Skip to main content

मुखवटे

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 27/04/2009 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कोणास दोष देऊ..? मी ही गर्दीतला .. जात्यातला कधी , तर कधी सुपातला . माझ्याच सोबत्याची , अंत्ययात्रा हो निघाली , सण्डे होता म्हणुनी , मी ही अटेण्ड केली . दूरुनच जरा घेतले , दर्शन पार्थिवाचे , उपचार जरासे केले , अंत्ययात्रेत चालण्याचे . दुरुन उपचार सारे , मग आंघोळ तरी कशाला..? मी करुनी विचार ऐसा , बाजार सण्डेचा केला . सारे असेच होते , जे भेटले तिथेही , हायसे वाटले मलाही कि त्यांच्यातलाच मी ही घरे कसली आमुची ..? हे अड्डे संभावितांचे ..! भेटतील इथे मुखवटे .. प्रत्येक चेह-याचे..!!

आदरांजली !!!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी सोमवार, 27/04/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
सुप्रसिध्द सिने अभिनेते फिरोज खान यांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे फिरोज खान हे खुप दिवसांपासुन कॅन्सर सारख्या असाध्य रोगाने आजारी होते रविवारी रात्री बेंगळुरु ईथल्या त्यांच्या फार्म हाउसवर त्यांचे निधन झाले फिरोज खान म्हणजे बॉलिवुडमधील बोल्ड आणी स्टाइलिश व्यक्तीमत्व होत त्यांचे गाजलेले चित्रपट म्हनजे कुर्बानी, दयावान अशा या जांबाजला भावपुर्ण आदरांजली

भाविष्यकाळातील मिपाकर!

लेखक रम्या यांनी सोमवार, 27/04/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या शेजार्‍याचा शाळकरी चिरंजीव भारीच हुशार, तल्लख बुद्धीमत्तेचा, उत्साही आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, चित्रकला, हस्तकला, वैज्ञानिक प्रयोग यावरील नाना प्रश्न विचारून मला हैराण करतो नुसता. विमान कसं काय हवेत उडतं? या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला राईट बंधूंची कथा सांगितली तर पठ्ठ्या भारावला. आपण सुद्धा विमान बनवू म्हणून मागे लागला. चर्चा रिमोट कंट्रोल्ड विमाना पर्यंत चालत आली. रिमोट कंट्रोल्ड विमानाचं फक्त इंजिन कसं बनवायचं सांगा बाकीचं विमान मी स्वतः बनवतो म्हणून माझं डोकं खाऊ लागला. कुठून दुर्बुद्धी झाली आणि राईट बंधुंची कथा त्याला सांगितली असं होऊन गेलं. त्याची समजूत काढता काढता नाकीनऊ आले.

चांदरात

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 27/04/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
चांदरात
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
तू स्पर्श करता जगा मी विसरले मी हरले अन मीच जिंकले न कळे मला कुणी कुणावर केली मात || १ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
मंचकावर मी बसले कळ सोसते मुश्कील आपल्याच दुनियेमध्ये असती आपण मश्गुल दिवेही पेंगुळले चढत चालली चांदरात || २ ||
हळुवार केसांतुन फिरव तू हात || ध्रु ||
Taxonomy upgrade extras

चुप्पी !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी सोमवार, 27/04/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य दमला, जरा टेकला, अवनीच्या मग, कवेत शिरला, रंग बिरंगी नभाळ चादर, अंगावरती लेवून पहुडला. सृष्टीचे ते रूप आगळे , पाहुनी माझे "मी" पण गळले, "मी" च नाही तर, "तू" ही कैसा..? अद्वैताचे रहस्य कळले..! नकोच आता काही -बाही शब्दांच्या या कळा पुरे, नि:शब्दातून अव्यक्ताचे, रूप होतसे साजिरे... ॐ चुप्पी !चुप्पी !! चुप्पी !!!

का?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 27/04/2009 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
का? सजल्या तुझ्या वेणीवरी मोगरा फुलला न का? ऐन आषाढातला पाऊस का झाला सुका? अजून तू माझ्या कवेत 'एकटा' मी, "दूर" का? सर्वस्व लुटुनी मी कफल्लक हाय् ! तू मजबूर का? राहिल्या गझला अभंग का बुडाला पण तुका? मैफिलीच्या स्वागताला भैरवीचा सूर का? २५ एप्रिल '०९ , स.०६.३०
Taxonomy upgrade extras

"असं वाटतं की झटकन पावसात ओलंचिंब होऊन जावं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 27/04/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसाई फिरायला येणार नाहीत म्हणून निरोप द्यायला आलेली त्यांची मुलगी वृंदा आणि तिची मैत्रीण मालिनी मला तळ्यावर भेटल्या.मालिनीची माझ्याशी ओळख करून देत वृंदा म्हणाली, "तुमच्याशी गप्पा मारायला बरं वाटतं.आमचे भाऊसाहेब तर तसं नेहमीच सांगतात." हे ऐकून मला अंमळ बरं वाटलं. "ही माझी मैत्रीण मालिनी.हिला दोन मुलं आहेत एक मुलगी कॉलेजात जाते." मी वृंदाला म्हणालो, "तू म्हणालीस की मालिनीला दोन मुलं आहेत आणि एक मुलगी कॉलेजात जाते.पण हिच्याकडे पाहिल्यावर ही दोन मुलांची आई वाटत नाही.असं हिचं काय गुपीत आहे की ती अशी दिसावी?" असं बोलून मला एखाद्या विषयावर गप्पा सूरू करायची कल्पना सुचली.

'वसंत' असाही..

लेखक स्वाती दिनेश यांनी सोमवार, 27/04/2009 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपली करडी दुलई गुंडाळून ठेवून सृष्टी वसंताच्या स्वागताला सज्ज झाली. इवलाली कोवळी ,लालसर पालवी फांद्याफांद्यातून उमटू लागली. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निळ्याभोर आकाशाखाली पहाटेचे दवबिंदू पिऊन लुसलुशीत गवत बाहेर डोकावू लागले, त्यातूनच मग रानफुले डोलू लागली. चेरीचे वृक्ष मग नाजूक पांढर्‍या,गुलाबी फुलांनी मोहोरले. 'साकुरा' अंगणाअंगणात फुलू लागला तर मॅग्नोलियाच्या पांढर्‍या,गुलबट मादक अस्फूट कळ्यांनी फांदीनफांदी सजली. खट्याळ ट्यूलिप्सचे अर्धस्फुट कळे कोपर्‍याकोपर्‍यांवरच्या अंगणात दिसू लागले. सफरचंदाची झाडंही सफेद फुलांनी बहरली. एक सुवास वातावरणात कोंदू लागला.