Skip to main content

करोनाचा इशारा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 15/04/2021 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे आजपर्यंत जगात अनेक साथी येऊन गेल्या असल्या तरी आज संपूर्ण जग करोना साथीपुढे हतबल झालं आहे. जगाने असा दीर्घकालीन लॉकडाऊन याआधी अनुभवला नव्हता. करोनाने माणसाच्या अस्तित्वालाच सुरुंग लावला. अर्थव्यवस्थेला प्रचंड हादरा दिला. मात्र अजूनही अनेक लोक करोनाला गांभीर्याने घेत नाहीत. ज्यांच्या कुटुंबात, नातेवाईकांत, मित्रमंडळीत करोनाने जीव घेऊन वा जबर आर्थिक कींमत मोजून जोरदार धक्का दिला तेवढेच लोक जागरुक असल्याचं दिसून येतं.

अध्यात्माची भूमिती

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 14/04/2021 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
अनादिच्या अलिकडचा "अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला. मग अनंताला स्पर्श करू धजणारा, ज्ञानगम्य असा, "ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला. "अ" ला "ज्ञ"शी जोडणारी "अज्ञ" ही रेषा आखली. ह्या रेषेवर माझ्याच जवळपास कायम घोटाळणारा "हम्" हा बिंदू निवडला. "अज्ञ" या रेषेशी लंबरूप, फटकून असणारे, "सोs" हे प्रतल असे निवडले की ते "अज्ञ" रेषेला "हम्" बिंदूत छेदेल. "सोs" प्रतलावरील १,२,३,....
काव्यरस

लस आणि शेरलॉक

लेखक Bhakti यांनी बुधवार, 14/04/2021 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
“अहो उद्या आपला लसीचा दुसरा डोस आहे” रजनीकाकू उत्साह –भीती मिश्रित आवाजात अशोककाकांना आठवण करून देत होत्या. “हो हो,अग पण बातम्या येत आहेत की लस संपली आहे.काय माहित आपल्या सेन्टरवर काय परिस्थिती असेल.”अशोक काकांना लस मिळेल की नाही धास्ती वाटत होती. “मीना वहिनींना फोन करतेय तर त्यांचा फोनच लागतं नाही,मागच्यावेळी आम्ही दोघींचा लसीसाठी नंबर येऊ पर्यंत चांगला टाइमपास झाला होता,यावेळीही त्या असत्या तर तसाच वेळ गेला असता.” रजनीकाकूंना उद्या वेळ कसा जाईल याचा प्रश्न पडला होता. उद्या लस मिळेल का याचा विचार करत दोघेही रात्री लवकर निजले. दुसऱ्या दिवशी रजनीकाकू पहाटे लवकरच उठल्या एखाद्या दूर गावाला देवाच्

नव्हतं ठाऊक

लेखक सरीवर सरी यांनी मंगळवार, 13/04/2021 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
आता मनाच पाखरू घर कुठे बांधणार? नव्हतं ठाऊक आठवणींच झाड तू कधी तोडणार| भाळला होतास अखंड चिवचिवाटावर, नव्हतं ठाऊक ध्वनीसाज बोलीचा तू निष्पर्ण करणार| निराळा पसारा जाणूनही.. आवरणार, नव्हतं ठाऊक झाले​ पसा~याचे जाळं तू शिकारी कोळी असणार|
काव्यरस

आज काय घडले... फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी मंगळवार, 13/04/2021 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
केतकर शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ.

फिरुनी नवी जन्मेन मी..........

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी मंगळवार, 13/04/2021 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
फिरूनी नवी जन्मेन मी….! समोरचं फाटक उघडलं, आणि आमची गाडी बापटांच्या बंगल्यात शिरली. प्रशस्त दिमाखदार वास्तू , जणू हसून स्वागत करत होती. खूप मोठी जागा, अन् तेवढाच मोठा बगीचा...! एप्रिल महिना असल्यानं, मोगऱ्याचा वास सर्वत्र दरवळला होता. रंगीबेरंगी फुलांची छोट्या झुडपांवरची नैसर्गिक सजावट लक्ष वेधून घेत होती. मन अगदी प्रसन्न झालं. पोर्चमध्ये गाडी थांबली, आणि आम्ही तिघं उतरलो. श्रीराम बापट, हे एक प्रतिष्ठित बांधकाम व्यवसायिक, आणि माझे पती नचिकेत साने हे यशस्वी उद्योजक..! काही महिन्यांपूर्वी पाटणकर डॉक्टरांच्या मुलाच्या लग्नात या दोघांची ओळख झाली होती.

