सुक्ष्म बदल
"तुम्हाला 'रुटिन' चा कंटाळा येत नाही का हो सर" लिफ्ट मधे इती १२ वा माळा
वय वर्षे ३५ असलेल्याना सुद्धा रुटीन चा कंटाळा. तरी बरे दरवर्षी दोन वेळा ऑफिस खर्चाने भारत दर्शन नक्की असते. त्याला पण रुटीनमुळे कंटाळले की काय असा प्रश्न डोक्यात आला.
तसा रुटीन च्या कंटाळ्याबद्द्ल मला रुटीनली प्रश्न विचारला जातो. आणि मी सुद्धा रुटीन उत्तरे देतो.
१. रुटीन कुणाला चुकले आहे.
२. रुटीन मधेच आनंद शोधायचा. वगैरे वगैरे. असो.
काल चिरंजीवांचा २२ वाढदिवस. ऑफिसमधे बायकोचा फोन आला. येताना एक छोटा वॅनिला कप घेउन या. मी आईस्क्रीम टाळतो. घसा सांभाळावा लागतो.
मिसळपाव