...मी आहे.
...मी आहे.
तू घेतलेला प्रत्येक श्वास,
तू सोडलेल्या प्रत्येक
प्र:श्वासाला सांगेल ... मी आहे.
तुझ्या जीवनात आलेले
मोजके सुखाचे क्षण, तुझ्या
प्रत्येक दु:खद क्षणाला
सांगतील ... मी आहे.
मधुबनातून मरुभुमीकडे
वाहणार वारा, तुझ्या
थकलेल्या मनाला सांगेल ... मी आहे.
तृशार्त वाटसरुला क्रुतार्थ करणारी
आणि सागराकडे धावणारी
नदी तुला सांगेल ... मी आहे.
काट्यांवर चालून घायाळ
झालेल्या तुझ्या पायांना
काटेरी सिंहासनावर पहुडलेले
गुलाब तुला सांगेल ... मी आहे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
