Skip to main content

माझा ही स्वयं(पाक)प्रयोग

लेखक गणपा यांनी मंगळवार, 15/09/2009 22:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या परत बॅचलर लाईफ चालु आहे. त्यामुळे स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न स्वतःलाच सोडवावा लागतोय. ईतके दिवस खिचडी नी मॅगी वर भागवत होतो, पण ह्या मिपाच्या सुगरणी नी सुगरणे जिवावर उठल्या सारखे एका मागोमाग एक खरनाक रेशीप्या नी फोटु टाकुन आमचा (आदरार्थी एकवचन) जीव खाउन राहीली. म्हटल गण्या त्या तै लोक काय आपल्याला खाऊ खालनार नाहीत, आपणच आपल्या जिभेचे चोचले पुरवावे. ऑफिस सुटल्यावर तडक गेलो खाटका कडे. फर्मास १/२ किलो कोवळ बोकडाच मटण घेतलं. बाकीचे जिन्नस सुदैवाने घरी होतेच. (हा गैरसमज घरी गेल्यावर लगेच दुर झाला.) घेतल भीमाच नाव नि शिरलो स्वयंपाकगृहात. एका डिश ने काय होणार???

निरुपम यांची मागणी : ऊत्तर भारतीयांना मुंबई-ठाण्यात आरक्षण

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 15/09/2009 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्याच वेळापूर्वी कानावर आलं की, कॉंग्रेस चे खासदार श्री. संजय निरुपम यांनी त्यांच्या पक्षाकडे मुंबई-ठाण्यात विधानसभेच्या ६० पैकी ३५ जागांची मागणी केलीय. त्यांचे म्हणणे आहे की, त्या विभागांमधे ऊत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत जे स्थलांतरीत होऊन मुंबई-ठाण्यात आले आहेत. त्यानी मात्र शेवटचा निर्णय पक्षावर सोडला आहे. मिपाकरांचं ह्या विषयावर मत काय आहे???

'मागच्या बाका'वरची दुर्लक्षित पोरं !

लेखक दिनेश५७ यांनी मंगळवार, 15/09/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
वर्गात मागच्या बाकावर बसणाऱ्या मुलांकडे शिक्षकांचेही दुर्लक्ष होते, तशी आज काही सरकारी खात्यांची स्थिती आहे. हजारो कोटी रुपये खर्चून पायाभूत विकासाला वेग देणाऱ्या आणि मुंबईसह अवघ्या महाराष्ट्राच्या नागरीकरणाची स्वप्ने पाहणाऱ्या राज्य शासनाने सामान्य माणसाची जबाबदारी असलेली अनेक खाती ‘मागच्या बाका’वर बसविल्याने एकीकडे करोडोंची खैरात; तर दुसरीकडे निधीची प्रतीक्षा असे विसंगत चित्र आहे.

हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती?

लेखक संकेतजी कळके यांनी मंगळवार, 15/09/2009 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
काही दशकांपुर्वी चित्र तपस्वी भालजी पेंढारकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरासाठी एक चढाओढ जाहीर केली होती (संदर्भ पुस्तक तिळ आणि तांदुळ प्रुश्ठ संख्या १८७ लेखक --- ग. दि. मा) तोच प्रश्ण मिपाकरांसठी पुन्हा.. हिन्दू माणसाला राग येइल अशी गोश्ट कोणती??

अलिप्त

लेखक अजिंक्य यांनी मंगळवार, 15/09/2009 20:08 या दिवशी प्रकाशित केले.
न देणे, न घेणे, फुकाचे न खाणे, कुणाच्या न वाटेत येणे मुळीही, बरे काम माझे, बरी वाट माझी, स्वत:च्याच विश्वात मश्गूल आम्ही ||१|| असे वाटले की लिहावे जरासे, लिहावे जरा, पाठवावे कुठेसे, तया सोडुनी या जगाच्या भरोसे, विचारात होऊ पुन्हा दंग आम्ही ||२|| कधी आवडावीत काव्ये कुणाची, दिसावी कधी झेप कोणा मनाची, जरी दाद देऊ तया ताकदीची, मनाच्या महाली असू गुंग आम्ही ||३|| न लाटात आम्ही, न वाळूत आम्ही, सदा एकटे सागराच्या किनारी, जसा सूर्य चाले सकाळी दुपारी, तसे राहतो या अलिप्तात आम्ही ||४||

पुतळे उभारावेत का ?

