Skip to main content

आजी !

लेखक अ-मोल यांनी मंगळवार, 26/05/2009 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजी म्हणजे पापणीमधल्या आसवाचा बिंदू असतो डोळयामध्ये साठवलेला मायेचा सिंधू असतो आजी म्हणजे बोबड बोली सापडलेलं नाव असतं अंगाईच्या थापटण्यात दाटलेला भाव असतं आजी म्हणजे देव्हारयातल्या श्रदृधेचं फुल असतं सुरकुत्यांच्या जाळीआडचं हवंहवंसं मूल असतं आजी म्हणजे कौतुकाचा खजिना एक खुला असतो आठवणींच्या फांदीवर हिंदोळणारा झुला असतो आजी म्हणजे प्रौढत्वीही मूल बनायला वाव असतो... ...क्षितिजापार गेल्यावरती ठसठसणारा घाव असतो!
Taxonomy upgrade extras

पालकांनी उत्तीर्ण करण्याची अकरावी प्रवेशपरिक्षा: काही प्रश्न व सुचना

लेखक अमृतांजन यांनी मंगळवार, 26/05/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
अकरावी प्रवेश सुरळीत व कमी कटकटीचा होण्यासाठी अनेक घटक, शासन, महाविद्यालये आपपल्या परीने प्रयत्न करीत असतातच. परंतू मला काही सुचना द्यायच्या आहेत व काही साधे प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्नांच्या उत्तरासाठी जाणकार मिपाकर ह्यांच्या मदतीची अपेक्षा आहे व सुचनांची पडताळणी व्हावी आणि आपणही सुचना ह्या धाग्यात द्याव्यात. जर त्या सुचना यदाकदाचित योग्य व्यक्तिंनी पाहिल्या तर त्याचा फायदा सगळ्यांना होईल अशी माफक अपेक्षा मला आहे. ***[संगणकाव्दारे वर्गीकरण करुन प्रवेश देण्याची बातमी वाचली आहे. ते जर होऊ शकले नाही तर काही सुचना व प्रश्न लागू पडतील]*** प्रश्न: १.

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

थांबुनी येथे जराशी

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 26/05/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी मिसळ पाव वर आमच्या स्वताच्या भाषेत लिहायचा हा छोटासा आणी पहिलाच प्रयत्न आहे बघा जमलाय का ते हे कॉपी पेस्ट नाहि बर नाहि तर उगाच ओरडाल ( सहकार्य मार्गदर्शन परिकथेतील राजकुमार ह्यांचे आहे) आमची प्रेरणा थांबुनी येथे जराशी आसवे गाळून जा हि आहे थांबुनी येथे जराशी दारु पिवुन जा आणि ना प्यायचे तर वळण हे टाळून जा बांधलेल्या ह्या बारच्या टेबलाला हळूसा स्पर्श तू करुनी जा अन्यथा सार्‍या स्मृतीना तु विसरुन जा टेबलाच्या वरती बाटली जागते तव चिंतनी संपवाया टेबलावर सावली ढाळून जा जोवरी होती भरली, तुझ्यावर लुब्ध होउनि राहिली तू पिण्याला उशिर
Taxonomy upgrade extras

सुख

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 26/05/2009 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक पाडली... सखे तव चुंबनाची पहिल्या थरथर अलगद सरते आहे मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे... हळुवार ती मिलनाची धुंदी अंग अंग मोहरते आहे सर सर झर झर उनाड वारा गात्रांत शिरशिरी भरते आहे. क्षण एक सखे अन तृप्तीचा तन मन सुखे पाझरते आहे अंकुर फुलले अंगांगावर..,नी सुखात मन गुदमरते आहे. विशाल.

रात्र

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 26/05/2009 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या काळ्याशार कुंतलांप्रमाणे विखुरलेली ती कृष्णा... ती निशा चित्रकाराने एखादं सुंदर चित्र रेखाटावं आणि मग ... त्याला दृष्ट लागु नये म्हणुन काळा रंग देण्याचा दुष्टावा करावा तशी त्या जगन्नियंत्याने ..निसर्गाने... स्वसौंदर्याचा बचाव करण्यासाठीच जणु निर्मीलेली ....

मधुबाला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 26/05/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
एकता कपुर "मधुबाला" च्या जीवनावर एक चित्रपट काढत आहे. कळस म्हणजे या चित्रपटात "मधुबाला"ची भुमिका कंगना राणावत करणार आहे. या चित्रपटात मधुबालावर एकतर्फी प्रेम करणार्‍या हाजी मस्तानचेही पात्र आहे म्हणे, ती भुमिका अजय देवगण करण्याची शक्यता आहे. पण मधुबालाच्या भुमिकेत कंगना..... ? हे काँबिनेशन पटत नाही, नपेक्षा पचत नाहीये. आपलं मत काय......? http://www.thaindian.com/newsportal/entertainment/playing-madhubala-big… विशाल.

((चंपी))

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 26/05/2009 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
चंपी श्वान कुत्तरा निखळ जात ही भुंके सदानकदा भुकेचे उसासे केकाटून गेले हाडूक जिव्हारी लागून मेले रस्त्यातूनी जाताजाता काय मनाला हरखून गेले लडबडत्या पुच्छा मागे मित्र करिती भाद्रपद चाळे.. भुंकून भुंकून दातपिसून गुरगुराटी स्वरनक्षी केली हिंस्त्र ठसे चाव्यांचे युद्धाचे क्षण वागवती झाली कुत्री म्हणॉनी हिणवी कोणी दगड मारी पेकाटी जीणे जगणे लाजीरवाणे ; संसार मांडते रस्तोरस्ती निळ्याजांभळ्या जिभा काढते हातभर पाहून पाव बिस्कुटी रस्त्यातच फिरेन रस्त्यातच मिटेन एका चाकाखाली क्षणी एका होत्याची नव्हती होईन ; शांत आकांत होईल हडुत हुडूत मधुनी सुटेन मी धाकटी चंपी
Taxonomy upgrade extras

मनासारखे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 26/05/2009 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
हसू खुलू दे मनासारखे जरा घडू दे मनासारखे तुझी दिठी केसांत माळुनी मला सजू दे मनासारखे मुठीत बांधू नको कळीला तिला फुलू दे मनासारखे खुळे तुझ्या स्वप्नात जागते, मना करू दे मनासारखे दंवात न्हाते पहाट ओली, धुके झरू दे मनासारखे सुरांसवे माझ्या काव्याचे दुवे जुळू दे मनासारखे पसायदानी मागे ज्ञाना, जनां मिळू दे मनासारखे
Taxonomy upgrade extras