Skip to main content

तूच आहेस तो...

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 03/03/2009 01:17 या दिवशी प्रकाशित केले.
उमलत जाणारे प्राक्तनाचे ओझे तणावाच्या पसार्‍यात गरगरताना कोणी धाडलंय तुला कल्पनेपलिकडील जगातून माझ्या विसविशीत देहसावलीवर हळूवार फुंकर घालायला पण चालेल, काळजात रुतलेला तुझा तो स्पर्श आणि ती क्षणभंगुर भीक पेलताना वृथा वैफल्याचा चोरटा सूर...

लोकसभा निवडणुका-२००९ उत्तर भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 02/03/2009 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होताच हा लेख लिहायचे मनात होते. गेले काही दिवस मी माझ्या भविष्य आणि करियरविषयी काही गोष्टींमध्ये गुंतलेलो असल्याने मिसळपाववर येऊनही काही लिखाण करणे शक्य झाले नव्हते. देवदयेने सर्वकाही ठरविल्याप्रमाणे पार पडल्यास मिसळपाववर ते जाहिर करेनच. गेल्या शनीवारी (२१ फेब्रुवारीला) मला मुंबईत एक छोटा अपघात होऊन माझ्या डाव्या पायाला दुखापत झाली आहे आणि दीड-दोन महिन्याची निश्चिंती झाली आहे. ते एका अर्थाने बरेच आहे कारण त्यामुळे हा लेख मला अधिक सविस्तर लिहिता येईल आणि त्यासाठी जास्त वेळ देता येईल.

इतर भाषिक आणि मराठी लोक

लेखक त्रास यांनी सोमवार, 02/03/2009 21:16 या दिवशी प्रकाशित केले.
आपण पंजाबी, बंगाली, मद्रासी वगैरे लोकांबद्दल, त्यांच्या सवयींबद्दल बरे-वाईट बोलत असतो. इतर भाषिक (भारतातले) मराठी लोकांविषयी काय बोलतात?

करार

लेखक क्रान्ति यांनी सोमवार, 02/03/2009 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
करार माझे कधी तुझ्याशी काही करार होते तू मोड जीवना, ते फसवे, चुकार होते श्वासासवे कधीही नव्हतेच सख्य माझे, ते श्वास कर्ज होते, जगणे उधार होते वाळूत कोरलेली नावे जशी मिटावी, गेले मिटून जितके हळवे विचार होते वाटेतल्या फुलानी स्वप्ने लुटून नेली काळोख पान्गताना उघडेच दार होते हातून सावलीचा निसटून हात गेला, आयुष्य फाटलेले मी सान्धणार होते

मंदी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 02/03/2009 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
सगळाच गोंधळ उडाला आहे हो. जावे तिथे मंदीचा विषय. बस्,लोकल, लग्न, बारसे, अगदी स्मशानभुमी वर सुद्धा. पण ह्यावर उपाय काय ह्यावर कुणाकडे नक्की विचारधारणा नाही. एक म्हणतो खर्च कमी करा. दुसरा म्हणतो त्यामुळे खप कमी होउन परत मंदीत भरच पडणार आहे. नेमके खरे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर बरे होईल. काळाची पावले ओळखा, पैसा जपुन वापरा, बॉटम अजुनही आलेला नाही ही नेहेमीची वाक्ये दणदणतात कानावर. ऩक्की काय केल्याने ह्या येत्या काळात फारसा त्रास न होता परिस्थीतीवर मात करता येईल ह्यावर मान्यवरांनी मार्गदर्शन करावे ही अपेक्षा चुकीची आहे काय? हे मार्ग दर्शन अगदी 'गमभन' स्वरुपात असावे ही अपेक्षा.

पैशे महत्वाचे की, मित्र.

