Skip to main content

विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण

लेखक धनंजय यांनी गुरुवार, 30/04/2009 01:33 या दिवशी प्रकाशित केले.
विंदा करंदीकरांची बालकविता - एक रसग्रहण
विंदा करंदीकरांनी आधुनिक मराठी कवितेवर छाप पाडली आहे. विसाव्या शतकातले बदल समाजाला भरडत होते, तसे समाजाला नवी संधी सुद्धा देत होते. यातील काही विषण्ण, काही स्फूर्तीदायक, काही वैचारिक अशी काव्ये आपण वाचलेलीच आहेत. आता आपण त्यांच्या बालकवितांबद्दल थोडी चर्चा करूया. या काळातल्या कवींनी मराठीतील प्रौढासाठीच्या कवितांनाही एक वेगळा आकारही दिला. मराठीची नैसर्गिक आघातांची जी लय आहे, प्राचीन वृत्तांऐवजी त्या लयीत विंदा करंदीकरांनी रचना केली.

अंधार चांदण्यांचा

लेखक आनंदयात्री यांनी गुरुवार, 30/04/2009 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तररात्रीनंतर किंवा पहाटेच्या आधी पोर्णिमेचा सुरेख गोलाकार चंद्र पश्चिम क्षितिजावर त्याचे अस्तित्व टिकवायला झगडत असावा. आकाशाच्या छातीवर चित्रविचित्र आकार गोंदणारे गुढ तारकासमुह फिकट पडुन लुप्त होण्याची भिती बाळगुन असावेत, वाराही साफ पडलेला असावा. दिवसाला दिवस जोडणारा दुवा मी असाच उघड्या कोरड्या डोळ्यांनी संपवत आणलेला असावा. अन आता ते चंद्राचे पश्चिम क्षितिजावर बुडणे असह्य होत जावे... उघड्या डोळ्यांनी सुरु व्हावा एक स्वप्नमयी भास .. कुठल्याश्या गर्द झाडीत बुडालेल्या दोन डोंगरांच्या दरीत असलेली नदी आणी तिच्या किनार्‍यावर कोरलेली लेणी.

फिनिक्ससाठी मराठी शब्द सुचवता येईल?

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 29/04/2009 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा आपल्याच राखेतून जन्माला येणारा पक्षी आहे, असं ऐकलं आहे. मला फिनिक्स या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द हवा आहे. मला सुचलेले काही शब्द इथे देतेय, ते योग्य आहेत का, हेही सुचवावं. मला सुचलेले शब्द :- अग्निपाखी, अंगारपक्षी, भस्मजन्मा. आणखी नव्या शब्दांचं स्वागत आहे.

नवी मराठी अक्षरमुद्रा- अक्षरयोगिनी

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 29/04/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्नेही श्री. रवि पांडे ह्यांनी नुकतीच एक नवी मराठी अक्षरमुद्रा विकसित केली आहे. ह्या अक्षरमुद्रेला त्यांनी सुंदरसे नाव दिले आहे- अक्षरयोगिनी. त्यांचा विरोप पत्ता- 'panravi@yahoo.com' ही अक्षरमुद्रा तुम्हाला खालील दुव्यावरुन उतरवून घेता येईल. http://aksharyogini.sudhanwa.com/aksharyogini.html

(किती धीर ठेवू?)

लेखक आंबोळी यांनी बुधवार, 29/04/2009 15:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना प्रतिसाद कुणाचा मिळावा मलाही 'तिरस्कार वाटू नये आपला' ही कधी तिला आजार होतो गळ्याचा कधी थांबतो ना तिचा खोकलाही किती वाट पाहू? किती धीर ठेवू? कधी जायची विडंबनाची बला ही? कशाला अश्या बिड्या ओढायच्या मी? किती धूर हा तुलाही, मलाही! अरे काल झाला असे जन्म माझा जगावे म्हणेतोवरी विडंबलाही कंदीलसुमार
Taxonomy upgrade extras

क्वर्टी किबोर्ड

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 29/04/2009 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
क्वर्टी किबोर्ड ची आज अचानक आमच्यात चर्चा झाली ती एकाने नोकियाचा नवा मोबाईल आणल्यामुळे. ह्या चर्चेतून खूपच रंजक माहिती मिळाली. क्वर्टी किबोर्डला क्वर्टी किबोर्ड हे नाव पडायला त्या किबोर्डावरील Q च्या रांगेतील पहिली सहा अक्षरे कारण आहेत. पण मुळात ही अक्षरे अशा पद्धतीने मांडायला एक कारण असे होते की, आपल्याला ज्या अक्षरांचा सतत वापर इंग्लिश लिहितांना करावा लागतो, त्यांचा टाइपबार पुर्वीच्या टाईपरायटरच्या वर एकमेकांना अडचण ठरु नये अथवा आदळू नये.

