काही दिवसांपुर्वी एका रेडीओ स्टेशनवर एक नाटीका चालू होती ती ऐकत होतो.
सर्व पात्रे स्त्रीया होत्या व मुख्य पात्राला (समाज सेविकेच्या भूमिकेत) एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेली सापडते. ती त्या खेड्यातल्या स्त्रीयांशी बोलत असते.
मुख्य पात्र: (अशा आशयाचे विधान होते)- "मला एक अनाथ बालिका तिच्या पालकांनी त्यागलेल्या अवस्थेत सापडली आहे. पहा किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे, तिला पदरात घ्यायला आहे का तुमच्यापैकी तयार?"
त्यातील "किती गोरी-गोरीपान, रुपाने सुंदर अशी आहे" ह्या संदर्भाने मी संतापलो. ती बालिका कोणीतरी पदरात घ्यावी ह्यासाठी तिचे वर्णन जसे केले जात होते जणू काही, एखादीला कणव यायचीच असती तर ती अशा वर्णनाशिवाय आली नसती का?
जे आज जाहिरातीतून, हिंदी-मराठी गाणी, इतर माध्यमातून सारखे बिंबवले जाते तेच एका नाटीकेतूनही बिंबवले जात होते. काळ्या/सावळ्या रंगाच्या व्यक्तिंच्या मनावर ह्याचा जो परिणाम सतत होत असेल त्याचा काहीही विचार ह्यात केला जात नाही.
साबणाच्या जाहिरातीतून, क्रिम, ई सौदर्य प्रसाधनांच्या जाहिरातीतून हेच सतत समोर येत असते- काळे आहात ना, मग गोरे व्हा! आमचे हे साबण वापरा- हे बघा त्यात कोरफड टाकलीये, गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, पपई टाकलीये, लिंबाचा रस आहे, दुध आहे, (हळुहळू फणसापर्यंत पोहोचतील)!
वाचने
3417
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपले
"समाजात
In reply to आपले by पाषाणभेद
काही
नको ते
In reply to काही by Nile
खुप मोठा
"मला एक
सहमत
In reply to "मला एक by अवलिया
कुणा गो-या
In reply to "मला एक by अवलिया
असेलही. पण
In reply to कुणा गो-या by अमृतांजन
बाकी गो-या
In reply to "मला एक by अवलिया
- १ असहमत अवलिया
In reply to "मला एक by अवलिया
आता आम्ही
In reply to - १ असहमत अवलिया by चतुरंग
त्या
पारंपारिक
In reply to त्या by चिरोटा
नाही हो ...
In reply to पारंपारिक by अमृतांजन
यात गैर
म्हणून