एकाकी
तुझ्या आठवणींच्या साम्राज्यात
खितपत पडलेत माझ्या शब्दांचे गुलाम
तुझ्या रक्तलाल नजरेचे
विषारी डंख सोसत
गस्तीला आहेतच स्पंदने
तू मला नाकारल्यानंतरची
अर्ध्यावरतीच सोडून गेलीस
सोबतीचे उबदार हात
माझी मलाच चालावी लागेल
पायाखालची एकाकी वाट
म्हणुनच मी आता ठरवलंय !!!!
आपणच करायचा एकट्यानं प्रवास
कशाला हवी कुणाची आस ????
ज्यांची सोबत हवी तेच
वाटेवर काटे रोवत जातात
सावल्यासुद्धा काळोखात
साथ सोडून जातात
खिंडारातुन डोकावणारं चिमुकलं फुल
खळाळणारा स्वच्छंदी झरा
करतात काळजी कोणाच्या सोबतीची ??
शेवटी आपणच परतवायचा हुंदका अनावर
आपणच करायचे आपल्यावर
व्यवस्थित अंत्यसंस्कार
मिसळपाव