आणखी एक पाडली...
सखे तव चुंबनाची पहिल्या
थरथर अलगद सरते आहे
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
हळुवार ती मिलनाची धुंदी
अंग अंग मोहरते आहे
सर सर झर झर उनाड वारा
गात्रांत शिरशिरी भरते आहे.
क्षण एक सखे अन तृप्तीचा
तन मन सुखे पाझरते आहे
अंकुर फुलले अंगांगावर..,नी
सुखात मन गुदमरते आहे.
विशाल.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1106
प्रतिक्रिया
1
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त