मी
Taxonomy upgrade extras
माझ्या एका मैत्रिणीची ही ईंग्रजी कविता काल वाचली...मनाला स्पर्शुन गेली.
तिच्या कवितेचा स्वैर अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे... मुळ आशयाला धक्का न लावता मराठीत अनुवाद करताना काही बदल केले आहेत.....
काहि चुक असल्यास संभाळुन घ्यावे..( शुध्द्लेखनात चुका असल्यास प्लीज सांगा... मी थोडी कच्ची आहे त्यात.)
(मुळ कविता.. I am a Women ..by.Ms.T.Kumaran)
मी...
मी..
मुक्त विहंग
माझे पंख छाटु नकोस....
मी..
अवखळ पाणी
मला बांध घालु नकोस....
मी..
अमर्याद आकाश
मला मर्यादा घालू नकोस....
मी..
अचल पर्वत
मला उखडु नकोस....
मी..
भडकणारी ज्वाला
मला विझवु नकोस....
मी..
गुलाबाचे फुल
मला काट्यांची भिती घालु नकोस....
मी..
अथांग सागर
माझा तळ शोधु नकोस....
मी..
तुझे प्रेम
माझा द्वेष करु नकोस.....
मी..
एक स्त्री
माझ्यावर प्रेम करायचे असेल
तर माझे स्वातंत्र्य हिरावुन घेऊ नकोस!
(अनुवाद..सायली.)
वाचने
2866
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
छान
धन्यवाद..
चांगले
In reply to चांगले by लिखाळ
+१
In reply to +१ by बिपिन कार्यकर्ते
+२
In reply to चांगले by लिखाळ
अनुवाद
In reply to अनुवाद by सायली पानसे
अहो ओळी
In reply to अहो ओळी by लिखाळ
सॉरी
काही बदल
चांगले जमले आहे.
खूप चांगला प्रयत्न