Skip to main content

माणसाच्या ज्ञानाला मर्यादा.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 19/07/2009 07:49 या दिवशी प्रकाशित केले.
"माणसाच्या ज्ञानाला मर्यादा आहेत.त्यामुळे सगळ्याच गोष्टीचं ज्ञान असणं कठीण आहे आणि तुम्ही म्हणता तसं मग ते बौद्धिक असो,व्यावहारीक असो वा अध्यात्मिक असो." आज बाहेर फारच उष्मा होत असल्याने मी प्रो.देसायांना म्हणालो, "भाऊसाहेब आज तळ्यावर जाण्याचं रद्द करून आपण इथे आमच्याच घरी चर्चा करूंया" "तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात.अहो, मी तुमच्या घरी येईपर्य़ंत मला इतकं गरम झालं की सहन होई ना!.तरूणपणात भर उन्हात आमच्या गांवाला एका डोंगरावरून दुसर्‍या डोंगरावर चढून जाण्याची आमच्यात शर्यत लागायची.दोन तीन बाटल्या पाणी ढोसल्यावर जीव शांत व्ह्यायचा.पण एव्ह्डी कोलाहल होत नसायची." मी म्हणालो, "भाऊसाहेब आता "ag

झूम

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 19/07/2009 06:43 या दिवशी प्रकाशित केले.
तारे लुकलुक लुकलुक झूम. काळोख गुपचुप गुपचुप झूम. तपकीरी सोनेरी पाणी झूम. खिशात चंदेरी नाणी झूम. सेलीब्रेशन करायला झूम. उदासी टाळायला झूम. नवीन गावी जायचे झूम. आपल्या घरी परतायचे झूम. कविता सुचत नाहीये झूम. विडंबनच करुया झूम. आता नुसतेच झूमणार की कविता लिहीणार? ही बघ झाली की झूम. झूम. झूम.

अटॅचमेंट!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 19/07/2009 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीच्या आयुष्यातील पहिली शाळा संपून एक वर्ष झालं. गेल्या वर्षी मार्चमध्ये तिची शिशु गटाची शाळा संपली. पहिल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता ती कधी रडली नाही. नव्या शाळेत गेल्या वर्षी बालवाडीसाठी प्रवेश घेतला, तिथेही रमली. आता नव्या शाळेहून येताना बऱ्याचदा आम्ही तिच्या पहिल्या म्हणजे शिशु गटाच्या "पाखर' शाळेवरूनच बरेचदा जातो. अनेकदा त्यामागचा उद्देश असतो - तिच्या शाळेच्या आठवणी कायम ठेवणं! हा आजार "अटॅचमेंट'चा! भावनिक जवळिकीचा. अशा भौतिक वस्तूंशी माझी कदाचित प्रत्यक्ष नात्यांपेक्षाही जास्त अटॅचमेंट आहे. आणि मुलीचीही तशी असावी, अशी (अनाठायी) अपेक्षा आहे.

बनाना-नट ब्रेड ( केळ्याचा केक )

लेखक लवंगी यांनी शनिवार, 18/07/2009 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
केळी जास्त पिकलेली असली कि खाविशी वाटत नाहित. अश्यावेळी उरलेल्या केळ्यांचा हा झटपट होणारा बनाना नट ब्रेड अतिशय चविष्ट होतो. साहित्य : ४ पिकलेली केळी, १/२ कप वितळवलेल बटर, १ १/२ कप मैदा , २ फेटलेली अंडी, ३/४ कप बारीक वाटलेली साखर, १ टिस्पुन बेकिंग सोडा, १ टिस्पुन वनिला, १ चिमुट मीठ १/४ कप बरीक कापलेले अक्रोड, मुठभर मनुका केळी कुस्करुन घ्यावीत. एका भांड्यात केळी आणि बटर मिसळावे. त्यात फेटलेली अंडी, वनिला घालुन एकत्र करावे.

