Skip to main content

जीवनातल्या येणार्‍या कसोटीमधून अस्तीत्व कसं टिकवायचं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/02/2009 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
"स्त्रीयांना बहुदा विनम्र राहण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.पण माझ्या जीवनाने माझी कसोटी भरपूर घेतली.मला वाटतं, माझ्यातला धीटपणा,आणि खंबीरपणा आणि त्याऊप्परही माझ्यात असलेला आपमतलबीपणा ह्याचा चांगल्यातर्‍हेने माझं मला त्या कसोटीतून पार पडण्यात उपयोग झाला " काण्यांच्या नलूला सर्व नेहमीच धट्टिंगण म्हणायचे.कारण मुलींपेक्षा ती मुलांतच जास्त वेळ घालवायची.पण त्यावेळी जरी सर्व असं म्हणत असले तरी ते तिचं वागणं धीटपणाचं होतं हे लक्षात येत नव्हतं.आता नलू एक मुलाची आई झाली असून आता ती एका कॉलेजमधे लेक्चरर म्हणून काम करते. एकदा मी बसच्या लाईनमधे उभा होतो.माझ्या मागे नलू आपल्या मुलाला घेऊन उभी होती.चूळ्

स्लमडॉग मिलिएनिअर - माझे परीक्षण

लेखक समीरसूर यांनी बुधवार, 25/02/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कालच 'स्लमडॉग मिलिएनिअर' हा चित्रपट पाहिला. बरीच उलट-सुलट मते, नावावरून झालेले वादंग, गोल्डन ग्लोब, बाफ्टा, ऑस्कर इत्यादी पुरस्कारांची लयलूट, भारताच्या ओंगळ आणि हिडीस चेहर्‍याची केलेली वारेमाप प्रसिद्धी इत्यादी बाबींमुळे हा चित्रपट गेले कित्येक आठवडे कायम चर्चेत राहिला आहे. उत्सुकता होतीच की या चित्रपटात असे नेमके काय असेल ज्यामुळे सर्वत्र याचीच चर्चा होत आहे. अखेर तो योग काल आला. अर्थात बरेच पूर्वग्रह मनात ठेवून हा चित्रपट पाहिला.

केळी फ्राय

लेखक रश्मी यांनी बुधवार, 25/02/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
From kela fry
साहित्य : कच्ची केळी लाल तिखट, हळद, मीठ तेल कृती : कच्च्या केळ्यांची सालं काढून घ्यावीत. प्रत्येक केळ्याचे आडवे दोन भाग करून त्याचे उभे काप करावेत. त्याला लाल तिखट, हळद व

भारनियमन..

लेखक उपटसुंभ यांनी बुधवार, 25/02/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
(संदिप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांची क्षमा मागून) एसी असता फ्रीज असता गरम होऊ लागले. जाहले इतुकेच होते भारनियमन वाढले. मीटरावीण सदनी त्याच्या बल्ब कैसा पेटला. आकड्याने चोरताना काल त्याला पाहिले. एवढे का घोळ करिसी वीज नियामक मंडळा, तू दिलेले बिल खिशाला फार वाटू लागले. वीज जाता बंद टीव्ही संगणकही पांगळा. पोर ते क्रिडांगणावर खेळ मांडू लागले. लाख उपकरणे हाताशी, शहर तरिही हळहळे. मंडळाचे प्रेम केवळ मुंबईवर राहिले. भर पहाटे अन दुपारी वीज काढून टाकली. राहती इन्व्हर्टरावर, सुख तयांना लाभले. -- अभिजीत दाते (एक लोडशेडींगने त्रस्त मिपाकर) मूळ गीत - मेघ नसता वीज नसता कवी - संदिप खरे

शुद्धलेखन

लेखक त्रास यांनी बुधवार, 25/02/2009 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
शुद्धलेखना मधला "द्ध" हा उच्चाराप्रमाणे द + ध असा का लिहित नाहित?

मला इश्वर दिसतो आहे !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 24/02/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला इश्वर दिसतो आहे , पंख पसरलेल्या पक्षासारखा मुक्त.. तळ्यातल्या सुंदर कमळाप्रमाणे अलिप्त... आम्रवनात कुंजन करणा-या कोकीळे प्रमाणे आनंदी अन अथांग आकाशा प्रमाणे......... अनादी...... मला कळून चुकल आहे कि, जीवन हाच एकमेव इश्वर आहे.. म्हणुनच,....
Taxonomy upgrade extras

तळलेले बांगडे

लेखक मितालि यांनी मंगळवार, 24/02/2009 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः बांगडे, तेल, मीठ, कोकम रस, मिरचिपुड, तांदळाचे पीठ पाककृती : बांगडे स्वच्छ धुवुन त्याना कोकम रस व मीठ लावून ठेवा. तांदळाच्या पीठात मिरचिपुड घालुन मिक्स करा. या पिठात मासे घोळवून गरम तेलात तव्यावर छान त़ळुन काढा.

जुनी गाणी

लेखक हरकाम्या यांनी मंगळवार, 24/02/2009 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला " कम सप्टेंबर ह्या साधारण्पणे १९७० च्या आसपास च्या सिनेमाच्या ट्युन्स हव्या आहेत त्या कुणाकडे मिळ्तील.