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा स्व-अनुभव आहे. क्रुपया वाचण्याठी वेळ द्यावा. ही. नम्र विनंती. मि. पा. करांनी / करींनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.ही. (दुसरी )नम्र विनंती. माझ्या जवळ्च्या काही मित्रांना मी काहि रुपये उधार दिले आहेत. मागतांना अत्यंत गरज आहे, महत्वाचे काम आहे, असे काहिजण म्हणाले होते, मी पण मित्राला मदत म्हणुन रुपये दिले. सगळेजण २-३ महीन्याच्या आत परत करु असे म्हणाले होते. पण आज पर्यत्न कोणी सुध्दा परत केले नाहि. काहिना मी तर क्रेडीट काड वरुन रुपये काडुन दिलेले आहेत. (प्रोसेसिग फी, व्याज मीच भरले, भरत आहे) माझ्या मते, जसे रुपये मागायला हे आले होते, तसेच परत करण्यासाठी सुध्दा त्यांनिच यायला हवे.

यालाकमो हिदा श्यादि

लेखक दशानन यांनी सोमवार, 02/03/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
लेतेसनि रसु नतुलिन्जओ ते लम तव्निकु हेआ सवशा त्तोघे लेकमो की मी त्ताअ तरुविनि हेआ कुए द्या जम रिसबा त्य्य न्च्याबुबा तुताबे नी न्धगदुम्रु कहमो क्दाए द्याउरभ लाम नितुसवशा च्यत्रिर मरमिति तिहो लीलधा जी वेसआ न्दुबिवद नौहो लितभे जम त्यामलत्या वेसश्पापु नतुलाफुनापा नतुरर्झनि चीश्तिश्रु ही नेन्दस्प न्गतुउ ताला रावानरा तीदे जम ही नेन्त्रमआ च्गलूह ते गध निम्बचु तीजा चेलाफु वेतता थओऔ ल्याओअ चेल्याकपा न्दधु नअउहो वेराथरथ लेरव्हेअ ते ख्यसौ मी की चेरीकनो शपा तेहो हीसजातिक्शि झ्ह्यामा चेनाम सेदवक कौथा तेहो मयनि नीआ च्यानासशानुअ नतुतीकचौ क्तमु लोझा लेहअओस चेतुक्रु याघाब हा हाप मी लोलचा शकाआ लेझा नेन्गथे नअ

रात्र थोडी जाहली पण--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 02/03/2009 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आत्ताच आमुच्या जीवनाची आत्ता कुठे सुरवात झाली फिरुनी पुन्हा या यौवनाची नुकतीच साठी मागे सरुनी यौवनाला जाग आली बहर पुन्हा आला असा की जीवनाची बाग झाली प्रियेस माझ्या आजवरी मी फुले कैक हो वाहिली गंध ऐसा त्या फुलांचा धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवनाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण एक बाकी प्रहर आहे गैरसमज नको माझ वय फक्त २५ आहे
Taxonomy upgrade extras

टाटा नॅनो..

लेखक गरम मसाला यांनी सोमवार, 02/03/2009 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
दोन दिवसांपूर्वी याहु संकेतस्थळावर पहिल्याच पानावर झळकणारया बातम्यांमध्ये एका न्युजवाहिनीने टाटा नॅनोच्या आगामी आगमनाची बातमी दाखवली. जगातील सगळ्यात स्वस्त कार म्हणून ज्या कारने नाव नावलौकिक मिळवला त्या कारची जमेची बाजू मांडण्यापेक्षा त्यात किती असुविधा आहेत याच्यावरच भर देण्यात आला. शेतकरी लोकाना जागेसाठी मिळालेला कमी मोबदला व त्यामुळे केलेली निदर्शने आणि या सगळ्यांचा नेनो च्या बाजारातील आगमनावरचा विलंब या सगळ्या गोष्टींचा विशेष उल्लेख आहे. कारचा आकार किती लहान आहे हे अगदी "How many people you can squeeze into car ?" अशा संवादातून खिल्ली उडवली आहे.