Skip to main content

आफेलकुकन अर्थात ऍप्पल केक !!!

लेखक स्वाती दिनेश यांनी शुक्रवार, 13/03/2009 01:20 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य १२५ ग्राम बटर/तूप/लोणी,१२५ ग्राम साखर,३ अंडी,लिंबाची किसलेली साल १ चमचा १.५ चमचा लिंबाचा रस,१ चिमूट मीठ,२०० ग्राम मैदा,१/४ कप दूध २ चहाचे चमचे( कापून/फ्लॅट) बेकिंग पावडर ३ ,४ मध्यम आकाराची सफरचंदे कृती बटर भरपूर फेटणे, साखर घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.१ चिमूट मीठ,लिंबाची साल व रस घालणे आणि फेटणे.मैद्यात बेकिंग पावडर मिक्स करणे. हा मैदा थोडा थोडा घालत फेटणे‌.

(आज)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 13/03/2009 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
क्रांतीताईंची 'आज' ही सुंदर कविता वाचली आणि मग "त्याचे उत्तर माहीत असूनही दिले नाहीस तर डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील" ह्या वेताळाच्या धमकीप्रमाणे, "तुझ्या धर्माला जागला नाहीस तर ह्या ओळी रात्री छळू लागतील" ह्या भीतीने मला हे लिहिणे भाग पडले!

माहिती तंत्रज्ञान (आयटी)

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 13/03/2009 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, भारत हा एक प्रगतीशील देश आहे आणी होणारी प्रगती आपण सर्व पहातच आहोत. हळुहळु आपण आर्थिक सुबत्ता आणी उच्च जीवनशैली कडे वाटचाल करत आहोत. जागोजागी चालु असलेले बांधकाम, मोटारींची वाढलेली संख्या, उच्चशिक्षणाकडे लोकांचा कल, वाढलेल्या रोजगाराच्या संधी या सर्व गोष्टी प्रगतीची साक्ष्च देत आहेत. जागतिकीकरणाच्या शर्यतीत आपण फारच वेगाने पुढे चाललो आहोत आणी याचाच एक भाग म्हणुन आपल्याकडे बाहेरच्या देशातील काम आउट्सोर्सिंग होऊ लागले आणी आयटी (माहिती व तंत्रज्ञान) सारख्या क्षेत्रामधे रोजगारांच्या खुप संधी निर्माण झाल्या.

वर्षाव अमृताचा..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 12/03/2009 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
कंपीत गात्र होई तू छेडिल्या सुरांनी श्वासात खोल जाई मिसळून रातराणी बेहोष मंद तांडे निघताच चांदण्यांचे क्षितिजास अन पहाटे ही चंद्रिका दिवाणी उठती अनेक हलके हलके तरंग कोठे गंधीत रात्र होई घुमवीत धुंद गाणी आल्हाद स्पर्श होई पात्यावरी धुक्याचा लाजून हिरवळीचे काळीज होत पाणी (हळुवार मंद होई हा दीप तेवणारा वारा तशात गाई बेधुंदशी स्वराणी) वितळून या क्षणी मी माझीच ना उरावे उजळून जात काया, लावण्य हे नुराणी घेई टिपून हलके हे क्षण यौवनाचे दृष्टीस आज सांगे बघ मौन होत वाणी हलकेच गूज सांगे ती रात्र पांगताना बेधुंद मीलनाची अन् ठेवते निशाणी वर्षाव अमृताचा ..

आज

लेखक क्रान्ति यांनी गुरुवार, 12/03/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
नक्कीच काहीतरी चुकतय आज कशान हे मन वेड दुखतय आज? कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी पिंगा घालतात भलत्याच वेळी अनावर रात्री चांदण्याची खेळी सृजनाच सुख सुद्धा खुपतय आज! मनातल गाणही ओठांवर नाही सुरांच गाव कुठे दूरवर राही उजाड माळ का वाट माझी पाही? आभाळही पापण्यांत झुकतय आज! उदास झाडांची गळतात पानं निस्तेज चंद्राच वितळून जाणं धुक, जस दुखणं जुनं-पुराणं उफाळून पुन्हा का सलतय आज?
Taxonomy upgrade extras

समुद्रकिनारा

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 12/03/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
सुखस्पर्शी लाटा अविरत वारा अफाट जल अथांग आणी हा समुद्रकिनारा भावनांचा उद्रेक कधी उदासीनतेचा मारा मनी आठवणींचे काहुर आणी पारवा भिरभिरणारा एकांताचा खडक विचारांचा झरा कल्लोळ दाटलेला आणी माझ्यातला मी तळमळणारा मिटलेले ओठ डोळे पाणावले जरा भरुन येई ऊर आणी सुर्य मावळणारा मन शांत होईपर्यंत बसे मी त्या समुद्रकिनार्‍यापाशी तो विचारे मग मला, येशील ना रे उद्या? आणी मी परतणारा..

<<गाळलेली हात भट्टीची>>

लेखक कुंदन यांनी गुरुवार, 12/03/2009 19:27 या दिवशी प्रकाशित केले.
गाळलेली हात भट्टीची>> लेवुन तवंग नवसागराचा, दारु होती तेलकट|| न पोलिसांचे डोंगर आडवे न एक्साईज चे किल्ले रासवट|| देशीच्या बारची दारं उघडी सताड उद्याचा दिवस आहे रात्रीच्या पल्याड|| बरोबर हवी खरी , साथ खमंग चखण्याची खारे दाणे ताजे ताजे , अन ग्लास हवा काचेचा|| शिलगावुनी सिगारेट मारला एक झुरका|| सोडा/पाणी टाकुन घेणे मला कधी ते जमणेच नाही || फेसाळलेली दारु आणते एक आगळीच खुमारी दुसर्‍याच्या पैशाने प्यायची तर लज्जतच न्यारी||
Taxonomy upgrade extras

मी

लेखक सायली पानसे यांनी गुरुवार, 12/03/2009 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या एका मैत्रिणीची ही ईंग्रजी कविता काल वाचली...मनाला स्पर्शुन गेली. तिच्या कवितेचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे... मुळ आशयाला धक्का न लावता मराठीत अनुवाद करताना काही बदल केले आहेत..... काहि चुक असल्यास संभाळुन घ्यावे..( शुध्द्लेखनात चुका असल्यास प्लीज सांगा... मी थोडी कच्ची आहे त्यात.) (मुळ कविता..
Taxonomy upgrade extras

<--->

लेखक दशानन यांनी गुरुवार, 12/03/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
येतो एक आवाज गुत्यातून चीरुन दारुड्यांचा पडदा.. अन रम, आपली व्हिसकी दंग पिण्यात बेवडा...!! अन इथे... पुन्हा पिण्याची उबाळ येथे पडले हो बेवारस... बेवडा एक परि, करुनी तंगडी वरी हसले सगळे त्यावरी, खी खी खी...
Taxonomy upgrade extras