Skip to main content

सावर ग स्वतःला .....

लेखक मितालि यांनी सोमवार, 16/02/2009 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
सावर ग स्वतःला आवर तुझ्या मनाला... निघून गेलेले क्षण मुठीतील वाळू दोन्ही सारखेच घट्ट पकडशिल तितके वाहून जाती आठवाणीचे झुले मन झुलवता झुलवता सरतील सांज वाति निरव शांततेची उरेल रात एकटीच भवती गेले वाहून घर लाटे सवे तरी पुन्हा नवे बांधत होतो बालपणीची जिद्द सखे वापर या घडीला सावर ग स्वतः ला आवर तुझ्या मनाला...

माझे आवडते प्रेरणावाक्य

लेखक त्रास यांनी सोमवार, 16/02/2009 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
“You see things and you say, ‘Why?’ But I dream things that never were and say, ‘Why not?’” – George Bernard Shaw तुमचे कोणते आहे आवडते प्रेरणावाक्य?

आवशीचा घो ह्या बजटच्या ;)

लेखक दशानन यांनी सोमवार, 16/02/2009 14:39 या दिवशी प्रकाशित केले.
अरे कोणी बजेट व्यवस्थीत बघीतले आहे काय ??? नाय पहील्या पंधरा मिनिटातच मला चक्कर आली व मार्केटचा हार्ट फेल !
  • शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने तीन लाखांपर्यॅंतचे कर्ज मिळणार
  • मध्यप्रदेश व राजस्थानमध्ये मध्ये दोन आयआयटी स्थापन करणार
  • शैक्षणिक कर्ज योजनेचे पुनर्विलोकन
  • सन २०१० पर्यंत सहा नव्या आयआयएम सुरु करणार
  • दोन नवीन पेन्शन योजनांची घोषणा
  • कृषी क्षेत्रासाठी २५ राज्यांसाठी १३,५०० कोटी रुपयांचे पॅकेज
  • सर्व शिक्षा अभियानासाठी १३, १०० कोटी रुपये

आई

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 16/02/2009 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
आई फ़क्त एक शब्द नाही .... एक भावना पवित्र आहे .. आई मधेच "आ"र्तता अणि आई मधेच "ई"श्वर आहे .

दवबिंदू

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी सोमवार, 16/02/2009 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य ना..... एखाद्या दवबिंदू सारखं असल पाहीजे, छोटसंच पण अस की .... Living Life to its Fullest! तस पाहीलं तर दवबिंदू आहे काय ? एक थेंब पाण्याचा ? का एक क्शण .... गोठून गेलेला ? जगणं आणि मरणं सुद्धा दैवाच्या स्वाधीन केलेला ? खरंच.. जगता आलं पाहीजे एका दवबिंदू सारखंच ! एकदातरी ! पाणी असून वाहता न आल्यचं दु:ख नाही की , मोत्यासरखं दिसलो त्याच सु:ख नाही. कधी Observe केलंय का एखद्या दविबंदूला ? त्यात ना... "सुर्याला" स्वत:त पहाण्यची.... सामावण्यची... जिद्द म्हणा किंवा ताकद म्हणा... ती असते !! हां..

भेट तुझी-माझी स्मरते...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 16/02/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारा : हा लेख राजकारणाविषयीचे (जरा अतीच सविस्तर) विडंबन असून, राजकारण न आवडणार्‍या व्यक्तींनी त्याकडे न फिरकणेच त्यांच्या आरोग्यासाठी उपकारक राहील. मीडियावाले हल्ली "टीआरपी'साठी वाट्टेल त्या बातम्या देत सुटले असल्याचा आरोप खराच आहे की काय, अशा शंकेला पुरेपूर वाव मिळण्यसारखंच मीडियाचं वागणं आहे. कोणत्याही साध्या भेटीतून, चर्चेतून, वक्तव्यातून ब्रेकिंग-एक्‍स्कुझिव्ह न्यूज शोधण्याचा प्रयत्न करण्यातूनच मीडियाची विघ्नसंतोषी, मतलबी वृत्ती ठायीठायी जाणवू लागली आहे. मध्यंतरी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली.

मोक्का उर्फ मकोका

लेखक गुळांबा यांनी सोमवार, 16/02/2009 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
मोक्का म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा. माझ्या माहिती प्रमाणे हा कायदा अजामीनपात्र आहे. ज्या गुन्हेगाराला लागू होईल तो लवकर तुरुंगातुन बाहेर यायाची शक्यता कमीच. म्हणुन ह्या कायद्याला सर्व घाबरुन असतात. आता आपण भारतातील एका बँकेचे उदाहरण पाहु. या क्षयज्ञ बँकेला १५ ऑगस्टला २००८ ला स्वातंत्रदिनाची, १७ ऑगस्टला रविवारची व १९ ऑगस्टला पतेतीची सुटी होती. त्या बँकेच्या कामगार युनियनने दि. १६ व १८ ला संपाची हाक दिली व त्या बँकेचे हजारो कर्मचारी संपावर गेले. नतीजा असा झाला कि सलग ५ दिवस १५ ऑगस्ट २००८ ते १९ ऑगस्ट २००८ बंद राहिल्या. अर्थव्वस्थेचे करोडोचे नुकसान झाले.

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

बिल्लु ( ) ... परीक्षण .......सुसह्य ( संशयाचा फायदा...)

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 16/02/2009 00:21 या दिवशी प्रकाशित केले.
मी जालावरची चित्रपटाची परीक्षणे वाचत नाही फारशी... पण टीव्हीवरती काही चॅनलवरती या चित्रपटाविषयी संमिश्र परीक्षणे पाहिली, काही समीक्षकांनी चित्रपटाला मजबूत झोडलेलाही पाहिले..... त्यामुळे चित्रपटाविषयी अपेक्षा आधीच कमी झालेल्या होत्या.... तरीही एका मित्राच्या आग्रहाने सिनेमा पहायचा योग आला... ... अपेक्षा अगदीच खाली असल्याने मला चित्रपट आवडला, असा निष्कर्ष मी काढला....... ....प्रियदर्शनचा सिनेमा म्हणजे कुठल्याशा मल्याळम किंवा तमिळ सिनेमाची फ्रेम टू फ्रेम कॉपी असणार हे खरंच... तसंच आहे... गोष्ट साधीच...