जगाची रित.

लेखक जागु यांनी बुधवार, 29/04/2009 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगाची ही रितच न्यारी, कसेही वागा निंदाच पदरी ! गुणी, सज्जन ठरतो बावळट, स्पष्टवक्ता, म्हणे आम्हास उद्धट ! शांत व्यक्तीला 'माठाची' ची उपमा, चतूराच्या माथी, धटिंगडाचा तुरा ! सुट्टी घेतल्यास होतो कामचुकार, राब-राब राबल्यास ओटी चा भिकार ! सुखात नांदल्यास, बायकोचा बईल, समाजात गुंतल्यास, ह्याचे कसे होईल ? दान करणार्‍यावर, काळ्या पैशाचे लेबल, काट्-कसर करणारा, कंजूष एक नंबर ! निंदकाचे घर असावे शेजारी, शेजार्‍यालाही असतोच शेजारी !
Taxonomy upgrade extras

नाते प्लेटॉनिक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 29/04/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी एक सुंदर कन्या कॅफे मधे आली. संगणकाबरोबर फोन पण चालु होते, कॅफेत आम्ही दोघेच असल्याने माझे कान सहजच तिकडे लागले होते. अंदाजे ४ थ्या कॉलला एक वाक्य कानावर पडले, "शट अप मॅन, माझे आणि त्याचे नाते प्लेटॉनिक आहे". आता ही काय भानगड आहे ते कळेना. क्षणभर मला 'सापेक्षता वादाचा सिद्धांत' लागोपाठ दोनद वाचल्यावर येउ शकेल तसा मठ्ठपणा आला. दोन मुनीवर्य नजरसमोर होते. १. अवलिया. अवलिया ऑन लाईन नव्हते. २.गुर्जी. हे पण गायब होते पण भ्रमणध्वनी उपलब्ध होता. म्हणजे गुर्जीना विचारण्याशिवाय पर्याय नव्हता, एरवी मी व्यनी वगैरे करुन उत्तराची वाट बघतो पण आज फारच उतावीळपणा आला होता.

(नजरा!!)

लेखक घाटावरचे भट यांनी बुधवार, 29/04/2009 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - प्राजुतैंची नजरा ही कविता. डिसक्लेमर - प्रस्तुत कवीची(?) अर्थातच तेवढी लायकी नसल्याने विडंबन करतेवेळी वृत्त / छंद यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. असतात ओळखीच्या ज्या ज्या समोर नजरा महिना अखेर येता डसतात त्याच नजरा रीती-रिवाज कसले, अन मित्रही कुठोनी चुकवीत हिंडताना त्यांच्याच आज नजरा बिनधास्त हिंडण्याचे नाहीत दिन गड्या रे बुरखाच त्या कदाचित चुकवू शकेल नजरा सध्या बरी घरातच वस्त्रे ती सर्व भारी त्यांच्यात पाहिले तर धरतील आज नजरा ती फाय फाय फाय गेली कधीच हातुन हाती टिकू न देती साधी बिडीही नजरा देणेकर्‍यांस साल्या टा
Taxonomy upgrade extras

[ठेव दरवाजा खुला...]

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 29/04/2009 04:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा भूषण कटककर यांची रचना ठेव दरवाजा खुला... पाडली आहे गझल, जी समजणे अवघड तुला ठेवली मुद्दाम आहे मी अलामत ही 'उ' ला मी कसा वाईट ठरलो, सांगतो आता तुम्हा (गोपिनाथाच्या बरोबर जायचो मी चौफुला) दूरदेशी आमचा हा घोळ होतो नेहमी समजतो बाईच आम्ही केशसंभारी मुला जाहले आयुष्य आहे, आमचे बुजगावणे बायको सांगेल तैसे या इथे आता डुला छापकाटा चालला आहे कधीचा हा तिचा एकदा लागेल नंबर याच आशेवर झुला हेच होते शेवटी जे आज माझे जाहले एवढे हासू नका शेकेल तुमचा ही कुला तू विडंबन पाडले आहेस भीषण "केशवा" खैर ना आता, पळाया ठेव दरवाजा खुला