Skip to main content

माझा विज्ञानदिन

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 03/03/2009 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस हापिसात 'विज्ञान दिना'ची तयारी केली पाहिजे असं वाक्य अनेकविध भाषा आणि हेलांमधून कानांवर येत होतं. पण इमेल किंवा नोटीस न आल्यामुळे डोळ्यात येत नव्हतं. अनेक वांझोट्या चर्चा सुरू असतात, त्यातली ही पण एक असा विचार केला आणि मी पण काही फार मनावर घेतलं नाही. आणि एक दिवस मी प्रपोजलच्या कामात पूर्ण बुडालेले असताना बॉस नं.

सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया |

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 03/03/2009 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाचिये शोधी | भ्रमसी रे वाया | अंतरीचा ठेवा | पाहसी ना || जगी या मांडल्या | सुखाचिया पेठा | सुख घेता ओठा | नष्ट शून्य || दया करोनिया | संते दिले गुज | रामनाम बीज | उच्चारी तू || नामे उद्धरिल्या | पापियांच्या व्यथा | तुझी काय कथा | सांगसी तू || सागर लहरी | अनंत उठती | शमवुनी चित्ती| शांत व्हावे || - सागरलहरी
Taxonomy upgrade extras

पनीर टिक्का

लेखक मिंटी यांनी मंगळवार, 03/03/2009 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पनीर टिक्का माझ्या आवडती एक डिश.... तशी किचकट पण चविला एकदम मस्त अशी पाककृती. पनीर टिक्का एकदा घरी करुन बघावा या हेतुनी सगळं साहित्य जमवलं आणि प्रयोग सुरु झाला. साहित्य : १. पनीर - ५०० ग्रॅम २. २-३ मोठे कांदे ३. २-३ सिमला मिरच्या ४. दही ( पाणी काढलेलं ) - ५०० ग्रॅम ५.२-३ मोठे चमचे लाल मिरचीची पेस्ट ६.२-३ मोठे चमचे आलं-लसुण पेस्ट ७. १ १/२ चमचा गरम मसाला पावडर ८.१/२ चमचा कसुरी मेथी ९. २ चमचे लिंबाचा रस १०.१/२ चमचा मिरी पावडर ११. २-३ चमचे तेल १२. मिठ चवीनुसार कृती : पनीरचे छोटे छोटे चौकोनी तुकडे करुन घ्या.

''ती''

लेखक JayGanesh यांनी मंगळवार, 03/03/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
टन टन टन टन टन टन टन टन टन टन ....... झाली एकदाची मधली सुट्टी. आमच्या शाळेची मधली सुट्टी १.३० ला होते, वडापाव खावुन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे आम्ही सगळेजण म्हणजे मी, बाबासाहेब, संदीप, नाग्या, प्रशांत, धोंडे (ज्यांची नावे व्यवस्थीत लिहली आहेत ते सगळेजण वर्गात रोज गणीताच्या आणी इग्रंजीच्या तासाला मजबुत मार खातात) आणी इतर ९ वी तली मुले (जी आमच्या ग्रुप मधे येण्यास तयार , पण आम्ही न समावीष्ट केलेली.) असा सगळा ताफा आमचा शाळेच्या मैदानातील झेंड्या खाली गप्पा मारत उभे होतो.

धक्कादायक पाकिस्तानात श्रीलंकन क्रिकेट टिमवर फायरिंग

लेखक दिपक यांनी मंगळवार, 03/03/2009 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
धक्कादायक पाकिस्तानात श्रीलंकन क्रिकेट टिमवर फायरिंग... पाच पोलीस ठार... दोन खेळाडु जखमी.. http://www.zeenews.com/archives/2009-03-03/512050news.html

दी कॅट इन दी हॅट - अर्थात टोपीवाले मांजर

लेखक चित्रा यांनी मंगळवार, 03/03/2009 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सूस - आजचे गूगलचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा लक्षात आले की आज डॉ. सूस यांचा वाढदिवस. आज असते, तर ते १०५ वर्षांचे झाले असते. डॉ. सूस हे त्यांचे खरे नाव नव्हे, खरे नाव थिओडोर गीजल. सूस हे त्यांच्या आईचे लग्नापूर्वीचे आडनाव (तसेच त्यांचे मधले नाव) त्यांनी लहान मुलांच्या गोष्टी लिहीताना टोपणनाव म्हणून लावले. डॉ. सूस यांच्या पुस्तकांशी माझी तोंडओळख इथे अमेरिकेत आले तेव्हा पुस्तकांच्या दुकानांच्या शेल्फांवरच्या त्यांच्या एकदोन पुस्तकांमुळे झाली.

जीवाशिवाची जोडी

लेखक हुप्प्या यांनी मंगळवार, 03/03/2009 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
जीवाशिवाची जोडी हे ग्रामीण ढंगाचे हृदयनाथ मंगेशकरांनी गायलेले व संगीत दिलेले एक सुंदर गीत. ह्याचे शब्द व हे कुठल्या चित्रपटात आहे हे कुणाला माहीत आहे का? असल्यास कृपया सांगा. ह्याचे काही शब्द असे जीवाशिवाची बैलजोडी..... ....... वेध रामाच्या बाणाचा वेध बाणाचा डौल .....

हाती ज्यांच्या शून्य होते

लेखक विकास यांनी मंगळवार, 03/03/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
जैनांची कथा वाचली, मंदी वरील लेख/चर्चा वाचतोय त्यातून अचानक खालील पुस्तकाची आठवण झाली. म्हणून हा पुस्तक परीचयाचा उपद्व्याप. मध्यंतरी भारतात असताना एक आधी माहीत नसलेले पुस्तक हातात पडले. त्या पुस्तकाची नावाप्रमाणेच असलेली कल्पना मला आवडली आणि संग्राह्य वाटल्याने घेयचे ठरवले. तसे त्याची प्रथमावृत्ती २००५ च्या शेवटात झालेली पण ही द्वितियावृत्ती २००८ मधली मला विकत घेताना मिळाली... पुस्तकाचे नाव आहे: हाती ज्यांच्या शून्य होते. संपादक - अरूण शेवते, ऋतुरंग प्रकाशन. किंमत २०० रुपये.

मटार-पालक पराठे

लेखक समिधा यांनी मंगळवार, 03/03/2009 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : मटार २ वाट्या पालक २ वाट्या आल १ पेरा एवढं लसुण ४ पाकळ्या मिरची /तिखट आवडीनुसार मीठ चविनुसार कणिक अंदाजे तांदुळाचे पिठ ४ चमचे पिठ मळुन घेण्यासाठी तेल ( हे थोड नेहमी पेक्षा जास्ती लागेल) पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी. कृती:

<तूच आहेस तो!!>

लेखक पिवळा डांबिस यांनी मंगळवार, 03/03/2009 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रेरणा: शरदिनी यांची याच नांवाची कविता! कृपया ह. घ्या!) शिजत जाणारे लुसलुशीत तुकडे मोगलाई रश्श्यात रटरटतांना.... कुणी धाडलंय तुला अन्वर खाटकाच्या दुकानी माझ्या सुखावलेल्या देहसावलीवर आणखी मस्ती चढवायला.... पण चालेल, मुखात विरघळणारा तुझा तो स्पर्श आणि ती रुचकर देणगी पचवतांना तृप्त समाधानाचा चोरटा ढेकर... (गेल्या रविवारी आमच्यासाठी बलिदान करणार्‍या त्या अनामिक बोकडास अर्पण!!!!)
Taxonomy upgrade extras