Skip to main content

तुम्ही कुणाला मत दिले/देणार ? का ?

लेखक मुक्तसुनीत यांनी बुधवार, 29/04/2009 01:37 या दिवशी प्रकाशित केले.
धागा सोपा आहे. त्याचा विषय वर लिहिल्याप्रमाणे , तुमचे मत आजमावण्याचा आहे. मला स्वतःला लोकसभेच्या निवडणुकीमधे मतदान करता आलेले नाही. पण इतर लोकांची मते काय , कशी याबद्दल उत्सुकता आहे. तुमच्या मतदानाच्या गुप्ततेबद्दल तुम्हाला काळजी असेल तर येथे नाही लिहिलेत तरी चालेलच. मत द्यायला तुम्ही पात्र नसाल/ गैरहजर असाल तरीसुद्धा आपले राजकीय मत तुम्हाला मांडता येईल. इतरांना काय म्हणायचे आहे ते ऐकावेसे वाटले म्हणून हा प्रपंच. तर मंडळी , या निवडणुकीत तुम्ही कुणाला मत दिले/देणार ? का ? ते पक्ष पाहून दिले का व्यक्ती पाहून ?

डॉक्टर

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 28/04/2009 22:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, थोड्या दिवसांपुर्वी माझ्या लहान भावाबरोबर एक चर्चा केली आणी त्यातुन मिळालेली माहिती आणी अनुभव इथे लिहित आहे. तर माझा लहान भाऊ बी. फार्मसी पदविका घेऊन उत्तीर्ण झाला आणी पुढे व्यवस्थापन शास्त्राची पदवी घ्यायची म्हणुन तयारीला लागला आणी तोपर्यंत काहीतरी नोकरी करायची म्हणुन मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव (एम आर) पदावर एका कंपनीत रुजु झाला होता. तर माझे काही आणी त्याला/ त्याच्या मित्रांना त्या कालावधीत डॉक्टरांचे आलेले काही अनुभव इथे मांडत आहे. ************************************************************* तर डॉक्टर, फार महत्वाची व्यक्ती.

(ठेव दरवाजा खुला...)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 28/04/2009 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा 'ठेव दरवाजा खुला...' ही भूषण कटककर यांची सुंदर गजल! ;) जाहले आहे कठिण, मी भेटणे म्हणजे तुला बेरकी बापुस कधीचा शोधतो आहे मुला! मी सदा वाईट ठरतो, चांगला ठरतो कधी? बंधुराजे गाठ पडता, ठणकतो माझा कुला दूरदर्शन व्हायचे मज तेवढी होती मुभा हलवताना हात दिसली दूरच्या कोणा मुला रोजचा हा सीन, देते पोरगी हुलकावणी मारते फाट्यावरी पण मारते तोवर डुला! छापकाटा चालला आहे नशीबाचा असा वाट का मी बघत राही रातचा लकडी पुला! रोज काटे टोचती जे आज देखिल टोचले का पुन्हा मी हासलो पण आज दिसलेल्या फुला हाय!

विक्षिप्त नायिका...मूर्खाचा बाजार.

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 28/04/2009 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
झी टिव्हीवरील एका मालिकेसाठी आता आंब्याचे खरे खुरे झाड जाळणार. हॅटस्‌ ऑफ प्रॉडक्‍शनची "श्री' ही मालिका सध्या "झी टीव्ही'वर चालू आहे. जयेश पाटील यांनी ही मालिका लिहिली आहे. अंकुश मोहल्ला यांनी या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी हाती घेतली आहे. जे. डी. मजेठीया आणि आतीश कापडिया या मालिकेचे निर्माते आहेत. मालिकेमध्ये खलनायिका मनोरूग्ण अथवा विक्षिप्त दाखवण्यासाठी आता हे झाड जाळणार म्हणे. शूटिंगसाठी जाळायचे तर खोटे झाड जाळावे ना. खरे झाड कशाला जाळायचे? मालिकेतिल खलनायिक मनोरूग्ण असणं ठिक आहे ..

मातीचेच पाय

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 28/04/2009 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
श्रद्धा, भक्ती, आत्मीयता, विश्वासाचा अर्थ काय? जिथे माथा टेकवावा, तिथे मातीचेच पाय! मंदिराची शोभा न्यारी, मूर्ती मात्र भंगलेली वैभवाची ऐट हंड्या-झुंबरात टांगलेली देवाच्याच दारी होई देवाचाच निरुपाय मांगल्याची, पावित्र्याची चंद्रभागा का आटली? सुकला स्तब्ध अश्वत्थ, इंद्रायणीही गोठली पापभार सांभाळून झिजले देवाचे पाय कशी, किती जोजवावी माया ममतेची नाती? त्याग राहिला गहाण लालची स्वार्थाच्या हाती कधी देव, कधी दैव, सारे थकले उपाय!
Taxonomy upgrade extras

आणखी एक मराठी संकेतस्थळ

लेखक विकि यांनी मंगळवार, 28/04/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
!! सर्वप्रथम सर्वांना लाल सलाम !! बातमी कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाने नुकतेच एक सुंदर असे मराठी संकेतस्थळ सुरू केले आहे येथे टिचकी मारा व या संकेतस्थळावरही वावरा. आपला कॉ.विकि

श्री गजानन महाराज ! भक्तिरचना...

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 28/04/2009 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो.... आत्ता पर्यन्त तुम्ही माझ्या ' प्रेम कविता ' वाचल्यात... त्यांना खुप छान प्रतिसाद दिलात.... आता मी ... ही भक्तिरचना... तुमच्या पुढे सादर करित आहे..... || श्री गजानन महाराज || गजानन नाम... ज्याच्या मुखातुन... [२] चित्ती समाधान.... लाभतसे.... [२] गजानन नाम .... || धृ. || शेगावी प्रगट्ला.. उद्धारण्या जगा प्रेमरुप झाला... भक्तांसाठी... मनोभावे, मुखी घ्यावे.. [२] गणी गणात बोतें.. गजानन नाम .... || १ || काया-वाचा-मने... चित्त एक झाले जीव-शिव तत्व ... एकरुप झाले .. नामा संग, झालो दंग..[२] अंत पार झाला.. गजानन नाम ...
Taxonomy upgrade extras

मुंबई

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 28/04/2009 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
आज सारे जण असे म्हणतात कि मुंबई भारताचि आर्थिक राजधानि आहे....मुंब‌ईतील सभेत बोलताना सोनिया गांधी यानि " मुंब‌ई सर्वांची आहे " असे विधान केले,पण असे कुणिच म्हणत नाहि कि मुंबई महाराष्ट्रांचि राजधानि आहे...अत्रे,डांगे,एस,एम,जयवंत राव टिळक.यांचे नेतृत्व .१०६ हुताम्याच्या बलिदाना नंतर मुंबई महाराष्ट्राला मिळालि..आज ५० वर्षे झालि..पण आपल्याला मुंबई आपलि म्हणुन टिकवता आलि का?

दुर का रे असतो

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 28/04/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
दुर का रे असतो दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
घालीत होती वेणी सकाळी
आरशासमोर होते उभी मी
न दिसे माझी मला मी
परी दिसलास तू || १ ||
दुर कारे असतो सखया जवळी ये ना तू || ध्रु ||
Taxonomy upgrade extras