Skip to main content

ओढ माहेरची

लेखक जयवी यांनी रविवार, 17/05/2009 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतं लग्न होऊ दे नाहीतर लग्नाची पंचवीस वर्ष होऊ देत……. माहेरी जायचं म्हटलं की एक आगळाच आनंद होतो…….आईला आणि लेकीलासुद्धा. आपल्या कोडकौतुकात वाढलेली लेक एकदम दुस-याला देऊन टाकायची आणि मग वर्षातून किमान एकदा तरी तिला भेटायची इच्छा कुरवाळत कुरवाळत दिवस पुढे ढकलायचे. “निघाले आज तिकडच्या घरी….” म्हणणा-या लेकीला डोळ्यात साठवून अश्रूंच्या पडद्यातून निरोप द्यायचा आणि तिच्या वाटेकडे डोळे लावून बसायचं. आपल्या भारतीय संस्कृतीतच असतं मात्र हे असलं जीव लावणं. सगळं आयुष्य मुलांभोवती गुंफ़णं. त्यांच्यापलीकडे विचारच करायचा नाही.

लोकसभा निवडणुक निकालांचे अंदाज: माझे गेस्टीमेट किती बरोबर किती चूक?

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 17/05/2009 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मी लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच उत्तर भारत , पश्चिम भारत , दक्षिण भारत , पूर्व भारत आणि एकत्रित अंदाज मार्च महिन्यात व्यक्त केले होते.लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यावर माझे स्वत:चे अंदाज व्यक्त करणे हा माझा आवडता प्रकार आहे.यावेळी प्रथमच मी हे अंदाज आंतरजालावर प्रसिध्द केले. आता यापैकी किती बरोबर आले आणि किती चुकले हे शक्य तितक्या थोड

मिहार

लेखक दवबिन्दु यांनी रविवार, 17/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोनतीबी सोसायटी म्हनली कि डोल्यापुढ आपसात भांडनारे सोसायटी मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन कान्दीवली मधी चारकोपला येक मिहार नावाची हायफाय हौसिंग सोसायटी हाए तिथ कोन्त्याबी मेंबराकड लग्न, एन्गेजम्येंट आस कायबी आस्ल तर सोसाटीतले सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. नंतर लग्न, एन्गेजम्येंटच्या ४-५ दिवस आधि सर्वे मिळुन रातभर नाच गाणी म्हंतात. मी गेल्या वेळला तिथ गेलो व्हतो आमच्या पाव्हन्याकड लग्न होत तर सर्वे जमले आनि परत्येकान सारी रात जुन्या हिंदी पिक्चरामधली गानी म्हटली. सोबतीला ढोल्की होती आनी घुंगरु, पन्जाबी चिपल्या आस काय काय होत. जास्त करुन लताजीची गानी म्हटली.

श्रेय

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 17/05/2009 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या या कवितेचे सारे श्रेय तुझे कवितेचा आशय तू शब्द मात्र माझे

लालू प्रसाद यादव ह्यांचा निवडणूक निकाल..

लेखक अनुप कोहळे यांनी रविवार, 17/05/2009 03:17 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, नमस्कार, २००९ च्या निवडणूकी चा निकाल लागला. लालू पाटलीपुत्र येथून निवडणूक हरले आणि सरण येथून जिंकले. हे कसे काय? कुणी स्पष्टीकरण देईल का?

लोकशाही २००९

लेखक विकास यांनी रविवार, 17/05/2009 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसंख्येने जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या भारतात आज १४ व्या लोकसभेचे सूप वाजले आणि १५ व्या लोकसभेच्या आगमनाची तुतारी. काँग्रेससह संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार येणार हा केवळ औपचारीकतेने होण्याचा विधी उरला आहे. सर्वप्रथम त्यानिमित्त काँग्रेस आणि सपुआचे अभिनंदन. वृत्तपत्रातील बातम्यांचा विचार केला तर, या वेळेस उत्तरप्रदेशात वेगळी चूल मांडून एका अर्थी धोका पत्करत, विशेष करून त्या निर्णयास काँग्रेसमधील ढुढ्ढाचार्यांचा विरोध असूनही यश मिळवून दाखवल्याबद्दल राहूल गांधींचे पण अभिनंदन.

कारुण्याशा

लेखक शरदिनी यांनी रविवार, 17/05/2009 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
कारुण्याशा... एक कारुण्यडगरीवरचा रौद्रभीषण चिपसेट मत्तदुर्दैवाच्या औक्षणधुंद करालदाढा कर्र कर्र कर्र कर्र सत्यवानाच्या तहवैभवाने टाकलेले सुन्नगारूड अन जवनिकेतून कर्णिकेकडे खळाळणारा रुधीरप्रवाह लब डब लब डब नयनांच्या दलदलीतला हलताडुलता वंचनदाह स्व-टाहोने लिंपून घेतलेला शारीर खुळखुळा खुळा रे खुळा, खुळा रे खुळा... एका स्वप्नपिंपळपानावरून पुनश्व हरि ओम पीतवल्लरींच्या अनुमानात कडाडबूम मेघवर्षा धो धो धो... अन मग सारंच शांत.. पुढच्या पिंपळपानापर्यंत... १६ मे २००९ , पुणे
Taxonomy upgrade extras