Skip to main content

उंदीरनामा

लेखक सुबक ठेंगणी यांनी मंगळवार, 19/05/2009 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी लहानपणी उंदीर मला आवडायचा. कारण तेव्हा जेरी किंवा मिकी माऊस हाच खरा उंदीर अशी उंदराची प्रतिमा भलतीच ग्लॅमरस होती. खरा उंदीर पाहिला तेव्हा अशा विध्वंसक आणि पाताळयंत्री प्राण्याला गोंडस रूप देताना वॉल्ट डिस्नेने किती कल्पकता खर्ची घातली असेल ह्याचा अंदाज आला. बहुतेक जो जेरीस आणतो तो जेरी असंही वाटलं. शाळा-कॉलेजात असतानाही माझ्या कित्येक स्वप्नांचा व्हिलन उंदीर (किंवा उडरं झुरळ) असायचा. घरची बेल वाजते आणि दरवाजा उघडावा तर शे दीडशे गलेलट्ठ उंदीरांची टॊळीच घरात शिरते किंवा एम. ए. चा पेपर आहे आणि माझ्या सगळ्या नोट्सचं उंदराने भुस्कट पाडलंय अशी स्वप्न मला कितीतरी वेळा पडायची.

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०२)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/05/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा या लेखनमालेच्या पहिल्या भागात काही सदस्यांच्या प्रतिसादास मी सहमत आहे तसाच असहमतही आहे. तरीही मिळालेल्या प्रचम्ड प्रतिसादामुळे ( २६ प्रतिसाद ८६८ वाचने) मी पुढचा भाग लिहीत आहे. एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवण्याचे तुम्ही ठरवले असेल तर सर्वप्रथम तुमचे अभिनन्दन तुमच्या निश्चयाला आमचा सलाम.

कोण म्हणाले

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/05/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणाले हे तुजला ; ऐसे मी करणार नाही खोट्या शपथाना या पुढे अजिबात बधणार नाही दिल्या घेतल्याशिवाय होतात व्यवहार हे मी सांगणार नाही दिल्या घेतल्या शिवाय व्यवहार अजिबात मी करणार नाही प्रतीज्ञेत " भावंड्"म्हणेन; आप-पर मानणार नाही स्वार्थ माझा येता समोरी ; आप-पर जाणणार नाही "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे" हे मिथ्य मांडणार नाही "दिल्या घेतल्याने होत आहे आधी दिलेघेतलेची पाहिजे: हे सत्य सोडणार नाही जमवेन जरी नाठाळांची गर्दी ;नाठाळ मी ठरणार नाही तालावरी नाचेन त्यांच्या मग विरोधच उरणार नाही लाचार जरी कोणी म्हणेल ; लाज मला वाटणार नाही लाचारीमुळेच मिळे मलीदा ;सत्य त्यांस सांगणार नाही बोल
Taxonomy upgrade extras

अंत

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 19/05/2009 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
फुलत्या क्षणी फुलणे ना जमले सुकताना ही खंत नको गंधित होउन बहरुन जावे, पाचोळ्यापरी अंत नको जगणे अवघड झाले तेव्हा दिला सुरांनी जन्म नवा जन्मांतरी हे सूर भिनावे, नुसता कोकिळकंठ नको रंग-रूप, रस-गंध साठवित फुलाफुलावर लहरत जावे फूलपाखरू जीवन व्हावे, कोशातिल सुरवंट नको क्षणाक्षणाला कणाकणातुन उसळावे चैतन्य अनोखे खळाळते आयुष्य असावे, गती कधीही संथ नको अद्भुत काही असे घडावे असणे-नसणे सार्थ ठरावे रडतच आलो, रडवून गेलो इतका साधा अंत नको
Taxonomy upgrade extras

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

बेणारे

लेखक शरदिनी यांनी मंगळवार, 19/05/2009 01:36 या दिवशी प्रकाशित केले.
बेणारे युद्धपिपासू साम्राज्यटोळ्यांच्या शोकसंघर्षातून गर्वल्यालेला बधिराsकांत तोंडी लावायला लब्धप्रतिष्ठित सुरुंगा-तुरुंगांच्या चित्ताकर्षक बाजारगप्पा चिअर्स चिअर्स आणि विद्धनजरेने पहायची पैलतीरावरच्या बेणारेची सुटकाधडपड किंवा वितळून राहायचे ऐलतीरी झारीतल्या शुक्राचार्यासारखे आळोखे पिळोखे देऊन कंटाळा आल्यावरती मात्र टाळ्या पिटून निघून जायचे उगाच तो आकांत मनाला चिकटला तर काय घ्या म्हणत म्हणत की "अशी धडपड अनुभवायची म्हन्जे " हौ एक्सायटिंग नै "? १८ मे २००९, पुणे
Taxonomy upgrade extras

बालसाहित्य

लेखक अनिल सोनुने यांनी मंगळवार, 19/05/2009 01:13 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना नमस्कार, काही दिवसापूर्वी मी मराठी मुलांसाठी तयार केलेल्या संकेतस्थळाला आपण भरभरुन प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रेरणेनेच मी आता नव्या स्वरुपात संकेतस्थळ तयार केले आहे. आपल्याला ते आवडेल, उपयोगी पडेल अशी अपेक्षा आहे. कृपया बालजगत.कॉम ला भेट द्यायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्याकडे मुलांसाठी उपयोगी पडेल असे लेख, गोष्टी, गाणी इ. असतील तर अवश्य पाठवा. आपल्या नावासहित ती प्रसिद्ध केली जातील. तसेच संकेतस्थळ चांगले करण्यासाठी आपल्या सूचना, प्रतिक्रिया अवश्य पाठवा.

`उत्तर'क्रिया!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
निवडणूक निकालाची धामधूम संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून राज ठाकरे त्यांच्या नित्यक्रमाला लागले होते. नाही म्हटलं, तरी प्रचार संपूनही प्रत्यक्ष निकालापर्यंत गडबड कायम होतीच. बेरजा वजाबाक्‍यांची चर्चा सुरू होती, समीकरणं मांडली जात होती. प्रत्यक्ष निकालाच्या दिवशी तर मनसेची दिवाळीच साजरी झाली होती. पहिल्याच निवडणुकीत अनेक उमेदवारांनी लाख-दीड लाख मतांपर्यंत बाजी मारली होती. अधिक जोर लावला असता, तर आणखी काही जागा जिंकलोही असतो, अशी परिस्थिती होती. लोकांच्या अगदी "मनसे' प्रतिसादामुळं सगळेच भारावले होते.

लग्न म्हणजे...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 18/05/2009 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या एका टप्प्यावर कुणाची तरी साथ हवीशी वाटते...(तात्यासारखा "बाई-बाटली'त न गुंतणारा एखादाच!) निर्णय कसा घ्यायचा, हे मात्र ठरलेलं नसतं. "अमक्‍याची तमकी लग्नाची आहे...' कुणीतरी सुचवतं. "तमका तुला अगदी शोभून दिसेल हो!' भोचक शेजारीण काकू मध्येच नाक खुपसतात. प्रत्यक्ष निर्णय आपल्यालाच घ्यायचा असतो.