(भासमान)
Taxonomy upgrade extras
नेहेमी दिसणार्या अनेक अनोळखी पण आवडणार्या पोरी जेव्हा अचानक दिसायच्या बंद होतात तेव्हा त्यांची प्रकर्षाने आठवण येते आणि मग ज्या त्या मुलीत त्या मुलींचे भास होऊ लागतात. प्रेरणा अर्थात 'भासमान'.
अवचित कोठे, कुण्या दिशेने भासमान ती होते
शेप, चाल, जबराच, माझिया मनास तुडवून जाते
दिसे पोरगी अहा देखणी, प्रसाद मिळतो 'बाटा'
कुठे धुंद ती मित्रमंडळी कुठे झिंगल्या वाटा
बर्फ थोडका ग्लेनफिडिच, अन मादक 'पहिली'धारा
रणरणत्या वा उन्हात घेऊन बियर बैसतो बारा
दिसली कोणी तरुण जरा की अडखळते का चाल
मादक नजरे शोध घेतसे, कुठे 'शर्मिला' माल?
नसशी जरी तू 'रूपा' आणिक 'वासू' माझी मूर्ती
वसे चिरंतर कट्ट्यावरती, 'हिरवळ' पसरे भवती
चतुरंग
वाचन
2877
प्रतिक्रिया
0