कृष्णार्पण
नामस्मरण, चिंतन, सुख वैकुंठीचे जाण
चित्ती नांदे समाधान, सा-या चिंता कृष्णार्पण
भावभक्ती वाळवंट, मंदिर हे अंतरंग
वृत्ति वाहे चंद्रभागा, तिथे वसे पांडुरंग
जड देहाचे हे भोग केले त्यालाच अर्पण
तूच अनंत ब्रम्हांड, तूच धरा, तू आकाश
दूर सारी जो तमाला, अंतरीचा तू प्रकाश
तूच दाता, तूच त्राता, तूच कार्य, तू कारण
काया, वाचा, मन देवा तुझ्या चरणी लागावे
आधि- व्याधी, व्याप- ताप, माया मोह दूर व्हावे
तुझे दर्शन घडावे, तनू त्यागताना प्राण
Taxonomy upgrade extras
पुस्तक परिचय (तेलाविषयक)
नुकतीच जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर ह्यांची दोन पुस्तकं वाचली. दोन्ही पुस्तकं खूप आवडल्यामुळे त्यांचा अल्पसा परिचय देण्याचा प्रयत्न करत आहे.
१. हा तेल नावाचा इतिहास आहे: काळं सोनं असं ज्याला संबोधलं जातं त्या तेलाचा मनोरंजक इतिहास ह्या पुस्तकात मांडला आहे. अमेरीकेत पहिली तेलविहीर खणल्यानंतर अल्पावधीतच तेलाची मागणी प्रचंड वाढली. अमेरीकेतील उद्योगपती जॉन डी. रॉकफेलर (थोरले) ह्यांनी सुरु केलेली स्टँडर्ड ऑईल कंपनी, तेलातून मिळालेल्या प्रचंड नफ्यामुळे बलाढय बनली आणि तिची मक्तेदारी निर्माण झाली.
महाभयंकर सत्य
सगळ्या जगाचा प्राण आहे असे वाटणारे ईंधन आता लवकरच संपणार. लवकरच म्हणजे किती ? अहो आपण किंवा आपली मुलं किंवा अगदी फार फार तर आपली नातवंडं जग बघू शकतील. हे काही तथाकथीत भविष्य नव्हे तर ते एक सप्रमाण सिद्ध केले जाणारे भाकीत आहे. ते लोकप्रभात मांडलय मिलिंद जोशींनी. सगळ्यांना माहीत व्हावे हा या दोन ओळींच्या माहितीचा हेतू.
एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १७
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.
बिपिन कार्यकर्त्यांना संपादक पदावर बढती..!
राम राम मायबाप मिपाकरहो,
मिपाच्या संपादक मंडळात काही बदल करण्यात आलेले आहेत. प्रियाली आणि मृदुला यांना हल्ली कामाच्या व्यग्रतेमुळे संपादक पदाला पुरेसा न्याय देता येत नाही. प्रियाली यांनी यापूर्वीच तसे सांगितले होते.
असो..
आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मिपाचे एक सन्माननीय सदस्य, हितचिंतक आणि आमचे मित्र बिपिन कार्यकर्ते यांना मिपाचे संपादक पद बहाल करण्यात आलेले आहे. मिपाचे हसतेखेळते, थट्टामस्करीचे, टोप्या-टपल्यांचे वातावरण तसेच कायम ठेऊन ते ही संपादक पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतील असा आमचा विश्वास आहे.
आज दिनांक १ जुलै रोजीचे संपादक मंडळ खालीलप्रमाणे.
आणि बांध फुटला
ज्या घरात पालक आणि मुले ह्यांच्यात अभ्यासावरुन भांडणे असतात त्यांना मी एक प्रश्न न चुकता विचारतो.
" काहो, मुलाला जवळ बसवुन पाठीवरुन किंवा डोक्यावरुन हात फिरवल्याला किती दिवस झाले"?
बहुतेकांच्या चेहेर्यावर 'कुठल्या येड्चापाच्या नादाला लागलो 'असे भाव असतात.
___________________________________________________________
चिरंजीव माझी कुठलीही मदत न घेता आपणच मिळवलेल्या नोकरीवर जाण्याचा पहीला दिवस. बुट घातले आणि दरवाजा उघडणार इतक्यात मी त्याला हाक मारली, "बेबी"( मला मुलगी नाही, आणि आहे ती खुप लांब असते). तो वळला, आणि माझ्या ओठाचा चंबू बघुन परत फिरला. हसत हसत गालाचा एक छान पापा दिला.
मिसळपाव
