साहित्य :
मटार २ वाट्या
पालक २ वाट्या
आल १ पेरा एवढं
लसुण ४ पाकळ्या
मिरची /तिखट आवडीनुसार
मीठ चविनुसार
कणिक अंदाजे
तांदुळाचे पिठ ४ चमचे
पिठ मळुन घेण्यासाठी तेल ( हे थोड नेहमी पेक्षा जास्ती लागेल)
पराठे बनविण्यासाठी १ प्लास्टिक पिशवी.
कृती:
प्रथम उकळलेल्या पाण्यात मटार ५ मिनिटे ठेउन काढून घ्या.
नंतर त्याच पाण्यात पालक ठेउन २-३ मिनीटांनी काढा.
मिक्सर मध्ये मटार, पालक, आल, लसुण, मिरची एकत्र करुन थोडे पाणी घालुन काढून घ्या. ( साधारण १/२ वाटी पाणी लागते)
तयार मिश्रणात तांदुळाचे पिठ, आणि थोडी कणिक घाला ( सैलसर मळुन घ्या)
मळलेले मिश्रण पुरणपोळीच्या कणके प्रमाणे हवे. त्या साठी तेल थोड जास्ती लागेल.
एका प्लास्टिक पिशवी वर पराठा थापुन घ्या.
तव्यावर दोन्ही बाजुने तेल्/तुप सोडुन भाजुन घ्या.
कोणत्याही चटणी /सॉस बरोबर गरमच खावा.
अवांतर : ज्यांना लाटता येत नाही त्यांना पण करता येईल.
प्रतिक्रिया
फारच छान
काय रंग
सुंदर...
तिघीजणी
झकास!!
जबरदस्त फोटो..
तू एक
In reply to जबरदस्त फोटो.. by प्राजु
मस्त
आय सी यू
तात्या असा
In reply to आय सी यू by विसोबा खेचर
छान
वाह....
भारी
सुरेख फोटो!
मस्त! फोटोत
रंगच खुप छान आहे!
छानच
लाजवाब