माझ्या एका जुन्या चारोळीला घेऊन मीटरमधे कविता लिहायचा प्रयत्न. पहिले कडवे ही जुनी चारोळी.
कसल्या या खुणा
कोण येउन गेलं इथे
कुणाच्या ह्या वेणा
रूतल्यात जिथे तिथे
गेली असतिल इथून
काही आतूर पावले
थोडे घुंगरू पैंजणातून
अलवार ओघळले
वाळलेल्या पानावर
हे खळ्ळकन पाणी
आत आत कुठेतरी
दुखली असेल राणी
झाडे काळवंडलेली
हवाही काळीशार
थिजलेला गारवा
रूततोय आरपार
कुणी मंतरून ठेवले
की शाप हा भोवला
उभ्या राजस संध्येचा
सूर असाच गोठला
-नी
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5079
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय
तेच बरंय.
In reply to काय by घाशीराम कोतवाल १.२
वेणा
हो
In reply to वेणा by महेंद्र (verified= न पडताळणी केलेला)
खुप
छान
+१ हेच
In reply to छान by आनंदयात्री
कविता छान
हो?
In reply to कविता छान by अवलिया
:)
In reply to हो? by नीधप
हं
In reply to :) by अवलिया
अर्थ काय
अलवार =
In reply to अर्थ काय by अनिरुद्धशेटे
नी, मस्त
नक्की
सहजपंत
In reply to नक्की by सहज
सुरेख !
छान आहे !!
कविता आवडली.
>>कालांतरान
In reply to कविता आवडली. by मुक्तसुनीत
अतिशय
सुंदर
छान कविता!
सुरवातीला
सुरेख कविता.
उदास पण छान
वा .. कविता
सुरेख !!