Skip to main content

तयांचे व्यर्थ न हो बलिदान ( अंदमान पर्व)

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 16/05/2009 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
ध्येयाने भारलेला मनुष्य जेव्हा संग्रामात उतरतो तेव्हा त्याला जीवनाची आशा नसते आणि मृत्युचे भयही नसते. अखेर बलाढ्य शत्रूही अशा वीरांपुढे हतबल होतो. हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना, युगांतर, अनुशिलन चे क्रांतिकारक हे ध्येयवादाचे प्रतिक आहेत. हाती शस्त्र घेउन रणांगणात उतरलेले हे योद्धे. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले, काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले, काही फासावर चढले आणि आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाले. मात्र या सशस्त्र संग्रामपर्व गाजविणाऱ्या संघटनांमध्ये कार्यरत असलेले अनेक वीर इंग्रजांच्या हाती जीवंत सापडले आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेला गेले.

लाल झेंडा अमर रहे !!

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 16/05/2009 20:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे आशास्थान: कॉ. बंधू आणि भगिनींनो, आपल्या पूजनीय आणि "आदर्श" लाल झेंड्याचा लोकसभा निवडणूकांत सपाटून पराभव झालेला आहे. स्थिती इतकी वाईट आहे की देशाचे आशास्थान सोडाच पण ह्या निवडणूकांत झालेल्या या पानिपतातली लक्तरे कुठल्या वेशीवर टांगायची हा प्रश्न "साध्या राहणीच्या" प्रकाशजी करत यांना पडला आहे. प.

ओझं

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 16/05/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालणं नसतं, उंच भरारी घेणार्‍याला आभाळाचं ओझं नसतं.

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 16/05/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो. आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे.. 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे!

मनसेमुळे सेना - भाजपा युती मुंबईत साफ झोपली

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शनिवार, 16/05/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंच्या करिश्म्यामुळे मुंबईत शिवसेना भाजपा युतीचा सुपडा साफ झाला मनसे सारख्या नवख्या पक्षांच्या नवख्या उमेदवारांमुळे शिवसेना भाजपाचे राम नाईक गजानन किर्तीकर किरिट सोम्मया सारखे दिग्गज उमेदवार पडले आहेत मनसेची लाट युतीची वाट लावणार ’ , असं समीकरण राजकीय विश्लेषकांनी आणि अभ्यासू मतदारांनी ३० एप्रिलला मतदानाच्या दिवशीच मांडलं होतं. अगदी तसंच चित्र आज पाहायला मिळालं. महाराष्ट्रातल्या १२ जागांवर, जिथे मनसेचे उमेदवार उभे होते, तिथे शिवसेना-भाजप युतीचे अक्षरशः बारा ’ वाजले आहेत. ठाणे आणि मुंबई या शिवसेनेच्या दोन गडांना तर त्यांनी खिंडार पाडलंय.

हा चित्रपट कोणता???

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 16/05/2009 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
केबलवर एक मराठी चित्रपट लागलाय.. साधारण कथा अशी चललीयः कालिंदी, तिचा नवरा- त्याला सगळेजण बेंब्या म्हणताहेत-, नि तिचा भाऊ- अंमली पदार्थाच्या आहारी गेलाय..हे एका घरात राहताहेत. या जोडप्याला मूल नाहीये.. त्यांच्या घरात विदूषकांची फौज आलीये अचानक... देवही आलाय.. मूळचं नास्तिक घर-- आता तिथे देवाचा फोटो पण लागलाय.. कालिंदी देवाचं चांगलं आदरातिथ्य करते.. वर त्याला तिच्याशी संग करून तिचा प्रियकर हो.. नि त्या दोघांचं बाळ म्हणून त्यालाच ये म्हणतेय... देव याला तयार होत नाही... मात्र तो स्वतःचा अंश दुसर्‍या कुणाकरवी पाठवून शास्त्रोक्त पध्द्तीने कृत्रिम गर्भधारणा करवतो... बाळंतपणात ती वारते...

जालियनवाला बाग

लेखक वडापाव यांनी शनिवार, 16/05/2009 09:00 या दिवशी प्रकाशित केले.
जनरल डायर ह्या सैतानाला @#$%^* ( अनेक म्हशीर्वाद'! ) जालियनवाला बाग ही कुसुमाग्रजांची कविता नुकतीच वाचली. त्यात येशूला कवी म्हणतो, की तू नेहमी प्रेमाचा, शांतिचा अन् दयेचा संदेश दिलास. पण आज तुझेच अनुयायी म्हणवणार्यांनी बायका-मुलांत गोळीबार केला. ही तुझ्या काळजात एक नवी जखम आहे. कविता हृदयद्रावक आहे. वाचून झाल्यावर लक्षात आले, की मागच्या महिन्याच्या तेरा तारखेला या अमानवी घटनेला नव्वद वर्षे पूर्ण झाली. त्या दिवशीसुद्धा आम्ही डाराडूर झोपून राहिलो होतो आणि अजूनही बर्याच बाबतींत निद्रावस्थेत आहोत.

निवडणुक निकाल आंतरजालावर कुठे दिसेल?

लेखक गणा मास्तर यांनी शनिवार, 16/05/2009 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा निवडाणूकीचा निकाल आंतरजालावर कुठे दिसेल? चांगले खात्रीशीर संस्थळ माहित असेल तर सुचवा. धन्यवाद, गणा मास्तर सरपंच भोकरवाडी ग्रुप ग्रामपंचायत.