Skip to main content

अमेरिकेतील राज्यपध्दती

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 11/05/2009 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, लवकरच भारतात १५ व्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल आणि नवे सरकार कोणाचे हे ठरेल.मतमोजणीला पाच दिवस राहिले आहेत आणि आपल्यापैकी सगळ्यांनाच भारतातील राजकिय व्यवस्था कशी असते याविषयी माहिती आहेच.या लेखातून अमेरिकेतील राजकिय व्यवस्था कशी आहे याची माहिती देण्याचा प्रयत्न राहिल.खरे म्हणजे अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीच्या वेळी हा लेख लिहिणे अधिक योग्य ठरले असते पण त्यावेळी मी परीक्षांमध्ये बुडून गेलो होतो आणि हा लेख लिहायला तेव्हा अजिबात वेळ नव्हता.भारतात मतमोजणी सुरू होत आहे तोपर्यंत अमेरिकेतील राज्यव्यवस्थेची माहिती करून देणे हा या लेखाचा उद्देश आहे. भारत आणि इंग्लंड प्रमाणे अमेरि

उरलेला गतकाल

लेखक जागु यांनी सोमवार, 11/05/2009 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
उरले जे जगायचे, वाया क्षण गतकालीचे, जगूनी क्षण साफल्याचे, माघारी तव फिरुनी यावे. राहीले जे मिटायचे, वाद आप्त - परकीयांचे निपटून सारे वाद, गोडी-गुलाबी परतूनी यावे. राहीले जे अधुरे, स्वप्न मनातील जागपणीचे स्वप्न साकारुन मनीचे, समाधान जिंकून यावे. उरले जे ऋण भाळीचे, संकटकाळी उपकाराचे फेडुन ऋण उपकाराचे, ऋणास त्या वंदूनी यावे. राहीले जे जुळवावयाचे, आप्तसंबध माणूसकीचे जोडूनी नाते माणूसकीचे, माणूस बनुनी माणसांत यावे. राहीले जे योग्य फलाचे, कर्तव्य ते जीवनाचे फळ मिळवून कर्माचे, कर्तव्यदक्ष बनुनी यावे. राहीले जे भोगावयाचे, भोग जगल्या पापाचे भोगुन भोग गतकालाचे, उरले जीवन पुर्ण जगावे. .
Taxonomy upgrade extras

प्रतिसाद

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 11/05/2009 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
कोणी आपुलाची बोलु वाचे कौतुके वात येईल इतुके प्रतिसादे चौफेर रांधे जैसे भातुके खेळे नृपकन्या बोलाची कढी बोलाचेची बोलु बोलाचेची खापरें पुसोनी तैया ताजी होई .....ये काव्यखेचर आज रोजी मिपा मुकामी मिपा संस्थळी विजुभाऊ करवी अवांतरी प्रतिसाधका प्रत मस्तकी हाणीतले
Taxonomy upgrade extras

अंत...

लेखक दशानन यांनी सोमवार, 11/05/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक --/--/२००९ काही दिवसापासून गायब असलेले श्रींमत कपडे व्यापारी अजय ठाकूर ह्याचे शव जयपुर एक्स प्रेस हायवेच्या जवळ कुजलेल्या अवस्थेत मिळाले.

ऍट्लास

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 11/05/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही कधी प्रभादेवी ओलांडुन वरळीला जायच्या कोपर्‍यावर सेंचुरी मील्स चा मोनोग्राम बघितला आहे? पुर्ण पृथ्वी खांद्यावर घेतलेला आणि त्यामुळे त्रासलेला ऍटलास. ---------------------------------------------------------------------------------------------- का, हो तुम्हाला आपली नोकरी गेली तर काय होणार ह्याची भिती वाटते का? - ऑफिसला जाताना बायकोने पँटीत विंचु सोडला. नोकरी करत नाही मी. कंसलटंट आहे मी.- माझा डीफेंस. तेच ते. काय ते तुम्ही ट्ण्ट्ण करता ते उद्या नसेल तर? २ महीने जरा त्रास होईल. परत मुळ पदावरयेईल सर्व काही. तु काळजी करु नकोस. - मी आश्वासन दीले. ते कसे काय? - बायको अग हा नाही तर तो.

कुठवर पाहू तुझी मी वाट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2009 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुठवर पाहू तुझी मी वाट

कुठवर पाहू तुझी मी वाट
सा़जणा, आठवण तुझी येते ||

एकटी मी मनामध्ये कुढते
वेड्या शंकेने उर धडधडते ||

भेट तुझी आहे जवळी
तिच्यामध्येच तुला बघते ||
Taxonomy upgrade extras

उशीर.....

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
उशीर..... ही हुरहुरणारी सांज अशी अन् भुरभुरणारे केस तुझे असते सुरेख सुंदर कांता पण..... मज दिसती ते गणवेष तुझे ! खिडकीवर , गाली ओघळते ही श्रावणातली धार अशी तू कधी कवळशील सांग सखे हे विरघळते अवशेष तुझे? ही चांदरात गे पुनवेची मी स्वार जुन्या आठवांवरती हा धपापणारा श्वास मला पण ओठांवरती फेस तुझा ! संपले स्वप्न ते सोनेरी अन् माझेही झाले सोने पण मोहरलो मी चितेवरीही गळता.....भिजल्या पापण्यांचे केस तुझे !
Taxonomy upgrade extras

मी कुठवर पाहू वाट ?

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 11/05/2009 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
मी कुठवर पाहू वाट ? मी कुठवर पाहू वाट ? सांग ना..... कुठवर पाहू वाट ? या उत्तररात्री आठवतो मज केशसंभार घनदाट ही रिती शेज अन् तळमळता मी जाते उशीत भिजून पहाट सांग ना , कुठवर पाहू वाट ?सांग ना , कुठवर पाहू वाट ? तो तरुण कोवळा स्वप्नाळू ती सुंदर , शीतल ना कुठला थाट पाहताच तिला तो हरवून गेला ....नयनी आठवांची* ही लाट !
Taxonomy upgrade extras