Skip to main content

कौल घेण पण इथ पाप आहे का?

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 22/08/2009 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका पुस्तकाच्या परिचया संदर्भात कौल घ्याय्चे योजले होते. तो उड्वण्यात आला. कौल घेण पण इथ पाप आहे का?

पोलाद कारखान्यांतील शिसं: दीर्घकालीन दुष्परिणामांपासून मुलांना वाचवा!

लेखक बहुगुणी यांनी शनिवार, 22/08/2009 11:02 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी कामावर जातांना रेडिओवर, चीनच्या हुनान प्रांतातल्या एका शहरातल्या १३०० हून आधिक बालकांवर, नजीकच्या स्टीलच्या कारखान्यांमधून होणार्‍या शिस्याच्या उत्सर्जनामुळे झालेल्या दुष्परिणामांची (lead poisoning) ही बातमी ऐकली. याआधी चीनमधल्या क्षँग्सी प्रांतात अश्याच घटनेत गेल्याच महिन्यात ८५१ मुलांना lead poisoning झाल्याचं ऐकलं होतं.

(ऐन दुपारी!)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 21/08/2009 22:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऐन दुपारी वाचायच्या 'टनाटन दुपार' ह्या पेश्शल पाक्षिकाचा धागा मास्तरांनी आज भादव्याच्या पहिल्याच दिवशी काढला आणी ऐन दुपारी आमच्या डोक्यात एक कल्पना चमकून गेली! ;) ऐन दुपारी, प्रभू विचारी, 'टनटन' पहा काढली अहो त्याची विनायकी मोडली! हिम टाकून ती रम भरताना कुठून अचानक आली कल्पना गुपचूप येऊन जालामागुन, 'परा' 'बिका' ओढली दिसता लेखक त्याला अडवा हात 'अवलिया' त्याचा उजवा 'रंग्या' नडला, इरेस पडला, चूड पहा लावली -चतुरंग
काव्यरस

सप्लिमेन्ट

लेखक दवबिन्दु यांनी शुक्रवार, 21/08/2009 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
(आज काय्तरी लिहावस वाटतय म्हणुन लिहतोय. फार्स काय छान भारी अस काय नाय). परवाच्याला एक जोक एकला. कि आपन सग्ळे लोक देवाच्या समोर आप्ली पाप लिहायला बसलो होतो. मी लिहायाला सुरवात करतच होतो त तू जोरात कोपर्‍यातन ऑरड्लास "सप्लिमेंट प्लिज". आधी त काय जोक कळलाच नाय पण कळ्ला तेवा हसाय्ला आल. :D मग आठवल, आपण लोक परीक्शेच्या टायमाला कस टोच्यान (कंपासन) सप्लिमेंटाला भोक पाडाय्चो आणि मग कसा दोरा लावायचो. थोडेसे दोरे घरी पन आनायचो. उगाचच काय त्याचा उपयोग नसाय्चा तरी पन. आता स्टुडन्ट लोक स्टेप्लर वापरतात पन दोर्‍याची मजा वेगलिच होती. हि सप्लिमेंट त म्हन्जे कॉपी करायच पर्मिट होत.

शुक्रवारची कहाणी .....

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 21/08/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार....... अर्थातच आपल्या सगळ्यांचा आवडता वार्.....विकांताची सुरवात करणारा असा हा दिवस.... तर अशा या शुक्रवारची कहाणी काय आहे महितिय??? .......वाचा खाली.... एक आटपाट नगर होतं.......(हो हो...एकदम डान्रावांच्या सजावटी सरखं..........) तिथं खूप कंपन्या होत्या बहुतेक सगळ्या आय टी वाल्या....त्यात सगळे नगरवासी काम करायचे.... अशाच एका कंपनीत एक 'क्ष' कामाला होता...हा क्ष एकदम हरहुन्नरी . कायम कमात मग्न असायचा....दर २ महिन्यांनी एक तरी बक्षीस पक्कं असायचं..

कलमी झाड

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 21/08/2009 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
माहीत नाही खरी माती एकसारखी नसलेली छाती खरे रुपडच माहीत नाय कलमी झाडाच काय खरं नाय हापुस पण नाय पायरी पण नाय नवीन आंब्याची जातच माहीत नाय धड शाहण पण नाय अन येडं पण नाय कलमी झाडाच काय खरं नाय काय द्यायच अन काय घ्यायच माहीत नाय मी कुठला अन मी कसला माहीत नाय दिसतय भारी पण आतुन खोकडं कलम केलेल झाडच वाकडं गावात पण टिकना अन इलायत पण जमना अर्धे गावरान अन अर्धे इलायती रुपडं कलम केलेल झाडच वाकडं तिकडच्या मातीचा पण झालो नाय अन ह्या मातीत पण उरलो नाय नाव जरी झालं सगळीकडे प्रेम कुठलच मिळालं नाय

अतुलचा भयगंड

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 21/08/2009 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या बिल्डिंगच्या तळमजल्यावर पूर्वी खाडिलकर राहायचे.नंतर ती जागा विकून ते गोरेगांवला राहायला गेले.खाडिलकरांचा एकुलता एक मुलगा अतुल तेव्हा खूपच लहान होता.त्याचे आईवडिल त्याला खूपच जपायचे.मी खाडिलकरांच्या जेव्हा घरी जायचो तेव्हा नेहमीच ते अतुलच्या घाबरून रहाण्याच्या संवयीबद्दल काळजी करीत असत. "ह्याचं पुढे कसं होणार?" ही त्यांची नेहमीचीच काळजी. मला आठवतं मी त्यांना नेहमी म्हणायचो, "जसा तो मोठा होईल तसा सुधारेल" अतुलच्या वडीलांना हे ऐकून बरं वाटायचं.मला म्हणायचे, "तुमचं म्हणणं बरोबर आहे.मी उगीचच काळजी करीत असतो.सर्व अंगावर पडल्यावर त्याला जबाबदारीने वागावं लागेल." इतर मुलांच्याबरोबरी

... आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना?

लेखक सुनील यांनी शुक्रवार, 21/08/2009 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
पाडगावकरांचे हे शब्द कदाचित भारतीय फुलांसाठी लागू होत असतील परंतु, लिलीसारख्या मूळच्या परदेशी फुलाला हा संयम मान्य नसावा! पावसाळा सुरू झाला की एरवी आठ महिने गुपचूप बसलेली लिली बहरू लागते. गुलाब, मोगरा आदी फुले प्रथम बरेच दिवस कळ्यांच्या स्वरूपात असतात आणि हळूहळू त्यांचे फुलात रुपांतर होते. पण ह्या लिलीचे सगळेच निराळे. संध्याकाळ झाली की, त्या कळ्या अगदी धुसमुसळेपणाने उमलतात. त्याचीच एक झलक.........