Skip to main content

मराठी संगणक प्रणाली

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 02/03/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेले अनेक दिवस मुक्तस्रोत संगणक प्रणालींचा अभ्यास करत आहे. अनेक चांगले प्रयत्न लोकांनी केले आहेत. जुमला, वगैरे अनेक प्रणाल्या फुकट उपलब्ध असतात. त्यातील अनेक प्रणालींचे भाषांतर हिंदी (मी तपासलेल्या जवळजवळ सगळ्या प्रणाल्या), तामीळ, कन्नड, सिंधी, गुजराती भाषेत झालेले आहे. मराठी भाषांतर झालेल्या प्रणाल्या अगदीच नगण्य आहेत.

जिनोम व आरोग्य

लेखक अमृतांजन यांनी सोमवार, 02/03/2009 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल जिनोमवर चाललेले संशोधन आणि त्याचा वैज्ञानिकांनी जोडलेला आरोग्याशी संबंध ह्या बद्दल एक डॉक्युमेंटरी पाहिली. त्यात सांगितल्याप्रमाणे मानवाला भविष्यात त्याला होऊ शकणारे गंभीर विकार जिनोमच्या तक्त्यावरुन सहज समजु शकतील. सध्या जेव्ह्ढी माहिती जिनोम बद्दल आहे, त्यावरुन असे निश्चित्पणे सांगता येते की, ती व्यक्ति कशी असेल, तसेच शरीरयष्टी, दिसणे, आनुवांशिकतेतुन येणारा प्रगतपणा, बुद्धी (स्मरणशक्ती), ई. ही स्पष्टपणे (ओळखता) सांगता येते. मला वाटते की, हे संशोधन आणखी पुढे गेल्यावर असे समजेल की, मानवात ३६ गुण असतात जे मोजले की, त्याचा जिनोम बाहेरुनच पाहता येतो.

सँडवीच फॉर डमीज् (सचित्र मार्गदर्शन )

लेखक गणपा यांनी सोमवार, 02/03/2009 03:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी ही, किती ही , कुठे ही भुक लागल्यावर हमखास पोट भरणारा पण सगळ्यात कठीण (करायला. खायला नाही) पदार्थ. त्यामुळे हे गाईड समस्त मिपाकरां ना समर्पीत. (कुठे ही अश्या साठी की आत्त्ताच आलेल्या बातमी नुसार मिपाकर केवळ पृथीतलावर न्हवे तर पार वैकुंठापर्यंत पसरलेले आहेत.) कच्चा माल : ४ ब्रेड स्लाइस. १ काकडी, १ टोमॅटो, १ मोठा उकडलेला बटाटा, १ कांदा , लोणी / बटर , बीट (असल्यास / आवडत असल्यास) , हिरवी चटणी (हीची पाकृ. पुढच्या वेळी.), मीठ/चाट मसाला.

मराठी लोकांना महाराष्ट्राच्या बाहेर गेलं कि मराठी बोलायची लाज वाटते

लेखक मराठमोळा यांनी रविवार, 01/03/2009 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
कामानिमित्त बेंगालुरु (आधीचे बेंगलोर) मधे काही दिवस राहण्याचा योग आला होता. तिथे पोचल्यावर असे वाटले कि दुसर्‍या देशात आलो आहोत आणी ते सुद्धा व्हिसा आणी पासपोर्ट शिवाय. तेलगू, तमिळ आणी कन्नड आणी काही अंशी इंग्रजी वापरात असलेल्या या चार भाषा. पहिला दिवस गेस्ट हाऊस वर दुरदर्शन संचावर काही कार्यक्रम बघण्यात गेला. दुसर्‍या दिवशी ऑफिसात गेलो आणी गेट वरच्या रखवालदारापासुन ऑफिसातल्या सर्व लोकांशी इंग्रजी भाषेत संवाद साधावा लागला. एकटं वाटु लागल्यानं थोडासा निराश असा मी कँटीन मधे गेलो आणी कोपर्‍यातल्या एका टेबल वर बसलो. इतक्यात चार मराठी शब्द कानावर पडले आणी मी थोडा खुष झालो.

हुरहुर

लेखक प्रमोद अम्बरनाथ यांनी रविवार, 01/03/2009 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मी २००४ साली ह्रुदयविकार शस्त्रक्रियेसाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये होतो त्यावेळी सुचलेले काव्य..... जसलोक---१३०४ मनामध्ये कुठेतरी भिती ही भासते क्षणात आहे क्षणात नाही हुरहुर हि दाटते अंगारे,धुपारे,संत ,साधू ,बापूही यांची साथ संगत आज खरी ना वाटते जगू किंवा मरु हेच एक सत्य आहे याविणा सारे जग आज मला मिथ्य आहे सर्व नाती ,सर्व गोती ,आज भोवती नाचती सुख दु:खाचा एकेक धागा जिवन माझे विणती या क्षणी मनात माझ्या निशब्द भाव तरंगती ओहोटी..... भरती मधील अंतराय जाणती.......... प्रमोद अष्टपुत्रे ०४/०५/२००४
Taxonomy upgrade extras

बटाट्याची गोड कचोरी

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी रविवार, 01/03/2009 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : १ नारळाचे खोबरं ; तूप ; काजू ; बेदाणे ; खसखस ; साखर १ वाटी ; मीठ. बटाटे ७/८ ; आरारूट ५० ग्रा.; तळण्याकरिता तेल. कृती : बटाटे उकडून बाजूला ठेवावेत. थोडं खोबरं आणि खसखस मिक्सरमधे वाटून घ्यावी.( पाणी घालू नये) सारण : कढई मधे तूप गरम करुन त्यावर राहिलेले खोबरं थोडं भाजून घ्यावे .मग साखर घालावी. मग त्यात काजू,बेदाणे घालून नंतर वाटलेले खोबरं खसखस घालावी. अगदी चिमूटभर मीठ घालून उतरवावे. एका ताटात पसरून ठेवावे ( गार होण्यासाठी ). बटाटे सोलून किसून घ्यावे त्यात थोडंस मीठ आणि आरारूट घालून चांगले मळून घ्यावे.

अस्तित्व

लेखक दशानन यांनी रविवार, 01/03/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही दोघं जवळ जवळ एकाच वयाचे. तो एक बराच शिकलेला. गरिबातून स्वतःच्या कष्टाने वर आलेला. एका प्रस्थापित कंपनी मध्ये मोठ्या हुद्यावर होता. घरात एक ५-६ वर्षाची छकुली व नवरा-बायको बस. आई-वडील आधीच मुक्त झालेले. जमीन-जुमला असून नसल्या सारखा. सुखी व समाधानी कुटुंब होतं ते. घरात काही कमी नाही जे हवं ते लगेच नाही पण मिळायचं जरुर त्यामुळे बायको पण खुष-मुलगी पण खुष. पण मागील वर्षी अमेरिकेत फुगा फुटला व काही च्या घरात धरणीकंप झाला. स्थीर नात्यावर... प्रेमावर टिकलेली घरे. ह्या अचानक आलेल्या वादळा मुळे बावरली. घर पडतं की काय असा भास होऊ लागला. त्याची व माझी मैत्री खुप जुनी.