वारकरी
आजच, मराठी साहित्य संमेलन होऊ देणार नाही, अशी वारकर्यांनी घेतलेली भूमिका वाचून विषाद वाटला.
माझी सर्व वारकर्यांना हात जोडून विनंति आहे की त्यांनी ही टोकाची भूमिका मागे घ्यावी. आनंद यादव यांनी माफी मागितलेली आहे. पुस्तकही परत घेतेले आहे. तंव्हा आता आणखी ताणू नये. वारकरी हे देवाला जवळचे. आपण जेवढे देवाच्या निकट जातो तसतसे आपल्यातली दयाळूवृत्ती वाढली पाहिजे. राग, लोभ, द्वेष, मत्सर वगैरे षड्रिपु गळून पडले पाहिजेत. खर्या अर्थाने वारकरी व्हा, कुणाचे तरी 'वार'करी होऊ नका.
मिसळपाव

