Skip to main content

हे असे का?

लेखक अमृतांजन यांनी बुधवार, 16/09/2009 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी एका रेडीओ स्टेशनवर एक नाटीका चालू होती ती ऐकत होतो. सर्व पात्रे स्त्रीया होत्या व मुख्य पात्राला (समाज सेविकेच्या भूमिकेत) एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेली सापडते. ती त्या खेड्यातल्या स्त्रीयांशी बोलत असते. मुख्य पात्र: (अशा आशयाचे विधान होते)- "मला एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेल्या अवस्थेत सापडली आहे. पहा किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे, तिला पदरात घ्यायला आहे का तुमच्यापैकी तयार?" त्यातील "किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे" ह्या संदर्भाने मी संतापलो.

वस्तरा टी

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 16/09/2009 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
"बाबा, नविन गाडी आली आहे बाजारात. लय भारी आहे. घेउ का" नउ महिने झाले आधीचा रणगाडा घेउन. आता परत. " ती छोटु ला देउ. आमचे अंडरस्टँडींग आहे. मी वापरायची नंतर त्याला द्यायची" काय सांगतोस? तो पण तुझ्या लायनीला आला का? हे केंव्हापासुन? "तुम्ही 'शोषीत महिला उद्धार 'संघाचे अध्यक्ष झालात तेंव्हापासुन" अरे पण आता वस्तरा टी मोहीम सुरु आहे ना? " अहो बाबा, वस्तरा टी नाही ऑस्टॅरीटी मोहीम. तुमची सदावर्ते बाईंची शिकवणी फुकटच गेली. इंग्लिश चे वांदे तसेच आहेत". हो रे बाबा. काल मिटींग मधे साहेब इंग्लिश मधेच बोलला. त्यामुळे सगळे डोक्यावरुन गेले.

कालची खादाडी सुरळीच्या वड्या (उर्फ खांडवी)

लेखक गणपा यांनी बुधवार, 16/09/2009 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काल सक्काळी सक्काळी मिपा उघडल नी समोर सुरळीच्या वड्या पाहुन चचलो.(हा तात्यापण रोज लोकांना चचवण्याचे नवनवीन उपाय शोधत असतो. विमा एजंट आहे की काय कोण जाणे.) (अजुन दिसतेयती बेटी पहील्या पानवर पण हॅ..हॅ..हॅ..हॅ.. आज मेरेपास भी वडी है.) तर सांगतो काय की ही सुरळीची वडी माझी अतिप्रिय. तात्याच्याच शब्दात सांगायच तर या वडी वर आमचा लै जीव. काय कराव सुचेना, इकडे मोजुन २-३ भारतीय हाटेलं आहेत. तिथ काही हे असले नेमके मला आवडणारे पदार्थ मिळत नाहीत. बर स्वतः कराव तर, हा प्रयोग मी मागे १० वर्षांपुर्वी अतीसुक्ष्मलहरीभट्टीत केलाहोता. सुदैवाने तेव्हा घरात कुणी नव्हत.

उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे

लेखक नंदू यांनी बुधवार, 16/09/2009 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर हा विषय अतिशय घिसपिटा असू शकतो याची पुर्ण कल्पना आहे तरिही FYI. उत्तम मिसळ मिळणारी ६० ठिकाणे १ ) अण्णा बेडेकर , पुणे २ ) मनशक्ती के॑द्र , लोणावळा ३ ) मामलेदार , ठाणे ४ ) मूनमून मिसळ , डो॑बिवली ५ ) संजिवनी - माडिवालेकॉलनी , टिळक रोड ६ ) रामनाथ - साहित्य परिषदे जवळ , टिळक रोड ७ ) श्री - शनिपारा जवळ ८ ) नेवाळे - चिंचवड ९ ) ज?श्री - बजाज ऑटो समोर अकुर्डी . १० ) दत्त स्नॅकस , पळस्पे फाटा . ११ ) कुंजविहारी , ठाणे स्टेशन १२ ) जुन्नर बस स्थानक . १३ ) फडतरे , कलानगरी .

ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे निधन

लेखक खडूस यांनी बुधवार, 16/09/2009 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ हार्मोनिअम वादक अप्पा जळगावकर यांचे आज सकाळी ६ वाजता वृद्धापकाळाने निधन झाल्याची बातमी आत्ताच वाचली. या थोर कलाकारास आमची विनम्र श्रध्दांजली .

तुम्हाला कुणाशी गप्पागोष्टी करायला आवडतील?

लेखक विकास यांनी बुधवार, 16/09/2009 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
दोन चार दिवसांपुर्वी, आर्लिंग्टन व्हर्जिनियाच्या एका शाळेतील मुलाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामांना एक प्रश्न विचारला की, तुम्हाला जिवंत अथवा ऐतिहासिक पैकी कशातही बसणार्‍या कुठल्या एकाच व्यक्तीबरोबर जेवायला आवडेल? ओबामांचे उत्तर होते महात्मा गांधी! :
"Dinner with anyone dead or alive? Well, you know, dead or alive, that's a pretty big list," Obama responded amidst laughter. The next moment he was serious. "You know, I think that it might be Gandhi, who is a real hero of mine," Obama said.

बिटाच्या वड्या

लेखक रेवती यांनी बुधवार, 16/09/2009 07:12 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: लालबुंद बीटरूट्स, होल मिल्क, साखर, वेलदोड्यांची पूड. कृती: बीटरूट्सची साले काढून ती किसणीवर बारीक किसून घ्यावीत. जड बुडाच्या कढईत कीस वाटीने मोजून घ्यावा. जेवढा कीस त्याच्या अर्धे माप साखर व किसाच्या मापाएवढेच दूध घ्यावे. एकत्र करून मध्यम आचेवर शिजण्यास ठेवावे. मधून मधून उलथण्याने हलवत रहावे. तळाला लागता कामा नये. मिश्रण शिजून कढईचा तळ स्वच्छ दिसू लागेल, दूध आटून स्निग्धांश बाहेर आल्याने ते चकचकीतही दिसू लागेल. त्यात वेलदोडापूड घालावी. पाव चमचा मिश्रण ताटलीत काढून घ्यावे.

सुहासिनीम् सुमुधुर भाषिणीम्

लेखक अभिजा यांनी मंगळवार, 15/09/2009 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
एका १५ ऑगस्टला असाच कुलाब्याला सकाळी फिरत होतो. नेहमीचे माणसांनी ओसंडून वाहणारे पदपथ निवांत होते. कहर ढगाळ वातावरणामुळे फडकणा-या तिरंग्याचे फोटो काही मिळत नव्हते. मी हिरमुसलो! तेवढ्यात काही मुली हातात झेंड्यांचा जुडगा घेऊन फिरताना दिसल्या. रॅगपिकर्स मुलींचा तो चमू वरकमाई म्हणून त्या दिवशी येणा-या जाणा-यांना झेंडे विकत होता. सगळा ग्रुप एकदम उत्साही आणि हसतमुख! ही त्यांच्यातलीच एक सुहासिनी! :-) suhasini आता हिचा फोटो काढायचा ठरवल्यावर तिला तात्पुरते खूष करणे क्रमप्राप्त होते, म्हणून आधी तिच्या कडून दोन झेंडे विकत घेतले.