Skip to main content

शिक्षणात हवे आहेत बदल

लेखक त्रास यांनी रविवार, 15/02/2009 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत. त्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत जे घडते ते म्हणजे त्यांना त्याच्या आवडीच्या अनेक गोष्टी आयुष्यात लवकर करता येतात. असे अनेक चांगले शिकलेले लोक की ज्यांना शिकविण्याची आवड असेल त्यांना शाळांतुन Guest Teacher करुन तास घ्यावेत. ह्यासाठी शाळांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावे. वरील बदलाचा परिणाम मुलांवर तसेच शिक्षकांवर वरही पडेल व त्यांना प्रोफ़ेशन, व इतर हजारो बाबींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल. २. असेच Guest Teacher तुम्हाला निवृत्त शिक्षकांतही दिसतील.

च्याव ज्झ

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 15/02/2009 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
चीनला जायचे तर सिंगापुरला लेकराला भेटुनच जावे असा विचार करुन आस्थापनेच्या पर्यटन संस्थेला सिंगापुर मार्गे प्रवासाची व्यवस्था करायला सांगितली तर त्यांनी नकारघंटा वाजवली. म्हणे सिंगापुर एअरलाईन्सने पर्यटन संस्थांना अडत देणे बंद केल्याने सर्व पर्यटन व्यावसायिक संस्थांचा सिंगापुर एअरलाईन्सवर सध्या बहिष्कार आहे. त्यांनी शिताफीने हॉंग कॉंग, कुआला लुंपुर, बॅंकॉक अशा तीन रुपरेषा आखुन दिल्या. पण जाणार तर पोराला भेटुनच जाऊ यावर मी ठाम होतो. मग मी सिंगापुर एअरलाईन्सच्या संस्थळावर गेलो आणि चार दोन वेळा मागे पुढे होता करता अखेर हव्या त्या तारखांची तिकिटे जमवली.

लागण व्हॅलेंटाईनची!

लेखक रेवती यांनी रविवार, 15/02/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, दरवर्षीप्रमाणेच ह्याही वर्षीच्या व्हॅलेंटाईनला पाच वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवली. सहाजिकच चेहेर्‍यावर हसू पसरलं. चतुरंग हसण्याचं कारण न विचारते तरच नवल. तर त्याचं असं झालं २००४ सालची गोष्ट. आमच्या धाकट्या बंधूराजांच्या लग्नानिमित्त मी मुलाला घेऊन पुण्याला गेले होते. रंगरावांना कामातून (नेहेमीप्रमाणेच) सुट्टी मिळाली नव्हती त्यामुळे ते अमेरिकेतच होते. आता माझं माहेर हे लग्नघर झालेलं त्यामुळे सहाजिकच गडबड, धावपळ चालू होती. नवर्‍यामुलाला प्रथेप्रमाणे कमितकमी रजा मिळाली होती! मानाची मोठी करवली असल्याने सगळे महत्त्वाचे निर्णय माझ्याकडेच सोपवले होते.

मेथीच्या वड्या.

लेखक स्मिता श्रीपाद यांनी रविवार, 15/02/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आज मी बर्‍याच दिवसांनी आपल्या भेटीला येते आहे.. नवीन पाकॄ घेउन ..गोड मानुन घेणे.....तिखट पाकॄ असल्याने..तिखट मानुन घेणे असे म्हणता येइल का ? ;-) मेथी ही पालेभाज्यांच्या परिवारातली अतिशय गुणी भाजी...जास्तित जास्त लोकांना आवडणारी....आणि तिचे प्रकार तरी किती असावेत... मेथी मटर मलाई असो....डाळ मेथी असो...मेथीचे ठेपले असोत..किंवा..अगदी साधी..पीठ पेरलेली मेथी असो.....मस्तच लागते.... आज मी आणल्यात मेथी वड्या..सणासुदीला पानची डावी बाजु सजवायला आपण भजी,अळु वडी,सुरळी वडी ई.ई.

मराठी शाळेचे भारुड

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 15/02/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित मूळ कवीने आजच्या मराठी शाळांची अवस्था बघितली असती तर हेच विचार व्यक्त केले असते असे वाटते.
Taxonomy upgrade extras

नाव + आडनाव

लेखक त्रास यांनी रविवार, 15/02/2009 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
असे असल्यास मजा येते- भावना प्रधान शहा निशा आणखी काही उदाहरणे माहित असल्यास कळवावी.

संपादकांचा कौल रद्द..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 15/02/2009 07:05 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच इथे सुशीलने मांडलेला आवडत्या संपादकांचा कौल रद्द केला आहे. मिपाचे सगळेच संपादक मिपाकरता सारखेच महत्वाचे आहेत, त्यात डावं-उजवं, लहान-मोठं असं कुणीच नाही! सबब, हा कौल अनाठायी ठरवला गेला असून रद्द करण्यात येत आहे.. सुशीलराव, पुन्हा इथे मिपावर येऊन काड्या घालण्याआधी आम्हाला जरा विचारत जा, अन्यथा आपली मेहनत फुकट जाईल! :) आपला, (संपादकांचा ऋणी) तात्या.

कसला व्हॅलंटाईन डे...?

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 14/02/2009 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आहो... इथे परदेशात कोणाला ही ह्या वाळणताई डे चे कौतूक नाही. काही जणांना तर ह्याचा अर्थ पण ठावूक नाही. आपणच भारतीय मुर्ख..उगाचच कोणीतरी काही प्रथा सुरू करतो आणि पुर्ण भारतभर वारे पसरते. जे लोकं प्रेमात आहेत (म्हणजे ज्यांचे प्रेमप्रकरण चालू आहे) त्यांना तर आजचा दिवस म्हणजे "सोनियाचा दिन"" असेच वागत असतात. (आणि गंमत म्हणजे बरोबर ९ महिन्यांनी बाल दिन (children's day)). एवढ्याच उत्साहात आपण दसरा, संक्रात साजरा करतो का? हाच प्रश्न सात च्या आत घरात ह्या चित्रपटात विचारला होता. बाकी जाऊद्या हो.

तिचा जन्मदिन, अर्थात व्हॅलेन्टाईन डे..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 14/02/2009 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
आज १४ फेब्रुवारी की कायसा दिवस आहे, दुनिया हा दिवस 'व्हॅलेन्टाईन डे' म्हणून ओळखते. चांगलं आहे! परंतु आम्ही मात्र आजचा दिस हा 'तिचा' जन्मदिवस म्हणून ओळखतो..! काय विलक्षण योगायोग आहे पाहा! त्या शापित यक्षिणीचा, त्या जिवंतपणी दंतकथा बनलेलीचा जन्म आणि प्रेमदिन हे दोन्ही एकाच दिवशी...! तिची मोहकता, तिचं सौंदर्य, तिची अदाकारी, तिचं हास्य, तिचा अभिनय, तिची प्रत्येक गोष्टच जगावेगळी होती, खानदानी होती! ती..! जिथे सौंदर्याच्या सर्व व्याख्या संपतात, जिथे सुरेख-सुंदर-मधाळ-अवखळ-सौंदर्यवती-लावण्यवती इत्यादी अनेक शब्द केवळ अन् केवळ तोकडे पडतात!