पाडगावकरांचे हे शब्द कदाचित भारतीय फुलांसाठी लागू होत असतील परंतु, लिलीसारख्या मूळच्या परदेशी फुलाला हा संयम मान्य नसावा! पावसाळा सुरू झाला की एरवी आठ महिने गुपचूप बसलेली लिली बहरू लागते. गुलाब, मोगरा आदी फुले प्रथम बरेच दिवस कळ्यांच्या स्वरूपात असतात आणि हळूहळू त्यांचे फुलात रुपांतर होते. पण ह्या लिलीचे सगळेच निराळे. संध्याकाळ झाली की, त्या कळ्या अगदी धुसमुसळेपणाने उमलतात.
त्याचीच एक झलक.........