भयकथा आणि वातावरण निर्मिती
लेखनप्रकार
आजतागायत आपण अनेक भूताखेतांच्या गोष्टी ऐकल्या त्यातील काही गोष्टी नंतर आठवल्या कि काहीवेळा हसुही पण अशा कथा ऐकण्यास अनुकूल वातावरण असेल तर मात्र अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही. अशीच वातावरण निर्मिती कशी असते आणि त्याला जोडून आलेली एक कथा लिहीतोय.
वातावरणनिर्मिती:
ठिकाण मामाचं गाव खेडेगाव असल्यान सहाजीकच जेवणं लवकर झालेली असतात जेवण झालं कि भाचरांचा पत्ते खेळायचा मुड येतो सगळेजण खळात(अंगणात) एकत्र येतात घरातली लहान मुलं भलत्याच उत्साहात असतात गप्पा, पत्ते सुरु होतात पण जसजशी रात्र मी म्हणू लागते, थंडीचा जोर वाढू लागतो तसं लहान मुलाना झोपवलं जातं राहतात ते मामा, मामी, भाचरं, मामाचा मुलगा आणि सुनबाई. पत्त्यांचा खेळ ऐन रंगात आलेला असतो थोड्यावेळाने गरमागरम चहा सगळ्यांच्या दिमतीला हजर होतो आणि साधारण बाराच्या सुमारास लाईट जातात माजघरात लावलेल्या दिव्याचा मंद प्रकाश खळापर्यंत पोचून आपली शक्ती दाखवण्याचा व्यर्थ प्रयत्न करत असतो. आता पत्त्यांचा खेळ पूर्ण थांबलेला असतो त्यातच मामी बत्ती लावण्याचा विचार बोलून दाखवते पण भाचरांच्या मनात मात्र वेगळाच विचार येत असतो ती मामीला म्हणतात "मामी राहुदे गं बत्ती कैक दिवसात मामाच्या तोंडून भूताची गोष्ट ऐकली नाय्ये ती काळोखात ऐकण्यातच खरी मजा, काय मामा" या वाक्यावर बरेच दिवसांनी सासरेबुवांच्या तोंडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून सूनबाईही विचार उचलून धरते आणि मामीचा विचार मागे पडतो.
भयानक थंडी पडलेली असते रातकिड्यांची किरकिर निरव शांततेचा भंग करत असते एखाद वटवाघूळ हूल देऊन जात असते मामा आज काय सांगणार म्हणून सर्वांची उत्कंठा शिगेला पोचलेली असते आणि मामा भाचरांच्या विनंती मान्य करुन कथा सुरु करतो ती पुढीलप्रमाणे:
एका शहरवजा गावातील घटना थंडीचे दिवस असतात अमावास्येची रात्र असते.
रात्र बर्यापैकी झालेली असते घरातील प्रत्येकजण चिरनिद्रेत असतो प्रत्येक व्यापारी सगळा कारभार आटपून घरी गेलेला असतो राहतो तो फक्त रिक्षावाला त्यातच स्थानिक रिक्षावाले कधीच गुल झालेले असतात. अशात जवळच्या गावातला एक रिक्षावाला सोबत किंवा एखादं भाडं मिळेल म्हणून थांबतो पण रात्र फार व्हायला लागते तेव्हा घरी असलेल्या बायकापोरांचा विचार करुन तो जायला निघतो भाडं काय आज नाही उद्या मिळेल अशा विचारात तो निघतो थोडं अंतर गेल्यावर एक म्हातारं जोडपं रिक्षा थांबवतं म्हातारा म्हणतो बाबा आम्ही अमुक अमुक गावाला चाललोय नेतोस का आम्हाला तुझे काय ते पैसे देउ आम्ही यावर रिक्षावाला म्हणतो अहो मी पण तिकडेच चाललोय मला पण तुमची सोबत मिळेल आणि पैसे कुठे जातायत हो बसा तुम्ही. रिक्षावाला कितीही बोलला तरी का कोणास ठाऊक एक भिती त्याचा मनाला स्पर्श करुन जाते.
ती म्हातारा म्हातारी रिक्षात बसतात रिक्षा चालू लागते म्हातारा आणि रिक्षावाला गप्पा मारत असतात रिक्षात सुन्न करणारी बोचरी थंडी लागत असते. ते जिकडे जात असतात तिकडचे दोन चार दाखले दिल्यावर मात्र रिक्षावाल्याला हायसं वाटतं तोही आता मनमोकळेपणाने बोलू लागतो पण म्हातारी मात्र एकदम शांत असते.
निम्म अंतर रिक्षा ओलांडते आणि रस्त्याचा कडेला एक माणूस रिक्षावाल्याच्या दृष्टीस पडतो आणि रिक्षावाला अक्षरश: चरकतो पण शांत बसतो; तो माणूस म्हातारा म्हातारीला कसा दिसला नाही असा विचार करतो आणि रिक्षा चालवत राहतो थोडं पुढं गेल्यावर तो म्हातार्याला म्हणतो आजोबा तो माणूस पाहीलात? त्याचे पाय उलटे होते. यावर उत्तरादाखल म्हणून इतका वेळ गप्प असलेली म्हातारी म्हणते मग त्यात विशेष काय आमचेही पाय उलटेच आहेत. रिक्षावाला काचकन ब्रेक मारुन रिक्षा थांबतो, पाठी वळून बघतो आणि तत्क्षणी रिक्षावाल्याचा आत्मा त्याला सोडून जातो आणि जाताना बरोबर त्याने पाठी वळल्यावर काय दिसलं हे ही घेऊन जातो.
वाचने
5127
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वातावरण निर्मिती
In reply to वातावरण निर्मिती by प्रियाली
मस्तच ....
In reply to मस्तच .... by छोटा डॉन
प्रियालीत
In reply to वातावरण निर्मिती by प्रियाली
लय भारी!
वा.
वा वा!
झकास
क्या बात है
In reply to क्या बात है by सहज
हेच
वाह वाह,