Skip to main content

पर्यायी ऊर्जा

लेखक चंबा मुतनाळ यांनी रविवार, 21/12/2008 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या तोक्यो टाईंम्समधे एक इंटरेस्टींग बातमी वाचली. पर्यायी वीजनिर्मीतीचा एक आगळा वेगळा प्रयोग तोक्योत चालला आहे. माणसांच्या चालण्यातून वीज बनवायचा! तोक्यो स्थानकावर ठरावीक सात तिकिट गेट्सवर जमिनीवर ही प्रेशर पॅड्स बसवली आहेत. त्यावरून अंदाजे ८०,००० लोक्स दिवसातून चालतात, व त्यातून मिळालेल्या विजेवर एक १०० वॉट्सचा दिवा ८० मिनिट्स चालतो. तसेच शिबुया मधल्या हाचिको चौकात देखिल अशी ४ पॅड्स लावली आहेत. तोक्यो स्थानकाचा दिवसातून १८ लाख लोक वापर करतात, तर शिबुया स्थानक २४ लाख लोक वापरतात.

आबा , देशमुख साहेब व उद्योग मंत्री.

लेखक बामनाचं पोर यांनी रविवार, 21/12/2008 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळ :- अंजनी, तासगाव तालुका, आबा व त्यांच्या आईंमधील संवाद... कायं र ! अध्यात ना मध्यात हिकड कूट वाट चुकला मंत्री साहेब तुम्ही ? ते बी बीन दिव्याच्या गाडीतन् .. पोलिसबी न्ह्याय म्होरं. .. ---मंत्रीसाहेब नाय आमी आता , राजीनामा दिला मंत्री पदाचा.. अर् काय सांगतुयास.. अस् कस् राजीनामा दिला ?? ---कस म्हंजे .. दिल्ली वरनं साहेबांचा फोन आला " राजीनामा द्या " .. देउन टाकला. अरं त्यांचा लाडका नव्हं तू ? ---आपल्या साहेबांच म्हाईत नाय व्हंय तूला.. कधी कूनाला डोक्यावर बशीवतील अन कधी खाली टाकतील ह्याचा काय नेम न्ह्याय.

ओंजळ (रान)फुलांची...(२)

लेखक पांथस्थ यांनी रविवार, 21/12/2008 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
ओंजळ (रान)फुलांची...(१) मी बेंगळुरु मधे जिथे राहातो त्या गृहसंकुलाच्या गच्चीवर मस्त बाग आहे. तिथल्या काहि फुलांची हि छायाचित्रे. १. २. ३. ४. ५.

छायाचित्र टीका

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 20/12/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
nikko निक्को नावाच्या जपानमधील पर्यटनस्थळी गेलो असताना काढलेला हा फोटो. खरेतर पानगळ चालु होती, पण ह्या शेवाळाचेच छायाचित्र चांगले आले. अवांतर : सदर छायाचित्र मीच काढले आहे आणि उपक्रमवरही डकविलेले आहे.

आपलेच दात, आपलेच ओठ!

लेखक आपला अभिजित यांनी शनिवार, 20/12/2008 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपलेच दात, आपलेच ओठ! ---------- मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांचा तणाव सुरक्षा दलांबरोबरच सगळ्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना जाणवत होता. सुमारे तीन आठवडे हा तणाव घेऊन वावरणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. देशावरचा हा सर्वांत मोठा हल्ला होता. काहींनी त्याची गणना 11 सप्टेंबरच्या अमेरिकेवरील हल्ल्याशीही केली होती. विशेष म्हणजे पाकिस्तानी दहशतवादाविरोधात या वेळी सर्वच राजकीय पक्ष एकत्र आले होते. पाकिस्तानचा निषेध एकमुखाने केला होता आणि कठोर पावले उचलण्याची मागणीही करत होते. एवढे दिवस हा तणाव सगळ्यांनाच असह्य झाला होता...त्यातून सुटका प्रत्येकालाच हवीहवीशी वाटत होती.

(संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 20/12/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
चाल : रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा ----------------------------------------- रात्रीत गेम झाला, वस्तीतल्या गुंडाचा! संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! हा गुंड ना स्वयंभू, जामिन राहतो हा दंग्यात माणसांच्या, जाळपोळ करतो हा पोलीस होई साथी, हा दूत शासनाचा संपेल ना कधीही , हा खेळ दहशतीचा!! खंडणी मागती हा, बॉलीवुडला शाप जे 'भाई' सांगती ते करती आपोआप हसतात नशिबाला हा दोष जाणीवांचा!

मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी !

लेखक अनिरुद्धशेटे यांनी शनिवार, 20/12/2008 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
मैत्रीण नसलेल्या मित्रांसाठी ! मैत्रीण मैत्रीण नाव आहे. माझ्या मनाच एक गाव आहे तिच्याशिवाय कुणासासाठीही न उघड्णारं या गावाला एक दार आहे ! नको शब्द नको यमक तिची साथ फक्त हवी आहे लिन्गभेदाच्या या बुरसटलेल्या जगात आमच वेगळ विश्व आहे ! निर्मळ मनाचे पाप नको अन वासनेच्या कुशीतल पुण्यही नको आमच्या दोघान्च्या मैत्रीला चंद्रावरल्या हरणाचाही डाग नको ! ह्या विश्वाच्या अंतापर्यंत आपली मैत्री माझ्या ह्रदयात राहणार आहे आणी कल्पांतानंतर माझ मन आपल्या अम्रुतमयी मैत्रीची गाणी गाणार आहे ! अनिरुद्ध
Taxonomy upgrade extras

मोफत जादुची झप्पी

लेखक दवबिन्दु यांनी शनिवार, 20/12/2008 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
एक मानुस होता. जुआन माण नावाचा. तो सिडनीला आपल्या घरी चाल्ला होता. विमानतळावर पाहिलं तं कोनीच त्याला घ्यायास आलेलं नव्हतं. आजुबाजुला सर्वजनांचे नातलग आल्ते. एकमेकांना मिठि मारुन राहिले होते. त्याला खुप दु:ख वाटुन राहिले. की आपल्याला कोनीच भेटायला आलेलं नाही. मग त्याने एक मोठा पुट्ठा, रंगीत पेनं विकत घेतली. त्यावर दोनी बाजूला लिहलं Free Hug - मोफत जादुची झप्पी आनि उबा राहिला लोकान्च्या मधे जाउन. लोक त्याच्याकडं पाह्यचे फुडे जायचे. मग एक बाई थाबली. त्याला म्हनाली, माझं कुत्र मेलं आज सकाली. आनि माझ्या मुलीची आजच पहिली बरसी आहे. ती गेल्या वर्षी अपघातात मरन पावली.

ऊर्जा संवर्धन दिवस १४ डिसेम्बर

लेखक अमोल नागपूरकर यांनी शनिवार, 20/12/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
१४ डिसेम्बर हा ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्याला उपल्ब्ध असलेली ऊर्जा ही बहुतेक करुन लवकर नष्ट होणारे आणि मर्यादित नैसर्गिक स्रोतान्पासून निर्माण होते. ज्या इन्धनाला तयार होण्यास ३० लाख वर्षे जावी लागली त्याच ६० टक्के भाग आपण गेल्या २०० वर्षातच खर्च केला आहे. आपल्या देशाला पेट्रोलियम उत्पादने आयात करावी लागतात. त्यमुळे आपल्याला परकीय चलन तर खर्च करावे लागतेच पण आपली ऊर्जा सुरक्षा धोक्यात येते. शिवाय अशाप्रकारे होणारया ऊर्जा निर्मितिमुळे पर्यावरणाचीही अपरिमित हानि होते आहे. इ स १८६० पेक्षा आजचे जागतिक ताप्मान जवळ पास ०.७५ अंशाने वाढले आहे.