Skip to main content

एक कथा आणि काही प्रश्न !

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 07/05/2021 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती सांगता सांगता टप्प्याटप्प्याने काही प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे मनात देत रहा. मग चालू करूयात ? १. एका गरीब रिक्षाचालकाच्या रिक्षेत एक तरुणी बसली आहे. गाडी सिग्नलला थांबलीय. तेवढ्यात रस्त्यावरची एक भटकी मुलगी त्या तरुणीची पर्स पळवते आणि जोरात पळू लागते. अशा प्रसंगी तो रिक्षाचालक रिक्षा थांबवून आणि आपला कामधंदा सोडून त्या चोर मुलीचा पाठलाग करेल, की त्या तरुणीला उतरवून आपले भाडे घेऊन निघून जाईल ? २. त्या चोर मुलीला पळता पळता अन्य एका गाडीची धडक बसून ती रस्त्यावर बेशुद्ध पडली आहे.

बंगाल

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/05/2021 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
...परवा कोणीतरी म्हणाले की बंगालमधे १९४६ जशा दंगली झाल्या तशाच आत्ता बंगालमधे सुरू आहेत. पण त्यावेळेस दंगली कशा झाल्या आणि का झाल्या हे आजच्या पिढीला कदाचित माहीत नसावे म्हणून या लेखमालिकेचा प्रपंच... बंगाल १९४६ जूनच्या २९ तारखेला ब्रिटिश पार्लमेंटच्या सदस्यांची समिती ब्रिटनला परत गेली आणि ते एका महिन्यात ब्रिटिश कॅबिनेटला आपला अहवाल सादर करतील असे सांगण्यात आले. जिनांनी आता अशा एका हत्याराचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्याने ते सूड घेऊ शकतील आणि त्यांची वैयक्तिक महात्त्वाकांक्षा पूर्ण करू शकतील.

दप्तर..

लेखक विखि यांनी शुक्रवार, 07/05/2021 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
"जय आवरलं का रे, उशीर होतोय" शाळेचा डबा भरता भरता जयची आई किचन मधून ओरडल्याचा आव आणत होती. "अगं आई मी काय करू, या बुटाची लेस लागतच नाहीये" कितीतरी वेळ बुटाच्या नाडीत गुंतलेला जय वैतागला आणि बाजूलाच बसलेल्या वडिलांकडे आशाळभूत नजरेने पाहू लागला. तशी वडिलांनी किंचित हसत त्याच्या बुटाची नाडी बांधायला घेतली "बाळराजे अजून किती दिवस तुम्हाला शिकवायचं हे" म्हणत जयच्या पाठीत एक मजेशीर धपाटा मारला.

चित्रपट परिचय : The Big Short

लेखक मित्रहो यांनी गुरुवार, 06/05/2021 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
The Big Short, २०१५ सालातील Adam MacKey लखित दिग्दर्शित हा चित्रपट २००७-२००८ सालातील सत्य घटना आणि खऱ्या पात्रांवर आधारीत एक महत्वाचा चित्रपट, हा चित्रपट Michael Lewis यांच्या The Big Short: Inside the Doomsday Machine या पुस्तकावर आधारीत होता. चित्रपटाने इन्व्हेस्टमेंट बॅकींग विश्वाचा बुरखा फाडला. विषय चित्रपटाचा विषय आहे २००७-२००८ सालातील Subprime Mortgage Crisis. साधारणतः सामान्य माणूस शेअर मार्केट, बाँड मार्केट, बँकेचे काउंटरपलीकडीले व्यवहार या साऱ्या विषयी अनिभिज्ञ असतो. या साऱ्याशी माझा संबंध नाही अशीच एक सर्वसाधारण धारणा असते.

प्रेमचंदचे फाटके जोडे (व्यंग्य): हरिशंकर परसाई

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 06/05/2021 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire प्रेमचंदचे फाटके जोडे प्रेमचंदचे एक चित्र माझ्यासमोर आहे. म्हणजे एक छायाचित्र. त्यांनी पत्नीसमवेत आपले छायाचित्र काढलेले दिसतंय. डोक्यावर जाड्याभरड्या कापडाची टोपी, अंगावर एक कुडता आहे आणि खाली धोतर.

कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास (ईशानच्या शब्दात)

लेखक मालविका यांनी बुधवार, 05/05/2021 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
माझा मुलगा ईशान (वय वर्षे १०)आणि भाची जुईली(वय वर्षे १२) यांनी कुंभार्ली घाट सायकलवरून सर केला . त्याचे वर्णन ईशानने लिहले आहे, तेच येथे देत आहे कुंभार्ली टॉप - एक मस्त धमाल प्रवास एक दिवस एकदम सुरवातीला मी आणि बाबाने ठरवलं कि कुंभार्ली घाट आहे त्याच्या एकदम टोकापर्यंत जाऊन यायचं. त्याच्यासाठी मी, बाबा आणि माझी आई आम्ही ठरवत होतो कि आज जायचं, उद्या जायचं पण ते नाही जमलं. शेवटी तो एक दिवसआला. दिनांक ४/४/२०२१ रोजी मात्र करायचा ठरवलं. मग सकाळी ५.३०/६.००च्या दरम्यान उठलो व तयारीला लागलो.

देव

लेखक अनुस्वार यांनी बुधवार, 05/05/2021 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध तो अन्नात आहे, उपवासात नाही. देव दानशूर मोठा, लाचार नाही न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही. देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे. देवही भक्त आहे, भावाचा भुकेला देव नाही खजिनदार-पुजारी. देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे देव दाढीत नाही, शेंडीतही नाही. जीवन देव आहे, मृत्यूही तोच प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे. देव म्हणजे गंभीर गोष्ट माणूस त्याची गंमत करतो. गुलाबजाम जणू पाकातला हलवायाची व्याख्या करतो. देव म्हणजे साधा माणूस जरा अधिक जरा उणा. देव म्हणजे तुम्ही-मी आपल्या आईच्या नजरेतले.

तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 05/05/2021 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति कोव्हीड काळातील तीन अनुभव १) आमचे एक कौटुंबिक परिवार( family friend) मित्र. नवरा आणि बायको उच्च शिक्षित आणि दोघेही बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर. माझी पत्नी त्यांची फॅमिली डॉक्टर. आमची मैत्री बऱ्याच वर्षांपासून १३-१४ पेक्षा जास्त. एक दिवस हि मैत्रीण माझ्या पत्नी कडे आली आणि सांगू लागली, आमच्या बाबांचे इच्छापत्र (will) केलेले आहे. त्यावर त्यांनी हे इच्छापत्र (will) मानसिक सुस्थितीत असताना केलेले आहे अशी डॉक्टर म्हणून तुझी सही पाहिजे.

कुंता...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 05/05/2021 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
..मला एखादे पुस्तक आवडले की मी ते वाचता वाचता त्याचा अनुवादच करून टाकतो. म्हणजे मला राहवतच नाही... खालील परिच्छेद असाच एक अनुवाद आहे... ....चंद्रप्रकाशात आसमंत न्हाऊन निघाला आणि थंडी पार हाडात मुरली. पौष गेला. मी लवटोलियाच्या कचेरीच्या तपासणीसाठी गेलो होतो. रोज झोपायला रात्रीचे अकरा वाजायचेच. एके दिवशी मी जेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडलो. पाहिले तर त्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत एक स्त्री त्या चंद्रप्रकाशात कचेरीच्या कुंपणाजवळ उभी होती. अशा वेळी, जेव्हा आकाशातून बर्फासारखे थंड दव टिपकण्यास सुरुवात झाली होती. ‘‘कोण उभे आहे रे तिकडे?’’ मी आमच्या पटवारीला विचारले. ‘‘हुजूर ती ना?

काळ

लेखक चंद्रकांत यांनी मंगळवार, 04/05/2021 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
स्मृतींचे किनारे धरून वाहणारा सगळाच भूतकाळ रम्य नसतो अन् शक्यतांच्या वाटांनी चालत येणारा भविष्यकाळही काही सगळाच सुंदर असतो असे नाही. भूतवर्तमानभविष्याच्या परिभाषेत काळाचा कुठलातरी तुकडा कोंडला, म्हणून तो काही कातळावर कोरलेल्या देखण्या शिल्पकृतीसारखा आखीव रेखीव होत नसतो. त्याचे काही कंगोरे असतात, काही कोपरे. त्याच्या असण्यानसण्याला काही आयाम असतात. काही अर्थ असतात, तसे अनर्थही. विशाल प्रस्तरावरून कोसळणाऱ्या प्रपातासारखा असतो काळ. प्रवाहाचं कोसळणं पाहताना कितीही देखणं वगैरे वाटत असलं, तरी प्रचंड आवेगाने दरीत झेपावणाऱ्या जलौघात काही कोणी उभं नाही राहत. त्याच्या गतीचे गोडवे नाही गात कोणी.