तुझ्या काळ्याशार कुंतलांप्रमाणे
विखुरलेली ती कृष्णा... ती निशा
चित्रकाराने एखादं सुंदर चित्र रेखाटावं
आणि मग ...
त्याला दृष्ट लागु नये म्हणुन
काळा रंग देण्याचा दुष्टावा करावा
तशी त्या जगन्नियंत्याने ..निसर्गाने...
स्वसौंदर्याचा बचाव करण्यासाठीच
जणु निर्मीलेली .... यामिनी !!
सागराच्या पाण्यावर उमटलेली
प्रतिबिंबातुन डोकावणारी
रात्र कधी पाहीलीस प्रिये?
फेनफुलांचं फेसाळणंही
क्षणात झाकोळुन टाकणारी
एकाच क्षणात आसमंती
विविध कृष्णछटा साकारणारी
काळ्या रंगालाही ...
अनामिक, अलौकीक सौंदर्य देणारी...
थकल्या भागल्या जिवाला
लहान मोठा, गरीब श्रीमंत
चांगला-वाईट, सज्जन्-दुर्जन..
अगदी कसलाही पक्षपात न करता
आपल्या कुशीत घेणारी रात्र
परमेश्वरालातरी जमलाय का ?
असा निरपेक्षपणा !
विशाल
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1383
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!
खासच आहे
In reply to मस्त! by क्रान्ति
धन्यवाद,