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 15/09/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडाच्या पायथ्याशी असणा-या पाचाड येथील राजमाता जिजाऊं समाधीस्थळातील जिजाऊंचा पुतळा चोरीला गेला आहे.यामुळे पुतळे उभारावेत का ?हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.सरकारने पुतळे उभारण्यांवर पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी निश्चित केली आहे.याचे पालन होते का ? पुतळे उभारावेत का ? आपल्याला काय वाटतं ?

हुशार कावळा (नवीन)

लेखक सुनिल पाटकर यांनी मंगळवार, 15/09/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
आता कावळा हुशार झालाय .पाणी पिण्यासाठी तो मडक्यात दगड टाकण्यात आपला वेळ वाया घालवत नाही .तो असे पर्याय शोधतो.गोव्यातिल करमाळी रेल्वे स्थानकावरील हा फोटो.

१९ सप्टेंबरची अमावस्या कुणाला कशी?

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 15/09/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
१९ सप्टेम्बर २००९ रोजी सायन कन्या राशीत अमावस्या २६ अंश २ मि. वर होत आहे. ही अमावस्या गोचर शनीच्या युतीत होत असल्यामुळे, तसेच गोचर प्लुटॊशी केंद्र योग करत असल्याने फलिताच्या दृष्टीने अतिशय महत्वाची ठरणार आहे.

मिशीचा पिळ

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी मंगळवार, 15/09/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हटले हा माणुस कधीच रडला नाही नाहीच रडणार न झेपणारा राग कधीच गायला नाही आयुष्य सजवले मी प्रेमाच्या फुलांनी आयुष्यात प्रेमाचा मोगरा कधी फुलला नाही जोडले मित्र जसे माळेमधे मणी अजुनतरी एकही मणी निसटला नाही कविता सजवल्या तिच्यासाठी प्रेमाच्या शब्दांनी एकाही कवितेचा अर्थ तिला समजला नाही आयुष्यभर गायली पावसाचीच गाणी ह्रदयात दुष्काळ माझ्या कधीच टिकला नाही कितीक घाव , कितीक दु:खे सोसली माझ्यासाठी माझाच एकही शब्द रडला नाही दैवानेही केले कित्येक वार अन घाव असा कुठलाच घाव नव्हता जो सोसला नाही हार-जीतची चिंताच नव्हती मनाला खेळ असा मांडलाच नाही जो रंगला नाही प्रश्न्च नव्हता कुणाचे पाय धराण्

मात्र रात्रीची गोष्ट भाग ५

लेखक दशानन यांनी मंगळवार, 15/09/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
मात्र रात्रीची गोष्ट भाग ४ *** स्थळ - वेळ - पात्र - नेहेमीचेच. (चौथा पेग होवुन गेला आहे, वाह्यात चर्चा सुरू आहे अशी अर्धवटावस्था.... अशातच पेग ५ आणि मधूनच एका ठाणेकराचे आगमन) मी - परवा भेटायचा विचार आहे... तो- अरे वा ! फटाके फुटणार असतीलच मग ... मी - विचार करतोय फोडावेत की नाही... साला.. नंतर लफडा नको (तेवढ्यात एक जण मधुनच येवुन बसतो... स्वतःची ओळख एक ठाणेकर म्हणुन करुन देतो... बील तोच देणार असे म्हणाल्यावर बसु दिले ) ठा - माफ करा. तुम्ही फटाके जरुर फोडा पण त्याची पद्धत असते...