स्थलांतरे - घाऊक आणि किरकोळ
लहानपणची गोष्ट आहे. कुठल्याशा सुटीत एका कौटुंबिक सहलीसाठी लोणावळ्याला जाणे झाले होते. विविध स्थलदर्शनांच्या यादीत "कार्ले" येथिल लेण्यांचा समावेश होताच. तेथिल एकविरा देवीच्या मंदिरात गेल्यावर माहिती कळली की, ही कोळी समाजातील लोकांची देवता. मला कुतुहल वाटले. कोळी समाज हा समुद्रकिनार्यावरील. मग त्यांची देवता अशी समुद्रकिनार्यापासून इतकी दूर, अगदी घाटापलिकडे देशावर कशी? वडिलधार्यांना विचारले पण कोणाकडेच समाधानकारक उत्तर नव्हते. आजही नाही. अनेक अनुत्तरीत प्रश्नांच्या ढिगार्याखाली ते कुतुहल आजदेखिल पडून आहे!
मिपावर मराठीच्या अनेक बोलींतील लेखन वाचायला मिळते. त्यात एक आहे आगरी बोली.
मिसळपाव
कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.