहिला.. त्यामुळे मग मी ही आळम-टळम न करता गाडीत जाऊन बसले. रोज सोनू आणि मी आमच्या गाडीने त्याच्या शाळेला जातो..आणि मग तिथूनच मी ऑफिसला जाते. आता सोनूचा शाळेला सुट्टी असल्यामुळे बहादूर माझ्या दिमतीला आहे..

सहज भेट्ली----

लेखक पुष्कराज यांनी बुधवार, 17/12/2008 15:12 या दिवशी प्रकाशित केले.
सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर ओळ्ख पटुनी गाली बर्‍याच दिवसानंतर रंग रेशमी उधळून आले नभात दाटे लाली क्षीतिजावरचे मुग्ध चांदणे फुलुनी आले गाली आनंदघन संध्या झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर उपचाराच्या मोडूनी सीमा हाती घेतला हात वळ्णावरती अवघड वेड्या सहज देशील साथ? गडबडली आणि लाजली मान घातली खाली त्या मौनाचा अर्थ सांगण्या कोकीळ धाउन आली आनंदाची उधळ्ण झाली बर्‍याच दिवसानंतर सहज भेट्ली वाटेवर ती बर्‍याच दिवसानंतर
Taxonomy upgrade extras

अवांतर प्रतिसादांवर उपाय -अपडेटेड

लेखक टारझन यांनी बुधवार, 17/12/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सर्व संपादक मंडळ , तात्या आणि माण्यवरांची आधीच माफी मागत आहे, णमस्कार्स लोक्स, आज आम्ही फार चिंतीत आहोत, कितीही काहीही झालं तरी हल्ली मिपावर हे अवांतर प्रतिसादांचा लोंढा काही थांबतच नाहीये ... कोणी बोंबलाची प्रतिकृती मागतो ... त्यावर कोणी "कच्चे बोंबील" ही पाकृ देतो ( कोण चावट आहे रे तो ... म्हणजे दिसायला तर रिलेव्हंट .. पण मायंदळ अवांतर ) आणि कोणती तरी गैंग मधीच येउन " टोटल अवांतर " चा गेम सुरू करते .... अरेच्च्या .... मला काळजी वाटायला लागली ... म्हणून आम्ही हा धागा काढत आहोत ...