Skip to main content

(सजा)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 23/01/2009 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद फणसे यांची 'सजा' वाचून आम्हाला आमच्या सजा आठवल्या! ;) कोरड्या नरड्यास ह्या 'द्राक्षासवाचा' शाप दे टाकतो 'नवटाक' वा 'मोसंबिचा' उ:शाप दे! जी कुणी दिसते मला, बघतो तशी त्या त्या क्षणी, गात्र मी स्पर्शीत नाही, फक्त थोडे 'माप' दे! तामसी आयुष्य भोगी, शेवटी ही 'आव' का? तोड त्या नाडीस, पोटा सोडुनी अडमाप दे! दे सजा, बसता कुठे टोचेल का मज तो 'मणी'? मात्र माझ्या 'वेदनेला' मलम हा उ:शाप दे! कोरडा उपचार असतो 'पानपुसण्याचा' इथे पूस 'रंग्या' अन् खुशालीची जगाला थाप दे...! चतुरंग
Taxonomy upgrade extras

एक वेगळा आनंद -

लेखक मॅन्ड्रेक यांनी शुक्रवार, 23/01/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
बाय को माहेरी जाणार / गेल्यावर ज्या पद्धतिने पुरुष वर्ग आनंदित होतो , त्याच प्रमाणे नवरा माहेरी ( आई कडे / कामा़निमित्त ) बाहेर गावी गेल्यावर माहिला आनंदित होत असतिल का?

क्रिकेटचा सामना आणि देवपूजा

लेखक रम्या यांनी शुक्रवार, 23/01/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
गिरणगावातल्या माझ्या घराचा परिसर अगदीच विचित्र. चार पाच घरांची मांडणी एकमेकांकडे तोंडं करून, सर्व घरांना एक सामाईक अंगण, आणि इथं पोहोचण्यासाठी एक चिंचोळी गल्ली. सर्व घरांची दारं सताड उघडीच असत. सगळ्या घरातील चिली-पिली या सामाईक अंगणात खेळत. ज्यांना मोठ्या मैदानात इतर मोठी मुलं खेळायला घेत नाहीत अशा साधारण दोन ते सहा वयोगटातील लहान मुलांचं हे हक्काचं खेळण्याचं ठिकाण होतं. त्यांच्या आयासुद्धा मुलं नजरे पासून फार दूर नको म्हणून तिथेच खेळायची परवानगी देत. दुपारच्या वेळी यांच्या खेळांचा पार दंगा उडायचा.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचा आज वाढदिवस

लेखक योगी९०० यांनी शुक्रवार, 23/01/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याचा म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज वाढदिवस. त्या निमित्त त्यांना मनापासून शुभेच्छा. म.टा. ने त्यानिमित्त एक विशेषांक काढला आहे. तो आपण येथे पाहू शकता. जय महाराष्ट्र !!!! खादाडमाऊ.

बंडखोर मिपा संपादकीय - मराठी आंतरजाल आणि त्याचा विकास (ऊहापोह)

लेखक शक्तिमान यांनी शुक्रवार, 23/01/2009 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर ०: (काही प्रतिसाद वाचून या लेखाबद्द्ल खुलासा करण्यासाठी हा डिस्क्लेमर टाकण्यात आलेला आहे) हा लेख विनोदी आहे असे समजून वाचावा. 'बंडखोर मिपा संपादकीय' ही पार्श्वभूमी केवळ विनोदनिर्मीतीसाठी वापरली आहे. डिस्क्लेमर १: येथे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेख काल्पनिक वाटल्यास त्यास लेखक जबाबदार नाही. या वेळचे बंडखोर मिपा संपादकीय हे एका गहन परंतु दुर्लक्षित विषयाला समर्पित आहे.

ओंजळ (देवद्वार छंद)

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 23/01/2009 10:10 या दिवशी प्रकाशित केले.
मन का उदास ओलावती डोळे खिन्नतेचे जाळे अंतरात... नीरव शांतता सुचेनात गाणी विसावे लेखणी कोरे सारे.. तडफड उरी कळावी का कुणा मनातल्या खूणा पुसटशा... शोधिते स्वतःला गाभ्यात या खोल देवुनीया मोल आसवांचे.. समजेना काही गेले कुठे सारे चैतन्याचे झरे मनातले... वाळवंट रुक्ष रणरण वाटा आयुष्य फुफाटा चोहीकडे.. थके जीव आता दूर मृगजळ रिती ही ओंजळ वाट पाहे...
Taxonomy upgrade extras

अधिक, अधिक आवडणारं जग.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 23/01/2009 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
" मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही आणि मानवाला ते सोसावं लागत असतानाही सुख साध्य होण्याजोगं आहे." मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं. त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला आणि जाऊन राहायाला अंमळ बरं वाटतं.

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 23/01/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो! हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!

प्रश्न

लेखक शुभान्गी यांनी शुक्रवार, 23/01/2009 03:15 या दिवशी प्रकाशित केले.
म्हणतात ना.... एका गालात मारले तर दुसरा गाल करावा पुढे... मग प्रत्येक जण मारल्याशिवाय जाईल का पुढे ? नेकी कर दरिया मे डाल...... मग एक दिवस स्वत:लाच बुडतान्ना नाही का पहाल? निन्दकाचे घर असावे शेजारी..... जर निन्दकच घुसला घरात,आदरतिथ्य करावे तरी? नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........ करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे? बोट दिले तर हात धरु नये..... पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे? चूक भूल द्यावे-घ्यावे.... वाटले मन मिपावर मोकळे करावे. अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट... अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट.