मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एकाकी

स्वप्नयोगी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझ्या आठवणींच्या साम्राज्यात खितपत पडलेत माझ्या शब्दांचे गुलाम तुझ्या रक्तलाल नजरेचे विषारी डंख सोसत गस्तीला आहेतच स्पंदने तू मला नाकारल्यानंतरची अर्ध्यावरतीच सोडून गेलीस सोबतीचे उबदार हात माझी मलाच चालावी लागेल पायाखालची एकाकी वाट म्हणुनच मी आता ठरवलंय !!!! आपणच करायचा एकट्यानं प्रवास कशाला हवी कुणाची आस ???? ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात खिंडारातुन डोकावणारं चिमुकलं फुल खळाळणारा स्वच्छंदी झरा करतात काळजी कोणाच्या सोबतीची ?? शेवटी आपणच परतवायचा हुंदका अनावर आपणच करायचे आपल्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार

वाचने 2168 वाचनखूण प्रतिक्रिया 10

आनंदयात्री 11/05/2009 - 19:37
खिंडारातुन डोकावणारं चिमुकलं फुल खळाळणारा स्वच्छंदी झरा करतात काळजी कोणाच्या सोबतीची ?? शेवटी आपणच परतवायचा हुंदका अनावर आपणच करायचे आपल्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार खल्लास !! बास एकच शब्द !! सहीच कविता केली आहेस रे तु !! आवडली.

क्रान्ति 11/05/2009 - 20:56
ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात जबरदस्त कविता. क्रान्ति ***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ*** www.mauntujhe.blogspot.com

In reply to by क्रान्ति

प्राजु 11/05/2009 - 20:59
हेच म्हणते. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सायली पानसे 12/05/2009 - 08:33
जबरदस्त कविता.

अवलिया 11/05/2009 - 22:17
आपणच करायचे आपल्यावर व्यवस्थित अंत्यसंस्कार +++++१ --अवलिया

अश्विनि३३७९ 12/05/2009 - 10:52
ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात मस्त कविता .. खुप आवड्ली :*

सँडी 12/05/2009 - 11:17
खिंडारातुन डोकावणारं चिमुकलं फुल खळाळणारा स्वच्छंदी झरा करतात काळजी कोणाच्या सोबतीची ?? एक नंबर! खुपच सुंदर! -संदीप. काय'द्याच बोला.

मराठमोळा 12/05/2009 - 15:13
जोरदार प्रेमभंग कविता. ;) येऊ द्या अजुन. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

मदनबाण 14/05/2009 - 07:42
ज्यांची सोबत हवी तेच वाटेवर काटे रोवत जातात सावल्यासुद्धा काळोखात साथ सोडून जातात सॉलिट्ट्ट.... (स्वप्नाळु) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.