गुढीपाडवा - शक्रोत्सवातील इंद्रध्वजपूजेचे प्राचीन साहित्यातील वर्णन

लेखक प्रचेतस यांनी मंगळवार, 13/04/2021 06:27 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्र शुद्ध प्रतिपदा-गुढीपाडवा, नववर्षाचा पहिला दिवस, शालीवाहन शक, या दिवशी आपण गुढ्या उभारुन नववर्षाचे स्वागत करतो. गौतमीपुत्र सातकर्णीने याच दिवशी शकांचा पराभव केला असे मानले जाते आणि त्याच विजयाप्रीत्यर्थ हा शक सुरु केला असे मानले जाते. अर्थात हा विवाद्य विषय कारण मुळात गौतमीपुत्राने नहपानाचा पराभव केला ते इसवी सन १२५ ते १३० च्या आसपास असे मानले जाते तर कुशाण वंशीय कनिष्काची राजवट सुरु झाली ते इस ७८ मध्ये, साहजिकच हा संवत्सर कनिष्काने सुरु केला असावा आणि नंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी हा प्रचलित केला असे मानता येते.

गुढीपाडव्यानिमित्त पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या बनवण्याची पाककृती

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 13/04/2021 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याची नैमित्तिक खरेदी - झेंडूची फुले, कडुलिंबाचा मोहोर, आंब्याची, केळीची पाने, फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाठ्या इ. साठी बाहेर जायला आज दिवसभरात वेळ मिळाला नाही. मग ही खरेदी उद्या सकाळी उठून करावी असं ठरलं. रात्री जेवणे झाल्यावर, गाठ्या करून बघाव्यात असा विचार पत्नीच्या मनात आला. मीही तिला मदत करायला (म्हणजे लुडबुड करायला) तयार झालो! या गाठ्या आम्ही trial and error basis वर केल्या आहेत. त्या बऱ्याच बऱ्या जमल्या आहेत असं वाटत आहे. या वीकांताला अजून प्रयत्न करून घरीच गाठ्या बनविण्याचं कौशल्य प्राप्त करायचंच असं ठरलं आहे.

पदकांच्या / बत्ताश्याच्या गाठ्या बनवण्याची पाककृती

लेखक वामन देशमुख यांनी मंगळवार, 13/04/2021 01:08 या दिवशी प्रकाशित केले.
गुढीपाडव्याची नैमित्तिक खरेदी - झेंडूची फुले, कडुलिंबाचा मोहोर, आंब्याची, केळीची पाने, फळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गाठ्या इ. साठी बाहेर जायला आज दिवसभरात वेळ मिळाला नाही. मग ही खरेदी उद्या सकाळी उठून करावी असं ठरलं. रात्री जेवणे झाल्यावर, गाठ्या करून बघाव्यात असा विचार पत्नीच्या मनात आला. मीही तिला मदत करायला (म्हणजे लुडबुड करायला) तयार झालो! या गाठ्या आम्ही trial and error basis वर केल्या आहेत. त्या बऱ्याच बऱ्या जमल्या आहेत असं वाटत आहे. या वीकांताला अजून प्रयत्न करून घरीच गाठ्या बनविण्याचं कौशल्य प्राप्त करायचंच असं ठरलं आहे.

तो कोण होता? (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/04/2021 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या दोघांची भेट घडणे हा निव्वळ योगायोग असेल, असे मी अजिबात म्हणणार नाही. तो योगायोग असूच शकत नाही. योगायोगाने जुळून येणाऱ्या गोष्टी, एवढ्या समर्पक असूच शकत नाहीत. बहुतेक एखाद्या अदृश्य शक्तीनेच आम्हाला एकमेकांशी भेटवले असणार. पण एक गोष्ट कबुल करेन मी, या आमच्या भेटीचे सर्व श्रेय त्यालाच जाते. तोच माझ्याकडे आला होता. अगदी अनाहूतपणे. तो मला भेटला! बोलला! तेव्हा मला जाणवले की, त्याचे मला भेटणे किती जरुरीचे होते. त्याची भेट मी आयुष्यभरात कधी विसरेन, कधी तो विस्मरणात जाईल असे होणारच नाही. त्या एका भेटीत मला तो किती अचंबित करून गेला? हे केवळ माझ्या अंतर्मनाला माहीत.