Skip to main content

साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन

लेखक मैत्र यांनी शुक्रवार, 13/02/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
एकदम वेगळं मुखपृष्ठ आणि नाव वाचून कुतूहलाने एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि संपल्यावरच खाली ठेवलं. मूळ लेखिका: कारमेन बिन लादेन. अनुवाद - अविनाश दर्प, न्यूझीलंड. मेहता पब्लिशिंग हाऊस. परीक्षण लिहावं असं लिखाणात विशेष नाही. पण परिचय लिहावाच असं पुस्तक फार महत्त्वाचं आहे असं वाटलं. ते वाचायला मिळालं तर उत्तमच पण नाही जमलं तर गोषवारा इथे द्यावा आणि पुस्तकापेक्षा त्या संदर्भात काही चर्चा व्हावी असं वाटलं... क्रमशः चा लागण न करता एक मोठं लिखाण मांडतो आहे.

गुगल रीडर

लेखक माझी दुनिया यांनी शुक्रवार, 13/02/2009 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी फाफॉ न्याहळक वापरते. विविध ब्लॉग्ज आणि संकेतस्थळे वाचण्याकरता गुगल रीडरद्वारे फिड्सचा वापर करते. गेले ४-५ दिवस गुगल रीडर उघडतच नाहिये. कोणाला असा काही अनुभव आला आहे का ? गुगल च्या इतर सेवा मात्र व्यवस्थित काम करत आहेत.फाफॉ व्यतिरीक्त आयई ७, ऑपेरा आणि क्रोम अश्या सगळ्या न्याहळकामार्फत तपासणी केली. परंतु प्रश्न सुटला नाही.असे का होत असावे ? तात्पुरती दुरुस्ती चालू असेल अश्या शंकेने मी पर्याय म्हणून सध्या गुगल रीडर चे मोबाईल करता चे व्हर्जन वापरत आहे. जे व्यवस्थित आणि पटकन उघडतं.

स्टार वार!!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 13/02/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
रशिया आणि अमेरिकेतील एका खाजगी संघटनेच्या उपग्रहाची अंतराळात टक्कर झाली आहे या टकरीत दोन्हि उपग्रह पुर्णपणे निकामी झाले आहेत जगाच्या ईतिहासात हि घटना प्रथमच घडली आहे ईथे पुर्ण बातमी वाचा

कुणाच्या ह्या वेणा

लेखक नीधप यांनी शुक्रवार, 13/02/2009 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका जुन्या चारोळीला घेऊन मीटरमधे कविता लिहायचा प्रयत्न. पहिले कडवे ही जुनी चारोळी. कसल्या या खुणा कोण येउन गेलं इथे कुणाच्या ह्या वेणा रूतल्यात जिथे तिथे गेली असतिल इथून काही आतूर पावले थोडे घुंगरू पैंजणातून अलवार ओघळले वाळलेल्या पानावर हे खळ्ळकन पाणी आत आत कुठेतरी दुखली असेल राणी झाडे काळवंडलेली हवाही काळीशार थिजलेला गारवा रूततोय आरपार कुणी मंतरून ठेवले की शाप हा भोवला उभ्या राजस संध्येचा सूर असाच गोठला -नी
Taxonomy upgrade extras

शिरोड्याचं हवामान.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 13/02/2009 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवसानी मी कोकणातल्या शिरोडे गावात गेलो होतो.गोव्यातपण एक शिरोडे आहे.रेडीचा समुद्र किनारा जवळच आहे.ह्या समुद्रामुळे जवळच्या या गावात हवामानवर खूपच परिणाम होत असतो. आपण ज्यावेळी भेटतो त्यावेळी बहुदा हवामान हा विषय म्हणून कधी कधी आपल्या बोलण्यात येत असतो.हवामान हे एक कारण आहे.ते आपला दुवा सांधून वास्तविकतेला आकार देते.आपण त्या हवामानातून श्वसन करतो.आपण त्यातच असतो.

निर्ल्लज्जपणा, हलकटपणा, मयताच्या टाळूवरचं लोणी खातील भडवे!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 12/02/2009 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
काही खाजगी कंपन्यांना म्हणे बाबा आमट्यांच्या आनंदवनाखाली कोळश्याच्या खाणी असल्याचा शोध लागला आहे. त्यांनी भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्य सरकारशी संधान साधून आता तिथे कोळश्याच्या खाणी खणण्याचा पाताळयंत्री बेत आखला आहे..! कालच ई-मराठी, की स्टार माझा यापैकी कुठल्याश्या वाहिनीवर ही संतापजनक बातमी पाहण्यात आली! आमटे परिवाराचा या योजनेला अर्थातच ठाम विरोध आहे हेही दाखवण्यात आले! ६०-७० वर्षांपूर्वी एका ओसाड माळरानावर एक महामानव पोहोचला आणि त्याने तिथे नंदनवन उभं केलं, तेव्हा हे शोध लावणारे लोक कुठे गेले होते भोसडीचे?? पण आमच्या सरकारला त्याचे काही सोयरसुतक नाही! कोण बाबा आमटे?

प्रेमदिनाची पूर्वसंध्या

लेखक जयवी यांनी गुरुवार, 12/02/2009 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस उगवला हळुवार अलार्म पण किणकिणला नाजुक कूस वळवून बघते तर नवरा उभा हसतमु़ख हातातलं गुलाबाचं फुल लाल गालावरुन फिरलं पिसासारखं "How Romantic Jaanu !" मन नाचलं थुईथुई मोरासाऱखं लॉनवर नेलं बागेतल्या त्यानं हातात हात घेऊन "Tea....Your Highness..." म्हणाला हातात कप देऊन मूडात होती भलतीच स्वारी म्हटलं घ्यावा भाव खाऊन जे जे वाटतंय करवून घ्यावं ते ते घ्यावं करवून "कैसे मिजाज है आपके जानम ?" जेव्हा सवाल आला म्हटलं "जायचंय आज मला... "रब ने बना दी" बघायला " एरव्ही ह्याला शाहरुखची त्या कायम असते ऍलर्जी आज मात्र चक्क बोलला, "जैसी आपकी मर्जी " हॉलवरची झुंबड बघताच जीव मा
Taxonomy upgrade extras