काल जिनोमवर चाललेले संशोधन आणि त्याचा वैज्ञानिकांनी जोडलेला आरोग्याशी संबंध ह्या बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली. त्यात सांगितल्याप्रमाणे मानवाला भविष्यात त्याला होऊ शकणारे गंभीर विकार जिनोमच्या तक्त्यावरुन सहज समजु शकतील.
सध्या जेव्ह्ढी माहिती जिनोम बद्दल आहे, त्यावरुन असे निश्चित्पणे सांगता येते की, ती व्यक्ति कशी असेल, तसेच शरीरयष्टी, दिसणे, आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे (ओळखता) सांगता येते.
मला वाटते की, हे संशोधन आणखी पुढे गेल्यावर असे समजेल की, मानवात ३६ गुण असतात जे मोजले की, त्याचा जिनोम बाहेरुनच पाहता येतो.