मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गुरगुट्या भात

श्रीयुत संतोष जोशी · · पाककृती
साहित्य : चांगल्या प्रतिचे आंबेमोहोर तांदूळ २०० ग्रा. ; साजूक तूप ; मेतकूट ; पापड ( पोह्यांचा ) कृती : तांदूळ स्वच्छ धुवून पंच्यावर पूर्ण एक दिवस वाळवून घ्या. त्याची हाताने भरडून होईल इतपतच कणी करा. साध्या भातास आपण दुप्पट पाणी ठेवतो, गुरगुट्या भातास चौपट पाणी लागते. आधी पाणी उकळवत ठेवावे, उकळल्यावर त्यात तांदूळ घालावे आणि साधारणपणे मध्यम आचेवर ४० मिनिटे हा भात होण्यास लागतात. भात होता होता त्यात चवीप्रमाणे मीठ व साजूक तूप घालावे. भात उतरवल्यावर लगेच खाण्यास बसले पाहिजे. बरोबर मेतकूट ; सायीचं अधमुरं दही ; आणि पोह्यांचा पापड नसेल तर मजा येणार नाही. हा भात फक्त सकाळी ९.०० आत खाल्ला तरच याची मजा अनुभवता येईल. कैरीचं ताजं लोणचं पण छान लागेल बरोबर खायला.

वाचन 6760 प्रतिक्रिया 0