बंडखोर मिपा संपादकीय - मराठी आंतरजाल आणि त्याचा विकास (ऊहापोह)
डिस्क्लेमर ०: (काही प्रतिसाद वाचून या लेखाबद्द्ल खुलासा करण्यासाठी हा डिस्क्लेमर टाकण्यात आलेला आहे)
हा लेख विनोदी आहे असे समजून वाचावा. 'बंडखोर मिपा संपादकीय' ही पार्श्वभूमी केवळ विनोदनिर्मीतीसाठी वापरली आहे.
डिस्क्लेमर १: येथे सत्य परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेख काल्पनिक वाटल्यास त्यास लेखक जबाबदार नाही.
या वेळचे बंडखोर मिपा संपादकीय हे एका गहन परंतु दुर्लक्षित विषयाला समर्पित आहे. गेले काही दिवस मिपावर सायलेंट-मोडमध्ये वावरताना जे अभ्यासपूर्ण विश्लेषण आम्ही केले ते आपणासमोर मांडताना (बंडखोर) पाहुण्या संपादकाला अत्यानंद होत आहे.
"मराठी आंतरजालचा विकास भांडणांमधूनच झाला आहे" - असे आमचे प्रामाणिक आणि क्रांतिकारक विधान आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे व मराठीबांधवांच्या मराठीप्रेमामुळे आंतरजालावर अनेक मराठी संकेतस्थळे उदयास व नावारूपास आली. याच सं.स्थळांना एकत्रितरित्या आणि ढोबळमानाने मराठी आंतरजाल असे संबोधले जाते. यामध्ये अनेक ब्लॉग्स्, वैयक्तिक सं.स्थळे, वर्तमानपत्रे, साहित्य-संगीताशी संबंधित सं.स्थळे यांचा समावेश होतो. आणि 'ऑनलाईन सोशल नेटवर्क्स्' (ऑ.सो.ने.) च्या निकषांमध्ये बसतील अशी मिपा, मनो*त, उ*क्रम इ. सं.स्थळे आहेत. या मराठी ऑ.सो.ने. चे महत्व आपण आता जाणून घेऊया. ब्लॉग्स्, वैयक्तिक सं.स्थळे, वर्तमानपत्रे इ. आंतरजालावर विखुरलेली आहेत. अनेक ब्लॉग्सवर महिनोन् महिने लेखन होत नाही. आणि उत्कृष्ट लेखन असणारे ब्लॉग्स् सापडणे महाकठीण! काही चांगले ब्लॉगही आहेत, परंतु तिथे चर्चा वगैरे करता येईल अशी नीटशी सुविधा नसते. त्यामुळे या विखुरलेल्या सं.स्थळांवर भरीव असे काही होत नाही. या सर्व सं.स्थळांचे एकीकरण हे म.ऑ.सो.ने.नी केले अहे. चार माणसं एकत्र आली की प्रथम चर्चा सुरु होते. अशा चर्चेसाठी मुबलक जागा ऑ.सो.ने.ने उपलब्ध करून दिली. लोकांना त्यांचे ब्लॉगवरील लिखाण प्रकाशित करण्याकरता अजून एक मंच मिळाला. यातून चांगल्या ब्लॉग्स् चे दुवे वाचकवर्गाला मिळाले. आधीसारखे वाचकांना लेखांकडे जावे न लागता, म.ऑ.सो.ने.द्वारे लेखच वाचकांकडे येऊ लागले. प्रतिसाद पाहून, सोपे तंत्रज्ञान पाहून अनेकांचा धीर चेपला व तेही ब्लॉग्स् काढून लेखन करू लागले. आणि तेच लेख म.ऑ.सो.ने. वरही आले. अशाप्रकारे म.ऑ.सो.नेंनी मराठी आंतरजालाची भरभराट सुरू केली! जसजशी म.ऑ.सो.नेंची संख्या वाढेल तसतशी मराठी आंतरजालाची वाढ अविरत चालूच राहील याबाबत आता कुणाचेही दुमत नसेल. (असले तरी वाचकांच्या मताला महत्व देण्या न देण्याचे अधिकार लेखकाधिन आहेत.)
