Skip to main content

साडी

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 26/04/2009 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
जगातिल सर्वात महाग साडि किंमत रु.४० लाख... Most Expensive Saree.......

नाशिकच्या नररत्नांचे हौतात्म्यशताब्दी वर्ष!

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 26/04/2009 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिपर्वाचा विसाव्या शतकातील पाया म्हणजे अभिनव भारत. नाशिकच्या असंख्य स्वातंत्र्यवीरांचे देशकार्य, समर्पित जीवन आणि तेजस्वी बलिदान स्वातंत्र्यसंग्रामात फार मोलाचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्लंडहुन ब्राउनिंगची पिस्तुले पाठविली, पैकी काही नाशिकात पोहोचली. आणि त्या पिस्तुलांचा वापर करायला अनेक कणखर हात सरसावले. लोकशाही व स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या इंग्रजांनी हिंदुस्थानात साम्राज्यशाही, अत्याचार आणि दडपशाही चालविली होती. कुणालाही तुरुंगात धाडायला पुरावे, पंच वगैरेची गरजच नव्हती.

शेवगा !

लेखक टारझन यांनी रविवार, 26/04/2009 19:59 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी इथे पडणार्‍या व्हेज नॉनव्हेज पाककृत्या आणि त्यावरील उदंड प्रतिसाद पाहीले की (स्वगत :- माझ्या लेखांना का बरं प्रतिसाद मिळत नाहीत ? म्हणून रोज विसेक चपात्या रागाच्या भरात जास्त खातोय, एक तर रेसेशन चालू आहे आणि हे असं भस्म्या झाल्या सारखं खाऊन रेशन पण पटकन संपतंय) कधी कधी उद्भवलेले व्हेज-नॉनव्हेजिटेरियन्स चे वाद लक्षात घेऊन एक सुचना करावीशी वाटते. चिकन, मटण , मासे , बोंबिल , सुक्कट, प्राँप्लेट इत्यादी भावना भडकवू (काय चाल्लय हे ?

सुपारी की ब्ल्याकमेल

लेखक स्वामि यांनी रविवार, 26/04/2009 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत कधी ड्रायव्हर सारख्या टुकार माणसाबरोबर डील करण्याचा योग आला नव्हता,ही जात साली परधार्जिणी असते.कधी चुकुनही मालकाच्या गाडीचं कौतुक करणार नाही.झेन चालवत असतील तर स्विफ्टचं कौतुक,स्विफ्ट चालवत असतील तर इनोव्हाचं कौतुक,च्या मायला ह्यांच्या बुडाला गार वाटावं म्हणून घेतली काय गाडी!तर ह्या च्युत्याचं नाव आहे बाबु.असल्या नावांचं एक बरं असतं,म्हटलं तर नाव,नाहीतर टोपण नाव.उद्या गेम झाली की पोलिसांना काय सांगु?माझ्याकडं बाबु नावाचा ड्रायवर होता म्हणुन?कानाखाली आवाज काढतील माझ्या पहील्यांदा.आडनाव काय,राहातो कुठं,त्याचं कुटुंब कुठं असतं,वात पेटवतील शंकांची.आणी 'सुशिक्षित'अशी शिवी पण देतील जाताना.

महाराष्ट्र गर्व माझा

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
१ मे २००९ महाराष्ट्र राज्य स्थापना सुवर्ण महोत्सवी माझी ही कविता माझ्या महाराष्ट्रासाठी !
संतांची पुण्यभूमी वीरांची रणभूमी जगात वेगळा महाराष्ट्र माझा शिवबा माझे दैवत भवानीची मला सोबत जोशात लढेन दर्याला हरवेन पंचगंगेचे पाणी कोल्हापूरी वाणी शत्रुंनो तलवार म्यान करा वाहतील रक्तांच्या धारा महाराष्ट्र गर्व माझा
कवितेमधील व्याकरण व लय चुका सुधारण्यासाठी प्राजु ह्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

जे मला दिसले ते

लेखक दशानन यांनी रविवार, 26/04/2009 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
वाकडा कंपु तिकडी चाल सगळे भरती माल रिते आमची झोळी शब्दांवाचूनी यार प्रतिसादांच्या लढाईमध्ये एकाची वरताण तर दुसरा घासे वहाण ह्या दारातून त्या दारावर प्रतिसाद बद्दल प्रतिसाद शब्दांना विके कोणी शब्दांसाठी लिहतो एकच बाकी +१ सगळे मागोमाग भार लिहतोय कोण भांडतोय कोण शब्दांना वेठिस धरतोय कोण एक खवाट बाकी सुसाट डुप्लिकेट आयडीचा नेहमीच सुळसुळाट एक नारी नाव धरे भारी हवा दिसे तीज विषारी शब्दांत तीच्या जळजळाट फार तळपते सोडून विषय पार !

गणीताच्या गमति

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 26/04/2009 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
काहि साईट्स गुगळत असताना खालिल गणीताच्या गमति मिळाल्या..त्या डकवत आहे The following is a "proof" that one equals zero. Consider two non-zero numbers x and y such that x = y. Then x2 = xy. Subtract the same thing from both sides: x2 - y2 = xy - y2. Dividing by (x-y), obtain x + y = y. Since x = y, we see that 2 y = y. Thus 2 = 1, since we started with y nonzero. Subtracting 1 from both sides, 1 = 0.

फिक्शन - मी त्याला चावलं

लेखक टारझन यांनी रविवार, 26/04/2009 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
सन ३१०२ : मेचा कडक थंडीचा हिवाळा ,सगळी कडे बापे लोक .. आप्पाराव सोपानराव वाघमारे हॉस्पिटलचा परिसर, णर्सोबांची (मेल णर्स) धावपळ !! मॅटर्निटी वॉर्डचा परिसर .... मजला नंबर ४१०, रूम १२: -------------------------------------------------------------------------------------------------------- ऍकिलोप्टस आपल्या पाचव्या डिलेव्हरीसाठी आला होता , अजुन एका डिलेव्हरी नंतर त्याची ओव्हर संपणार होती . ३ वर्षांपुर्वीच ऍकिलोप्टस आणि काळूराम ह्यांचा विवाह झाला होता... आनंदात दिवस जात होते आणि ऍकिलोप्टसची एकेक डिलेव्हरी होत होती .. सगळी सरळसोट गोरी पोरं ?

तात्या अभ्यंकर्...व्यक्ति? वल्ली? विशेष? इतर प्रश्न

लेखक येडा खवीस यांनी रविवार, 26/04/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इथे मी नवा आहे. आपल्या मिपाचे मालक श्री तात्याजी अभ्यंकर या व्यक्तिविषयी माझ्या मनात गेले अनेक दिवस गुढ स्वरुपाची वलये निर्माण होतायत. हा माणुस नेमका आहे तरी कसा पार शास्त्रिय संगीतापासुन आध्यात्मापर्यंत आणि बाईबाटली( क्षमस्व!!) पासुन खवय्येगीरीपर्यंत सगळ्या विषयांना भोज्जा करुन आलेला हा अवलिया नेमका कसा आहे? तो मला प्रश्न पडलाय कधीपासुन... तात्यांचे लग्न झालय का? ( आणि नसल्यास ते अजुन का थांबलेत? आमच्यासारख्या विवाहितांच्या मत्सराचे पाश आवळले जातील बरं का) तात्यांचा स्वभाव नेमका कसा आहे?

गौडगावचा जाग्रुत मारुती

लेखक सनविवि यांनी रविवार, 26/04/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल! हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला.