ओंजळ (देवद्वार छंद)
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मन का उदास
ओलावती डोळे
खिन्नतेचे जाळे
अंतरात...
नीरव शांतता
सुचेनात गाणी
विसावे लेखणी
कोरे सारे..
तडफड उरी
कळावी का कुणा
मनातल्या खूणा
पुसटशा...
शोधिते स्वतःला
गाभ्यात या खोल
देवुनीया मोल
आसवांचे..
समजेना काही
गेले कुठे सारे
चैतन्याचे झरे
मनातले...
वाळवंट रुक्ष
रणरण वाटा
आयुष्य फुफाटा
चोहीकडे..
थके जीव आता
दूर मृगजळ
रिती ही ओंजळ
वाट पाहे...
वाचने
4189
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
चांगली आहे कविता... अजून कविता 'फुलवा'... :)
सुंदर..कविता ..
वाह
खुपच सुंदर
कविता
सुरेख
व्वा...
ओंजळ
मस्तच
भावपूर्ण
फार छान
+१
छान
मस्त...
काय सुरेख !!
ओंजळ
उत्खनन :- आवडलेले लेखन.