आता या म.ऑ.सो.नेंचा जीवनक्रम पाहू -
- सुरूवातीला काही (ध्येयवेडे वगैरे) लोक एकत्र येतात (का, त्यांचे ध्येय काय वगैरे प्रश्नांची उत्तरे पुढे मिळतीलच.)
- द्रुपाल, गमभन वापरून एक सं.स्थळ बनवतात
- या स्थापनकर्त्यांचे मित्र या सं.स्थळाचे सदस्य बनतात
- सावकाशीने इतर लोक सदस्यत्व घेतात आणि हळूहळू हे सं.स्थळ बहरू लागते
- लेखांचा पाऊस पडतो आणि प्रतिसांच्या नद्या वाहू लागतात. या नद्या गढूळ होऊ नयेत आणि धोक्याची पातळी ओलांडू नयेत म्हणून मग प्रशासनाची स्थापना होते. संपादक महोदयांची नेमणूक होते.
- आणि मग स्थळाची भरभराट होते. आणि मराठी आंतरजालाला बहर येतो.
- माणूस हा एक सामाजिक प्राणी असून मराठी माणूस त्याला अपवाद नाही
- स्वतःचे अप्रकाशित टुकार लेखन प्रकाशित करण्यासाठी
- आपण यू.एस. ऑफ ए ला जाऊन आलो ते सांगण्यासाठी
- इतरांच्या लेखनाला जळजळीत प्रतिसाद देऊन वातावरण गढूळ करण्याकरता
- कंपूबाजीसाठी
- स्वत: बहिर्जी नाईंकाचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाल्यामुळे शत्रूच्या स्थळावर हेरगिरी करण्याकरता
- शत्रूस्थळावर आंतरजालावरील प्रसिद्ध व्यक्तिंच्या नावे फेक आयडीज घेऊन शिवीगाळ करण्याकरता
- फेक आयडी काढून आपणच आपल्या टुकार लेखनावर दाद देणारे प्रतिसाद टाकायला
वाचने
9044
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
आवड्ला पण काहि तरी खटक्तय
In reply to आवड्ला पण काहि तरी खटक्तय by घाशीराम कोतवाल १.२
स्वतःचे
In reply to आवड्ला पण काहि तरी खटक्तय by घाशीराम कोतवाल १.२
युद्धात,
चांगले विश्लेषण...
बंडखोरी कशासाठी?
In reply to बंडखोरी कशासाठी? by विसुनाना
+१
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +२ by धनंजय
मराठी
'बंडखोरी'......
लेख
पुलेशु
आपण यू.एस.
सहीरे !!
लेख ऑफ द इयर! :)
In reply to लेख ऑफ द इयर! :) by विसोबा खेचर
...
जौ द्या.
लेख छान
लेख छान
लेख आवडला....पण
अजून काही...
प्रतिक्रिया
In reply to प्रतिक्रिया by मुक्तसुनीत
हे सगळे
In reply to हे सगळे by अवलिया
हाहा
विकास.....
हम्म..
In reply to हम्म.. by प्राजु
(प्राजु
In reply to (प्राजु by कोलबेर
याच न्यायाने
In reply to याच न्यायाने by मुक्तसुनीत
ते माहित होते हो..
In reply to ते माहित होते हो.. by कोलबेर
बापरे... रोज
In reply to (प्राजु by कोलबेर
अहो..
आता मी सुखाने निवृत्त होतो
In reply to आता मी सुखाने निवृत्त होतो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सर्केश्वर
In reply to सर्केश्वर by अवलिया
छ्या !
In reply to छ्या ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
छे छे -- मी
मस्त