पाहिजे एकांत थोडा--

लेखक पुष्कराज यांनी शनिवार, 18/07/2009 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
पाहिजे एकांत थोडा पाहिजे थोडा अबोला पाहिजे पहाट थोडी पाहिजे निशब्द वारा होउनी मग एक तेव्हा अंतरी मिसळून जाउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ मिटूनी तू डोळे तुझे ग काहीशी हरवून जासी स्पर्शता लाभे दिलासा तू मला बिलगून जासी छेडूनी तारा मनाच्या शब्द तू मी सुर होउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ त्रुप्ताता ह्रद्यात दोन्ही त्रुप्ताता देहात ही त्रुप्ताता विश्वास सार्‍या त्रुप्ताता श्वासास ही संपता पहाट थोडी काहीशी हुरहुर व्हावी धुसरत्या तारकांना भेटीचे संकेत देउ विसरूनी सार्‍या जगाला चांदणे उधळून देउ -पुष्कराज
काव्यरस

चोर कुणाला म्हणावे

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 18/07/2009 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल रात्री ऑफिस संपवुन घरी जायला निघालो. एक मित्र सोबत होता नेहमी प्रमाणे जेव्हा दोन एकाच टिम चे लोक सोबत भेटतात तेव्हा जश्या गप्पा चलु असतात त्याच चालु होत्या. थोडासा पाउस पडत होता. ऑफिस मधुन बाहेर पडताना मी मित्राला म्हणालो "कंटाळा आला यार उद्या शनिवार असुन पण ऑफिल यायचे". मित्राने त्या नंतर मस्त पैकि एक पाच दहा मिनिटे सगळ्यांना शिव्या घातल्या. ऑफिसच्या गेटच्या बाहेरच पोलिसांची नाकाबंदी होती. मी म्हणालो " हे लोक रोज नाकाबंदी करतात, कश्यासाठी दोन चार दुचाकीस्वारांना अडवुन त्यांचा कडुन पैसे काढण्यासाठी???

सकाळ वृत्तपत्राचे अनेक आभार..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 18/07/2009 07:59 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मायबाप मिपाकरहो, आजच्या सकाळ वृत्तपत्रातील कवडसा या सदरात मेधा कुलकर्णी यांचा आपल्या मिपाबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख आला आहे. सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने मिपाची आवर्जून दखल घेतली, त्याकरता पत्रकार मेधा कुलकर्णींचे आणि सकाळ वृत्तपत्राचे मी व्यक्तिश: तसेच समस्त मिपा परिवारातर्फे आभार मानतो.. तात्या.

दोन वाटा

लेखक प्रशांत उदय मनोहर यांनी शनिवार, 18/07/2009 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
वळणदार ही रम्य वाट, घनदाट तरू चहुकडे; दुभंगे जाता इथुनी पुढे वाट एक त्यांतली ही, हिच्या दोबाजूंना लांब; पसरले पहा दिव्याचे खांब दुसर्‍या वाटेवरी न पथिक न गाड्याही धावल्या; परि तिथे काटे आणिक कळ्या दोन्ही वाटा अखेर मिळती एका रस्त्याला; जाई जो माझ्या गावाला दुवा दिव्यांचा, ह्या वाटेवर पांथिक बहु चालले; धरावी ही हे मी ठरविले प्रवास इथला सुलभ, फक्त चालणे अखंडितपणे; आणि निजधामाला पोचणे धरली त्याने वाट, जी न वहिवाट, चालला पुढे; फुलांचे जेथे पडले सडे पाचोळा अन् काटेही पण वाटेवर त्याच्या; आणि ना दिशा ओळखीच्या गावी मी पोचलो, जणू मिळवले सर्व सर्व; मला जाहला असा गर्व स्वतःभोवती फिरत राहिलो, विसरलो जगाल

हे पुस्तक कोणाकडे मिळेल का??

लेखक नानबा यांनी शुक्रवार, 17/07/2009 23:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. फार फार वर्षांपूर्वी जी. ए. कुलकर्णींनी लिहीलेलं "बखर बिम्मची" हे पुस्तक माझ्याकडे होतं. एकदा कुणीतरी सहज म्हणून वाचायला नेलं ते परत आणून दिलंच नाही. अतिशय अप्रतिम आणि मनःस्पर्शी पुस्तक आहे. आणि दुर्दैवाने सध्या कोणत्याही विक्रेत्याकडे ते उपलब्ध नाही. कोणाकडे ते आहे का? मी छायांकित करून घ्यायला तयार आहे. अथवा मला pratham.phadnis@gmail.com वर आपली माहिती पुरवल्यास मी संपर्क करेन.