प्रश्न
लेखनविषय:
म्हणतात ना....
एका गालात मारले तर दुसरा गाल करावा पुढे...
मग प्रत्येक जण मारल्याशिवाय जाईल का पुढे ?
नेकी कर दरिया मे डाल......
मग एक दिवस स्वत:लाच बुडतान्ना नाही का पहाल?
निन्दकाचे घर असावे शेजारी.....
जर निन्दकच घुसला घरात,आदरतिथ्य करावे तरी?
नेहमी दु:खीतान्चे अश्रू पुसावे........
करावे काय स्वता:च्याच डोळ्यात असतील आसवे?
बोट दिले तर हात धरु नये.....
पण आधाराचे बोटच नाही दिसले तर काय करावे?
चूक भूल द्यावे-घ्यावे....
वाटले मन मिपावर मोकळे करावे.
अन्तःकरणातील विचारान्ना करुन दिली वाट...
अमूल्य सल्ल्यान्ची पहत आहे वाट.
वाचने
1762
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चूक भूल
In reply to चूक भूल by विसोबा खेचर
धन्यवाद...
मस्त!
+१
छान
खुपच छान! -